‘मुळशी पॅटर्न’मध्ये चहाची टपरी चालवणारी अभिनेत्री आता चालवतेय कोट्यवधींची कंपनी

तुम्हाला प्रवीण तरडेंच्या 'मुळशी पॅटर्न' (Mulshi Pattern) या चित्रपटात चहाची टपरी चालवणारी अभिनेत्री आठवतेय का? मालविका गायकवाड (Malvika Gaekwad) असं या अभिनेत्रीचं (Marathi Actress) नाव आहे. चित्रपटात चहाची टपरी चालवणारीची भूमिका साकारणारी ही अभिनेत्री खऱ्या आयुष्यात कोट्यवधींचा नफा कमावणारी कंपनी चालवतेय.

'मुळशी पॅटर्न'मध्ये चहाची टपरी चालवणारी अभिनेत्री आता चालवतेय कोट्यवधींची कंपनी
Malvika Gaekwad Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 14, 2022 | 3:08 PM

तुम्हाला प्रवीण तरडेंच्या ‘मुळशी पॅटर्न’ (Mulshi Pattern) या चित्रपटात चहाची टपरी चालवणारी अभिनेत्री आठवतेय का? मालविका गायकवाड (Malvika Gaekwad) असं या अभिनेत्रीचं (Marathi Actress) नाव आहे. चित्रपटात चहाची टपरी चालवणारीची भूमिका साकारणारी ही अभिनेत्री खऱ्या आयुष्यात कोट्यवधींचा नफा कमावणारी कंपनी चालवतेय. मालविकाने मोठ्या पगाराची नोकरी करत असताना शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पुढे ती स्वत: सेंद्रिय शेतीचा प्रयोग करायला लागली आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाष्य करणाऱ्या, प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटातून ती प्रेक्षकांसमोर आली. आयटी क्षेत्रात काम करत असताना पूर्णवेळ शेती करण्याची तीव्र इच्छा होती, असं मालविकाने एका मुलाखतीत सांगितलं होतं. मालविका ही आयटी इंजिनीअर आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर तिला नामांकित कंपनीत नोकरी मिळाली होती. मात्र ही नोकरी सोडून ती शेतीकडे वळली.

“शेतकऱ्यांच्या समस्या नेहमी नजरेखालून जायच्या”

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मालविकाने तिच्या या प्रवासाबद्दल सांगितलं होतं. “शेतीशी कधी प्रत्यक्ष संबंध आला नाही. मात्र वडील मार्केट यार्डमध्ये ट्रेडर असल्यामुळे अप्रत्यक्षपणे संबंध होता. नियमित वर्तमानपत्र, मॅगझिन्स वाचायची सवय असल्याने शेतकऱ्यांच्या समस्या नेहमी नजरेखालून जायच्या. माझं मन आयडी क्षेत्रात रमेनासं झालं. दुसरीकडे मला पूर्णवेळ शेती करण्याची तीव्र इच्छा होत होती. याच काळात शेतकऱ्यांचं प्रश्न मांडणाऱ्या मुळशी पॅटर्न या चित्रपटासाठी ऑडिशन दिली आणि माझी निवड झाली”, असं ती म्हणाली होती.

मालविकाने पगाराच्या पैशातून शिरूर इथं दीड एकर शेती घेतली आणि या शेतीवर सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय तिने घेतला. दोन मित्रांना सोबत घेऊन ती दुग्ध व्यवसायातही उतरली. विशाल चौधरी, जयवंत पाटील आणि मालविका अशा तिघांनी ‘हंपी ए 2’ नावाची कंपनी सुरू केली. दूध, तूप, दही, पनीर यांसारखे अनेक पदार्थ त्यांच्या कंपनीत बनू लागले. आता ही कंपनी तब्बल 18 कोटींच्या घरात गेल्याचं म्हटलं जातं.

‘शार्क टँक इंडिया’ या कार्यक्रमात लावली हजेरी

मालविकाने नुकतीच ‘शार्क टँक इंडिया’ या कार्यक्रमात हजेरी लावली. तिच्या हम्पी ए 2 या डेअरी उत्पादनाच्या कंपनीने पियुष बन्सल, विनीता सिंग आणि गझल अलघ यांच्यासोबत 15% इक्विटीवर एक कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या करार केला. शार्क टँक या कार्यक्रमात सामान्य कुटुंबातून आलेल्या उद्योजकांना आर्थिक मदत करणारे उद्योजक हजेरी लावतात. एखादी कल्पना आवडल्यानंतर मोठमोठ्या कंपन्यांचे संस्थापक त्या सर्वसामान्य उद्योगात सर्व प्रकारची मदत करण्याची ऑफर देतात.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.