AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रेमळ बायको, खडूस बॉस!, ‘रोज नवी ठिणगी वादाची-‘बॉस माझी लाडाची’, नवी कथा-नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई: नवं वर्ष नव्या मालिकांचा खजिना घेऊन आलंय. ‘सोनी मराठी’वर (sony marathi) एक नवी मालिका येतेय. त्याचा प्रोमो सध्या रिलीज झालाय. ‘बॉस माझी लाडाची’ (boss majhi ladachi) ही जरा हटके प्रेमाची गोष्ट येत्या काही दिवसात सोनी मराठीवर पहायला मिळणार आहे. या मालिकेत अभिनेत्री भाग्यक्षी लिमये, (bhagyashree limaye) मनवा नाईक, (manava naik) रोहिणी हटंगडी, (rohini hattangady) […]

प्रेमळ बायको, खडूस बॉस!, 'रोज नवी ठिणगी वादाची-'बॉस माझी लाडाची', नवी कथा-नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
बॉस माझी लाडाची
| Edited By: | Updated on: Jan 20, 2022 | 11:00 AM
Share

मुंबई: नवं वर्ष नव्या मालिकांचा खजिना घेऊन आलंय. ‘सोनी मराठी’वर (sony marathi) एक नवी मालिका येतेय. त्याचा प्रोमो सध्या रिलीज झालाय. ‘बॉस माझी लाडाची’ (boss majhi ladachi) ही जरा हटके प्रेमाची गोष्ट येत्या काही दिवसात सोनी मराठीवर पहायला मिळणार आहे. या मालिकेत अभिनेत्री भाग्यक्षी लिमये, (bhagyashree limaye) मनवा नाईक, (manava naik) रोहिणी हटंगडी, (rohini hattangady) गिरीश ओक, (girish oak) आणि आयुष संजीव (ayush sanjiv) हे कलाकार पहायला मिळणार आहेत.

मालिकेची गोष्ट काय आहे?

‘बॉस माझी लाडाची’ या मालिकेची गोष्ट नवरा बायकोच्या प्रेमाची आणि बॉस आणि इंम्प्लॉइच्या अवखळ भांडणाची आहे. भाग्यत्री या मालिकेत बॉसच्या भुमिकेत आहे तर आयुष आर्किटेकची भूमिका साकारतोय. तसंच ही फक्त या दोघांची गोष्ट नाही तर ही एका कुटुंबाची गोष्ट आहे.

भाग्यश्री लिमयेने ‘घाडगे अॅंण्ड सून’ (ghadage and sun) या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. या मालिकेत तिनं अमृता हे पात्र साकारलं होतं. त्यानंतर सध्या ती भाडिपसोबत काम करतेय. भाडिपमधल्या तिच्या आभिनयाने ती सगळ्यांचीच मनं जिंकून घेतेय. येऊ घातलेल्या ‘बॉस माझी लाडाची’ या मालिकेचा प्रोमो तिने इन्स्टाग्रामवर शेअर करत ‘रोज नवी ठिणगी वादाची’ असं कॅपशन दिलंय. त्यामुळे बॉस-सहकाऱ्यातली भांडणं आणि नवरा बायकोचं प्रेम प्रेक्षकांना किती भावतं, हे पहावं लागेल.

सोनी मराठीने आपल्या इन्स्टग्रामवर या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. ‘रोज नवी ठिणगी वादाची’ ही या मालिकेची टॅग लाईन आहे.

संबंधित बातम्या 

पुरस्कारांचं गाठोडं घेऊन ‘पांघरुण’ प्रेक्षकांच्या भेटीला, महेश मांजरेकर दिग्दर्शित सिनेमा 4 फेब्रुवारीपासून सिनेमागृहात

Dhanush Aishwarya Divorce | मुलीचं लग्न वाचवण्यासाठी बापाचे प्रयत्न? धनुष टाळत होता रजनिकांतची भेट?

मुलगा आर्यनच्या ड्रग्स प्रकरणानंतर बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानची सोशल मीडियावर पहिली पोस्ट, चाहते म्हणाले

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.