AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dharmaveer: प्रेक्षकांना हसविणारा कुशल बद्रिके ‘धर्मवीर’ पाहताना रडला; प्रसाद ओकसाठी लिहिली खास पोस्ट

'धर्मवीर' (Dharmaveer) या चित्रपटाला पहिल्या दिवसापासूनच हाऊसफुल प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत या चित्रपटाने तब्बल 9.08 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

Dharmaveer: प्रेक्षकांना हसविणारा कुशल बद्रिके 'धर्मवीर' पाहताना रडला; प्रसाद ओकसाठी लिहिली खास पोस्ट
Prasad Oak, Kushal BadrikeImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: May 17, 2022 | 9:23 AM
Share

प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ (Dharmaveer) हा चित्रपट सध्या सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे. शिवसेनेचे लोकप्रिय नेते आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. चित्रपट आवडल्याच्या प्रतिक्रिया सर्वसामान्य प्रेक्षकांकडून येतच आहेत, अशातच कलाविश्वातील मंडळींकडून त्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. या चित्रपटाबाबत अशीच एक पोस्ट अभिनेता आणि कॉमेडियन कुशल बद्रिकेनं (Kushal Badrike) लिहिली आहे. आपल्या विनोदकौशल्याने कुशल नेहमीच प्रेक्षकांना खळखळून हसवत असतो, मात्र ‘धर्मवीर’ पाहताना त्याच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. चित्रपटात आनंद दिघे यांची भूमिका साकारणारा अभिनेता प्रसाद ओक याच्यासाठी त्याने सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे.

कुशल बद्रिकेची पोस्ट-

View this post on Instagram

A post shared by Kushal Badrike (@badrikekushal)

‘एखादा नट एखाद्या भूमिकेला न्याय देतो, एखादा ती भूमिका जगतो पण एखादी भूमिका जिवंत करणारा नट म्हणजे प्रसाद ओक. धर्मवीर सिनेमा बघून आलो आणि पुन्हा एकदा प्रसाददादाच्या कामाच्या प्रेमात पडलो. सिनेमा बघताना साक्षात दिघे साहेबांचा भास होत राहिला. दिघे साहेबांचं काम एवढं मोठं आहे की आजही त्यांची प्रतिमा ठाणेकरांच्या देवघरात पुजली जाते. आता देवाला दोन तासात मांडता येत नाही येणारही नाही, पण सिनेमा संपताना डोळ्यांच्या कडा पाणावतात. आज इतक्या वर्षानंतरही साहेब तुम्ही आमच्यात जिवंत आहात आणि आजही आम्ही तुमच्या संस्कारात आहोत आणि कायम राहू. धर्मवीर आनंद दिघे साहेब थँक्यू,’ अशी पोस्ट कुशलने लिहिली.

मंगेश देसाई आणि झी स्टुडिओजची निर्मिती असलेल्या, प्रविण तरडे लिखित दिग्दर्शित ‘धर्मवीर’ या चित्रपटाला पहिल्या दिवसापासूनच हाऊसफुल प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत या चित्रपटाने तब्बल 9.08 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ठाणे, कल्याण, बदलापूर, डोंबिवली, पुणे आणि मुंबईतही विविध ठिकाणी हाऊसफुल गर्दी जमवण्यात हा चित्रपट यशस्वी ठरला आहे.

मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....