Kajol : लग्नाला एक्सपायरी डेट हवी ! कोणालाच फार काळ सहन.. काजोलच्या विधानाने उंचावल्या भुवया
बॉलिवूडची अभिनेत्री काजोल सध्या 'टू मच विद काजोल अँड ट्विंकल' या शोमध्ये होस्ट म्हणून दिसत आहे. या शोचे गेले काही एपिसोड खूप चर्चेत होते. आता नव्या भागात काजोलने लग्नावरून एकं असं विधान केलं ज्यामुळे ती पुन्हा चर्चेच्या झोतात आली आहे. सोशल मीडियावर तिच्या विधानाची प्रचंड चर्चा सुरू आहे.

बॉलिवूडची अभिनेत्री काजोल (Kajol) ही तिच्या लूक्सप्रमाणेच खणखणीत अभिनय आणि बेधडक स्वभावासाठी प्रसिद्ध आहे. तिची चुलबुली इमेज, कोणीतीही भीडभाड न बाळगता बोलणं या मुळे ती बऱ्याचदा ट्रोलही होत असते. पण तरीही तिला फार फरक पडत नाही, तिने तिचा बिनधास्त अंदाज कायम ठेवला आहे. सध्या मोठ्या पडद्यावर ती दिसत नसली तरी ओटीटीवर तिचा दबदबा कायम असून सध्या काजोल ही ॲमेझॉन प्राईमच्या ‘टू मच विद काजोल अँड ट्विंकल’ या शोमुळेही खूप चर्चेत असते. काजोल आणि ट्विंकल खन्ना दोघी मिळून होस्ट करणाऱ्या या शोमध्ये आत्तापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली असून काही ना कारण, बेधडक विधान यामुळे या शोचीही बरीच चर्चा झाली, काहीवेळा चाहत्यांनी ट्रोलही केलं.
या शोमध्ये नुकतीच अभिनेत्री क्रिती सॅनन आणि अभिनेता विकी कौशल यांनी हजेरी लावली. या शोमध्ये दोघांशी संवाद साधताना काजोलने लग्नाबद्दल तिचे विचार मांडले, मात्र त्यातील तिच्या एका विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. प्रत्येक लग्नाची एक एक्सपायरी डेट असली पाहिजे आणि त्यात काही रिन्यूएबल ऑप्शन्सही असले पाहिजेत, असं काजोल म्हणाली.
लग्नाला एक्सपायरी डेट हवीत
‘टू मच विद काजोल अँड ट्विंकल’ या शोच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये क्रिती सेनन आणि विकी कौशलने हजेरी लावली. काजोल आणि ट्विंकल खन्ना या दोघींनी त्यांच्याशी खूप गप्पा मारल्या. विकी आणि क्रिती यांनी लग्न, मैत्री आणि नात्यांवर मनमोकळेपणाने चर्चा केली. त्यानंतर ‘धिस ऑर दॅट’ या सेक्शनदरम्यान त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला. लग्नामध्ये काही रिन्यूएबल नूतनीकरण ऑप्शन आणि एक्सपायरी डेट असावी की नाही ? या प्रश्नाचं उत्तर देताना क्रिती, ट्विंकल खन्ना आणि विकी या तिघांनी रेड झोन निवडला, म्हणजेच त्यांनी या प्रश्नावर असहमती दर्शवत नाही असं उत्तर दिलं. तर काजोल ही मात्र ग्री झोनच्या दिशेने गेली, तिने होकार दिला. ते पाहून ट्विंकल खन्ना तिला म्हणाली , ‘ लग्न म्हणजे वाशिंग मशीन नव्हे’. मात्र त्यावर काजोलने थेट सवाल विचारला की तुमचं लग्न योग्य व्यक्तीशीच होईल याची काय गॅरेंटी ?
पैशाने आनंद विकत घेता येतो ?
पुढे काजोल म्हणाली, ‘ एखादा रिन्यूएनबल (नूतनीकरण) ऑप्शन तर असालत पाहिजे, आणि जर एखादी एक्सपायरी डेट असेल , तर कोणालाच जास्त दिवस सहन करावं लागणार नाही.’ काजोलचं हे उत्तर ऐकून क्रिती म्हणाली, तुम्ही जर यावर सहमत असाल तर घरातल्यांची तर चांदी (त्यांच्यासाठी चांगलं) आहे. त्यानंतर पैशाने आनंद खरेदी करता येतो का ? या प्रश्नावर काजोलने रेड झोनची निवड केली. तो पैसा किती आहे, यावरही अनेक गोष्टी अवलंबून असतात असं ती म्हणाली.
गेल्या वेळी प्रतारणेच्या मुद्यावरून काजोल, करण जोहर आणि ट्विंकल खन्ना यांना बरीच टीका सहन करावी लागली होती. त्यातच आता काजोलचं हे लग्नाच्या एक्सपायरी डेट बद्दलचं विदान चर्चेत आलं आहे.
