‘आरारारा खतरनाक’, ‘उन उन वठातून’ गाण्याचे गीतकार आणि प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक प्रणित कुलकर्णी यांचं निधन

मुळशी पॅटर्न, देऊळबंद चित्रपटाचे गीतकार आणि प्रसिद्ध लेखक- दिग्दर्शक प्रणित कुलकर्णी यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. (Marathi Director Singer Pranit Kulkarni passed away)

'आरारारा खतरनाक', 'उन उन वठातून' गाण्याचे गीतकार आणि प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक प्रणित कुलकर्णी यांचं निधन
Pranit Kulkarni
Follow us
| Updated on: May 18, 2021 | 7:01 AM

पुणे : मुळशी पॅटर्न, देऊळबंद चित्रपटाचे गीतकार आणि प्रसिद्ध लेखक- दिग्दर्शक प्रणित कुलकर्णी यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. सोमवारी (17 मे 2021) पुण्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 50 वर्षांचे होते. मुळशी पॅटर्न, हंबीरराव, देऊळ बंद यांसारख्या अनेक चित्रपटसाठी त्यांनी गीत लेखन केलं होतं. त्यांच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीला फार मोठा धक्का बसला आहे. (Marathi Director Singer Pranit Kulkarni passed away)

‘आरारारा खतरनाक’ गाण्याचे गीतकार

मुळशी पॅटर्न चित्रपटातील ‘आरारारा खतरनाक’ हे गाणं त्यांनी लिहिलं होतंं. या गाण्याने रसिकांच्या मनावर अक्षरश: भूरळ पाडली होती. अनेक चित्रपटांसह टीव्हीवर बहुतांश मालिकांसाठीही त्यांनी गाणी लिहिली होती. शिवबा ते शिवराय या दृकश्राव्य कार्यक्रमाचे ते लेखक, गीतकार, दिग्दर्शक होते. त्याशिवाय ‘जीवन यांना कळले हो’ या स्टेज रियालिटी शोचे लेखन, दिग्दर्शनही त्यांनी केलं. “सुरक्षित अंतर ठेवा” या नाटकाचे ते लेखक आणि दिग्दर्शक होते.

‘लक्ष्य’ या मालिकेचे लेखक

प्रणित कुलकर्णी यांनी फिरोदिया करंडक स्पर्धा गाजवली होती. त्यानंतर त्यांचा कलाक्षेत्रातील प्रवास सुरू झाला. यानंतर त्यांनी ऑल द बेस्ट या टीव्ही के मालिकेचे लेखन दिग्दर्शन केले होते. विशेष म्हणजे सध्या स्टार प्रवाहवर लोकप्रिय ठरत असलेल्या ‘लक्ष्य’ या मालिकेचेही ते लेखक होतेे.

गीतकार आणि म्युझिक अल्बमचा निर्माता म्हणून प्रणित यांनी बराच काळ काम केले आहे. प्रवीण तरडे व प्रणित कुलकर्णी हे दोघे खूप वर्षापासूनचे मित्र होते. सर्जनशील निर्मिती करण्याच्या वेडानं त्या झपाटलेल्या दोघांनी देऊळबंद हा चित्रपट दिग्दर्शित केला आहेत. सिनेमाचं लेखनही त्यांनी मिळूनच केलं होते.

मराठी सिनेसृष्टीत मोठी पोकळी

त्यांच्या अचानक जाण्याने मराठी सिनेसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. प्रणित कुलकर्णी यांच्या निधनाने फार मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच अनेकांनी त्यांना सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहिली. (Marathi Director Singer Pranit Kulkarni passed away)

संबंधित बातम्या : 

‘माणूस ते संत’ दैवी प्रवास, पुन्हा एकदा अनुभवता येणारा ‘तुकारामां’ची गाथा!

Video | कोरोना लसीकरणादरम्यान हजार नखरे, ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री सोशल मीडियावर जोरदार ट्रोल!

श्रीमंतीचा एक अजब-गजब मंत्र सांगणारा चित्रपट, ‘कंदील’चे मोशन पोस्टर सोशल मीडियावर लाँच!

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.