Mouni Roy Wedding | मौनी रॉय लवकरच अडकणार लग्न बंधनात, मंदिरा बेदीच्या घरी पार पडली बैठक!

बर्‍याच काळापासून मौनी रॉय दुबई स्थित बँकर सूरज नंबियार (suraj nambiar) याला डेट करत होती आणि आता लवकरच या दोघांचे लग्न होणार असल्याची बातमी समोर आली आहे.

Mouni Roy Wedding | मौनी रॉय लवकरच अडकणार लग्न बंधनात, मंदिरा बेदीच्या घरी पार पडली बैठक!
मौनी रॉय

मुंबई : चित्रपट आणि टीव्ही अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) गेल्या काही काळापासून तिच्या वैयक्तिक जीवनाबद्दल खूप चर्चेत आहे. बर्‍याच काळापासून मौनी रॉय दुबई स्थित बँकर सूरज नंबियार (suraj nambiar) याला डेट करत होती आणि आता लवकरच या दोघांचे लग्न होणार असल्याची बातमी समोर आली आहे. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, मौनी रॉयची आई सूरज नंबियार यांच्या कुटुंबाला भेटली. यावेळी त्यांनी सूरज आणि मौनीच्या लग्नाविषयी बोलणी केली (Mouni Roy Wedding update actress will tie knot with suraj nambiar soon).

मंदिरा बेदीच्या घरी झाली मौनीच्या लग्नाची बोलणी

(Mouni Roy Wedding update actress will tie knot with suraj nambiar soon)

अहवालानुसार अभिनेत्री मंदिरा बेदी यांच्या घरी ही ‘लग्न’ बैठक झाली आणि त्यात मौनी रॉय हिचे भाऊही उपस्थित होते. मंदिरा बेदी ही मौनी रॉयची चांगली मैत्रीण असल्याचे म्हटले जाते आणि म्हणूनच ही भेट तिच्या घरी ठरली होती.

लग्नाची तारीख झाली निश्चित!

असे सांगितले जात आहे की, मौनीच्या आईने सूरजच्या कुटुंबाची भेट घेतली आहे आणि लग्नाची तारीख निश्चित केली आहे. आता लवकरच मौनी आणि सूरज नंबियार लग्न करतील. तर, दुसरीकडे असेही म्हटले जात आहे की, त्यांच्या लग्नाची तयारी सुरू झाली आहे.

लॉकडाऊनमध्ये झाली मौनी आणि सूरज नंबियारची भेट

कोरोना व्हायरसमुळे झालेल्या लॉकडाऊनमध्ये मौनी रॉय आणि सूरज नंबियार एकमेकांना प्रथमच भेटले. या दिवसांत, मौनी रॉय दुबईमध्ये होती आणि तिने संपूर्ण वेळ तिची बहीण, मेहुणे आणि मुलांसह घालवला. रिपोर्ट्सनुसार, त्याच वेळी मौनी रॉय आणि सूरज नंबियार यांची जवळीक वाढली (Mouni Roy Wedding update actress will tie knot with suraj nambiar soon).

इंस्टाग्रामवर रिलेशनशिप केले ऑफिशिअल!

मौनी रॉयनेही इंस्टाग्रामवर सूरज नंबियार यांच्याबरोबरचे नाते ऑफिशियल केले आहे. तिने सूरज सोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. इतकेच नाही तर, नंतर मौनी रॉयने सूरज आणि त्याच्या कुटुंबीयांसह एक फोटो शेअर केला आणि त्यात तिने सूरजच्या आई-वडिलांना ‘मॉम’ आणि ‘डॅड’ म्हणून संबोधित केले आहे. रिपोर्ट्सनुसार, मौनी रॉय सूरजच्या कुटुंबात बर्‍यापैकी रमली आहे आणि ती त्यांच्यात चांगलीच मिसळली आहे.

मौनीच्या लिंकअप-ब्रेकअपची चर्चा!

लिंक-अप बद्दल बोलताना मौनी रॉयचे नाव गौरव चोप्रा आणि ‘देवो के देव महादेव’ स्टार मोहित रैना यांच्याशी आधी जोडले गेले होते. मौनी यापूर्वी गौरव चोप्राला डेट करत होती. या दोघांनी ‘पती, पत्नी और वो’ या टीव्ही शोमध्ये एकत्र भाग घेतला होता. पण, 2012मध्ये त्यांचा ब्रेकअप झाला. यानंतर मौनी रॉय हिचे नाव मोहित रैनाशीही जोडले गेले. मात्र, नंतर या दोघांनीही याला केवळ अफवा असल्याचे म्हटले होते.

(Mouni Roy Wedding update actress will tie knot with suraj nambiar soon)

हेही वाचा :

Rakhi Sawant Biopic | आलिया की प्रियंका, कोण साकारेल राखीची भूमिका? ‘ड्रामा क्वीन’ने दिले उत्तर…

hea Chakraborty | ‘चेहरे’मध्ये रिया चक्रवर्ती दिसणार की नाही? निर्मात्याने दिले ‘हे’ उत्तर!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI