Milind Soman : अभिनेता मिलिंद सोमनची कोरोना चाचणी अखेर निगेटिव्ह, पत्नी अंकिताचे मानले आभार

मिलिंद सोमनची कोरोना चाचणी अखेर 14 दिवसांनंतर निगेटिव्ह आली आहे. तसंच त्याची पत्नी अंकिताची कोरोना चाचणीही निगेटिव्ह आलीय. अंकिता आणि मिलिंदने सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे.

Milind Soman : अभिनेता मिलिंद सोमनची कोरोना चाचणी अखेर निगेटिव्ह, पत्नी अंकिताचे मानले आभार
अभिनेता मिलिंद सोमनची कोरोना चाचणी निगेटिव्ह

मुंबई : बॉलिवूड अभिनेता मिलिंद सोमनची कोरोना चाचणी अखेर 14 दिवसांनंतर निगेटिव्ह आली आहे. तसंच त्याची पत्नी अंकिताची कोरोना चाचणीही निगेटिव्ह आलीय. अंकिता आणि मिलिंदने सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. मिलिंद सोमनने सांगितलं गी कोरोना पॉझिटिव्ह असताना त्याची पत्नी अंकिताने त्याची खूप काळजी घेतली. त्याचबरोबर मिलिंदने आपल्या चाहत्यांसाठी स्पेशल काढाही सांगितलाय. (Actor Milind Soman and Ankita Soman’s corona report is negative)

मिलिंद सोमनने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपली कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याची माहिती दिली. “तुमच्या सर्वांची इच्छा आणि सकारात्मकतेबद्दल धन्यवाद. कोणत्याही आजारात चिकित्साचा सर्वात महत्वपूर्ण भाग हा सकारात्मकता असतो असं माझं माननं आहे. वास्तवात स्वस्थ जिवन जगण्यासाछीही सकारात्मकता महत्वाची आहे. सकारात्मक होण्यासाठी काय करावं, आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा कशी आणाल, ही यात्रा आहे आणि निरंतर प्रवास आहे”, असं मिलिंद सोमन याने म्हटलंय.

‘अंकिताचे आभार, कारण ही माहिती मिळताच ती गुवाहाटीवरुन आली. मी तिला नको सांगितलं होतं पण तिने एखाद्या परीप्रमाणे माझी काळजी घेतली, जेव्हा तिने हे पाहायला हवं होतं की ती कायम सुरक्षित राहील’, अशा शब्दात मिलिंद सोमनने आपली पत्नी अंकिताचे आभार मानले आहेत.

भूमी पेडणेकरही कोरोना पॉझिटिव्ह

अभिनेत्री भूमी पेडणेकर हिने एक सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आणि सांगितले की, तिला कोरोनाची लक्षणे आहेत आणि तीने स्वत:ला घरीच क्वारंटाईन केले आहे. ती म्हणाली, मी डॉक्टरांनी दिलेल्या प्रोटोकॉलचे अनुसरण करत आहे. आपण माझ्या संपर्कात आला असल्यास, कृपया त्वरित आपली चाचणी करून घ्या. मी स्टीम, व्हिटामिन सी आणि पौष्टिक अन्न खात आहे. तसेच, माझे मन प्रसन्न ठेवत आहे. कृपया या परिस्थितीला हलक्यात घेऊ नका. मीसुद्धा सर्व खबरदारी घेतल्या होत्या, तरी देखील मी या विळख्यात अडकले. नेहमी मास्क घाला, आपले हात स्वच्छ धुवा आणि सामाजिक अंतराचे अनुसरण करा.

View this post on Instagram

A post shared by Bhumi 🌻 (@bhumipednekar)

संबंधित बातम्या : 

PHOTO | अभिनेता विकी कौशलही कोरोना पॉझिटिव्ह, बॉलिवूडचे ‘हे’ कलाकारही कोरोनाच्या विळख्यात

बॉलिवूडवर कोरोनाचं सावट, अक्षय कुमार पाठोपाठ गोंविंदाही कोरोना पॉझिटिव्ह

Actor Milind Soman and Ankita Soman’s corona report is negative

Published On - 8:57 pm, Mon, 5 April 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI