मांजरेकर, दामले, कोठारेंसह 50 दिग्गज कलाकारांशी चर्चा, राज ठाकरे म्हणाले, तुमच्या समस्या मुख्यमंत्र्यांपर्यंत नेतो

मराठी मनोरंजन क्षेत्रासमोर सध्याच्या कोरोना काळात ज्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत, त्यांचा आढावा राज ठाकरे यांनी घेतला. (Raj Thackeray Actor Director Producers)

मांजरेकर, दामले, कोठारेंसह 50 दिग्गज कलाकारांशी चर्चा, राज ठाकरे म्हणाले, तुमच्या समस्या मुख्यमंत्र्यांपर्यंत नेतो
झूमनंतर आता गुगलनेही लाँच केले नवीन मीट वेब अॅप

मुंबई : मराठी नाट्यसृष्टी, चित्रपटसृष्टी, संगीत, टीव्ही मालिका या क्षेत्रात कार्यरत असलेल्या पन्नासहून अधिक मान्यवरांशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संवाद साधला. तातडीच्या मागण्यांविषयी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी लगेच संपर्क साधून पाठपुरावा करु असं आश्वासन राज ठाकरे यांनी दिलं. (Raj Thackeray MNS Zoom Meeting with TV Actor Director Producers)

मराठी मनोरंजन क्षेत्रासमोर सध्याच्या कोरोना काळात ज्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत, त्यांचा आढावा राज ठाकरे यांनी घेतला. नाट्यसृष्टी, चित्रपटसृष्टी, संगीत, टीव्ही मालिका या क्षेत्रात कार्यरत असलेल्या मान्यवरांशी राज ठाकरे यांनी ‘झूम’ माध्यमातून संवाद साधला. त्यांच्या समस्याही राज ठाकरेंनी जाणून घेतल्या.

कलाकारांच्या मागण्या काय?

महाराष्ट्रात चित्रीकरणाला परवानगी मिळावी, राज्यभरातील लोककलावंतांसाठी विशेष पॅकेज जाहीर करावं, वाद्यवृंद कलावंत आणि बॅकस्टेज कामगारांना अनुदान देण्यात यावं आणि त्यांच्या लसीकरणासाठी विशेष व्यवस्था करण्यात यावी अशा विविध मागण्या मांडण्यात आल्या.

उद्धव ठाकरेंशी संपर्काचं आश्वासन

सिंगल स्क्रीन चित्रपटगृहांची अवस्था, सध्या तयार असलेल्या चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी काय करता येईल या उपाययोजनांवरही चर्चा झाली. दीड तास चाललेल्या या ‘झूम’ संवादात राज ठाकरे यांनी सर्व समस्या आणि मागण्या नोंदवून घेतल्या. यातील तातडीच्या मागण्यांविषयी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी लगेच संपर्क साधून पाठपुरावा करु असं आश्वासन त्यांनी दिलं आहे.

कोणाकोणाचा सहभाग?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर मनसे नेते अमित ठाकरे स्टार प्रवाह वाहिनीचे प्रमुख- दिग्दर्शक सतीश राजवाडे निर्माते दिग्दर्शक महेश कोठारे निर्माते दिग्दर्शक महेश मांजरेकर निर्माते अभिनेते प्रशांत दामले दिग्दर्शक केदार शिंदे अभिनेता अंकुश चौधरी अभिनेता दिग्दर्शक पुष्कर श्रोत्री अभिनेता दिग्दर्शक प्रसाद ओक अभिनेता सचित पाटील संगीतकार राहुल रानडे

दोन दिवसात या विषयांवर कार्यवाही होऊ शकेल असा विश्वासही राज ठाकरेंनी व्यक्त केला. गरज भासल्यास असाच ‘झूम’ संवाद मुख्यमंत्र्यांसोबत करण्याबाबत त्यांनी तयारी दर्शवली. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने या ‘झूम’ संवादाचं आयोजन केलं होतं.

संबंधित बातम्या 

महेश भट, सुबोध भावे ते अमोल कोल्हे, मुख्यमंत्र्यांशी संवादात टीव्ही-चित्रपट निर्मात्यांचा महत्त्वाचा निर्णय

(Raj Thackeray MNS Zoom Meeting with TV Actor Director Producers)

Published On - 1:44 pm, Thu, 20 May 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI