REVIEW : कसा आहे ‘मोदीं’चा बायोपिक?

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बायोपिकचा ट्रेण्ड सुरु आहे. खेळाडू, अभिनेते, राजकारणी अशा विविध क्षेत्रातील लोकांचे बायोपिक आपल्याला बघायला मिळत आहेत. लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींचा त्सुनामी सगळ्यांनीच अनुभवला. आता त्यांचा हा प्रवास मोठ्या पडद्यावर अनुभवण्याची संधी ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाद्वारे मिळाली आहे. केवळ दीड महिन्याच्या कालावधीत तयार झालेला हा सिनेमा आधी 5 एप्रिलला प्रदर्शित […]

REVIEW : कसा आहे 'मोदीं'चा बायोपिक?
Follow us
| Updated on: May 24, 2019 | 7:11 PM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बायोपिकचा ट्रेण्ड सुरु आहे. खेळाडू, अभिनेते, राजकारणी अशा विविध क्षेत्रातील लोकांचे बायोपिक आपल्याला बघायला मिळत आहेत. लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींचा त्सुनामी सगळ्यांनीच अनुभवला. आता त्यांचा हा प्रवास मोठ्या पडद्यावर अनुभवण्याची संधी ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाद्वारे मिळाली आहे. केवळ दीड महिन्याच्या कालावधीत तयार झालेला हा सिनेमा आधी 5 एप्रिलला प्रदर्शित होणार होता. मात्र, विरोधी पक्षांनी आचारसंहितेच्या काळात हा सिनेमा प्रदर्शित होऊ न देण्याची विनंती आयोगाला केल्यामुळे सिनेमाचं प्रदर्शन लांबणीवर पडलं. आता निवडणूका संपल्यावर फायनली हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे.

‘जीतने का मजा तब आता है जब सब आपके हारने की उम्मीद करते है!’ पीएम मोदी या सिनेमातील हा संवाद ऐकल्यावर संपूर्ण चित्रपटात तुम्हाला काय बघायला मिळणार याचा अंदाज येतो. ‘मेरी कॉम’ आणि ‘सरबजीत’ सारख्या बायोपिकचे दिग्दर्शन करणाऱ्या ओमंग कुमारने या चित्रपटाचे दिग्दर्शन केलंय.

नरेंद्र मोदींच्या बालपणापासून तर त्यांच्या पंतप्रधान पदाची शपथ घेण्यापर्यंतचा प्रवास या सिनेमात दाखवण्यात आला आहे. भाजपने 2013 मध्ये ज्या बैठकीत मोदींना पंतप्रधान पदाची उमेदवारी जाहीर केली तिथून या सिनेमाची सुरुवात होते. त्यानंतर चित्रपट फ्लॅशबॅकमध्ये जातो. नरेंद्र मोदींचे वडील (राजेंद्र गुप्ता) चहा विक्रेत असतात तर आई (जरीना वहाब) घरकाम करत असते. या हलाखीच्या परिस्थितीतही छोट्या नरेंद्रची महत्त्वाकांक्षा मोठी असते.

घरच्या परिस्थितीची चांगलीच जाणीव असल्याने नरेंद्र मोदी अभ्यास सांभाळून आपल्या वडिलांना त्यांच्या चहाच्या व्यवसायात मदत करत असतात. देशभक्ती, लोकांना मदत करण्याची भावना, काहीतरी करण्याची धडपड या गोष्टी बालपणापासूनच त्यांच्या मनात रुजलेल्या असल्याने एका सामान्य व्यक्तीप्रमाणे आपल्याला जीवन जगायचे नाही, हे त्यांनी लहानपणीच ठरवेलेले असते. त्यामुळेच मोठं झाल्यावर ते आपल्या आई-वडिलांकडे संन्यासी बनण्याची इच्छा व्यक्त करतात. पण त्यांचे आई-वडील त्यांचं लग्न करण्याचा निर्णय घेतात. त्यामुळे मोदी लग्नाच्या आधीच घर सोडून निघून जातात.

