Rani Mukharjee : बायकोने नवऱ्यावर ओरडलं पाहिजे… राणी मुखर्जीचं अजब विधान, भडकलेल्या नेटकऱ्यांनी घेतली शाळा
Rani Mukerji Controversy : राणी मुखर्जी सध्या "मर्दानी 3" या तिच्या नवीन चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. मात्र त्यादरम्यान एका मुलाखतीत मुलाखतीदरम्यान तिने केलेल्या विधानामुळे मोठा गदारोळ माजला आहे. त्यामुळे नेचकरी राणीला चांगलच ट्रोल करत आहेत.

Mardaani 3 Actress Rani Mukerji : बॉलिवूडची अभिनेत्री राणी मुखर्जी सध्या “मर्दानी 3″ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. ती सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. मात्र नुकतंच तिने एका इंटरव्ह्यूदरम्यान राणीने असं वक्तव्य केलं ती त्यामुळे सोशल मीडियावर तिला चांगलंच ट्रोल केलं जात आहे. तिच्यावर बरीच टीकाही होत आहे. त्या मुलाखतीत रानी ही पती-पत्नीच्या नात्याबद्दल बोलली होती. तिचा हा व्हिडीओ वाऱ्याच्या वेगाने व्हयारल झाला आहे. अेक लोकांनी तिला ट्रोलही केलंय.
” मला वाटतं की आदराची सुरुवात घरापासून होते, अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर, जेव्हा एखादा मुलगा त्याच्या आईला वाईट वागणूक मिळाताना पाहतो तेव्हा तो विचार करतो लागतो की जर माझ्या आईसोबत हे घडत असेल तर प्रत्येक मुलीसोबत असेच वागता येऊ शकतं.” राणीने एका इंटरव्ह्यूदरम्यान हे उद्गार काढले.
कोणत्या गोष्टीवरून वाद सुरू ?
“ आपल्या पत्नीशी कसं वागावं याची काळजी पुरूषांनी घेतली पाहिजे. कारण तेच पाहून मुलं मोठी होत असतात. जर त्यांच्याा आईला चांगली वागणूक मिळाली आणि त्यांना आदर मिळाला,तर मुलांना हे समजेल की मुलींना आदराची वागणूक दिली पाहिजे, त्यांचा सन्मान, आदर राखला पाहिजे. आणइ सोसायटीत त्यांचं एक स्थान असंल पाहिजे,याची मुलांना जाणीव होईल. ” असं रानी म्हणाली. पुढे ती असंही म्णाली , “ हे सगळं घरातचं सुरू होतं. वडील जर आईवर ओडरत असतील तर ती छोटी गोष्ट नाहीये. (मग) आईनेही वडिलांवर (पत्नने-पतीवर) ओरडलं पाहिजे .” पण तिचं हे म्हणणं लोकांना फारसं आवडलेले नाही , ना ते पटलंय.
सोशल मीडिया युजर्नसी राणीवर केली टीका
रानी मुखर्जीची ही क्लिप खूप व्हायरल झाली आहे. वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही क्लिप फिरत असून त्यावर लोकांनी, नेटकऱ्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. बऱ्याच जणांना राणीचा हा सल्ला, हे बोलणं आवडलेलं नाहीये. मला वटातं ती हे मजेत सांगायचा प्रयत्न करत्ये, पण हे मजेशीर नाहीये, असं एका युजरने लिहीलं. पण एखाद्या व्यक्तीने दुसऱ्यावर ओरडलं पाहिजेच कशाला, आपण (सगळेच) शांतपणे एकमेकांशी बोलू शकत नाही का ? अशी कमेंट करत दुसऱ्या युजरने तिच्या विधानावर टीका केली. तर अनेक लोकांचं असं मानणं आहे की, नातेसंबंध हे आदरावर आधारित असले पाहिजेत आणि दोन्ही बाजूंनी आरडा-ओरडा न करता गोष्टी सोडवल्या पाहिजेत. एकदंरच राणीच्या विधानावर बरीच टीका होताना दिसत आहे.