हिमालयात स्वत:चा शोध घेत असतांना मोदी स्वत:ला समाजकार्यात झोकून देतात. त्यानंतर गुजरातमध्ये परत आल्यावर मोदींचा आरएसएसशी संबंध आला आणि नंतर त्यांनी कधीच मागे वळून बघितलं नाही. लोकांना एकत्र आणण्याची ताकद, बळाचा वापर न करता युक्तीचा वापर करून अशक्य गोष्ट शक्य करून दाखवणे हे त्यांच्यातील गुण भारतीय जनता पार्टीतील वरिष्ठांना आवडतात आणि मोदी त्यांचे विश्वासू होतात.

आता मोदींनी कशा पध्दतीनं भाजपमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं? ते गुजरातचे मुख्युंत्री कसे झाले? गुजरातचे मुख्यमंत्री ते पंतप्रधान पदापर्यंतचा त्यांचा प्रवास कसा होता? त्यांना या प्रवासादरम्यान कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागला यासाठी तुम्हाला ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा सिनेमा बघावा लागेल.

मोदींच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या घटना या सिनेमात दाखवण्यात आल्या आहेत. आपल्या वडिलांसोबत चहा विकणारा मुलगा, गुजरातमध्ये उद्भवलेले दंगे तसेच मोदींच्या आयुष्यातील महत्त्वाच्या प्रसंगांवर दिग्दर्शकानं प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. चित्रपटाची कथा निर्माता संदिप सिंगने लिहीली आहे. दोन तासात मोदींचा प्रवास मोठ्या पडद्यावर दाखवणं सोपं नव्हतं. पण हे आव्हान दिग्दर्शक ओमंग कुमारनं स्वीकारलं. ओमंगचं बॅकग्राऊंड बघता या सिनेमाकडून प्रचंड अपेक्षा होत्या. पण या सिनेमानं अपेक्षाभंग केला.

‘मेरी कॉम’ आणि ‘सरबजीत’ची सर ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाला नाही. घाईगडबडीत सिनेमा तयार करुन प्रदर्शित करण्याच्या अट्टहासापायी पटकथेसोबतच दिग्दर्शनामध्येही गोष्टींमध्ये उणीव जाणवते. एवढचं काय तर मोदींच्या जीवनातील वादविवाद आणि चढउतार यांचं संतुलन चित्रपटात राखण्यात दिग्दर्शकाला अपेक्षित यश आलेलं नाही. त्यामुळे हा सिनेमा आपण तुकड्या तुकड्यांमध्ये बघत असल्याची जाणीव सातत्यानं आपल्याला होत राहते.

बऱ्याच ठिकाणी तर आपण डॉक्युमेंटरी बघतोये की काय असं वाटू लागतं. हे जर टाळलं असतं तर अजून चांगलं झालं असतं. मध्यांतरापूर्वी सिनेमात मोदींचं बालपण, गुजरात दंगल दाखवण्यात आली आहे. तर मध्यांतरानंतर मोदींचा पंतप्रधान बनण्यापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. चित्रपटात घटना इतक्या पटापट घडतात की, आपण त्या पात्रांशी कनेक्टचं होऊ शकत नाही. चित्रपटाचा पूर्ण फोकस मोदींच्या पात्रावर असल्यामुळे चित्रपटातील इतर पात्रांना दुय्यम वागणूक दिल्यासारखी वाटते. मनोज जोशी (अमित शहा), जरीना वहाब ( मोदींची आई), रतन टाटा ( बोमन इराणी) या पात्रांना सिनेमात अजून वाव देता आला असता.

इंदिरा गांधी, राहुल गांधी, सोनिया गांधी, लालकृष्ण अडवाणी, अटलबिहारी वाजपेयी, मुरली मनोहर जोशी या पात्रांवरही विशेष फोकस करण्यात आलेला नाही. सगळ्याच व्यक्तिरेखा मोजून केवळ 3-4 दृश्यांसाठी आपल्याला पाहायला मिळतात. विशेषत: सोनिया गांधी, राहुल गांधी, मनमोहन सिंग या व्यक्तिरेखा उभ्या करण्यात दिग्दर्शकाला अपयश आलं. अमित शहांच्या भूमिकेतील मनोज जोशींनाही सिनेमात अजून वाव देण्याची गरज होती. खलनायक बिझनेसमन रेड्डीच्या भूमिकेत प्रशांत नारायणनं नेहमीप्रमाणेच भन्नाट काम केलं.

विवेक ओबेरॉयने मोदींच्या भूमिकेत फिट बसण्याचा पुरेपुर प्रयत्न केला आहे. पण काही प्रसंगांमध्ये तो ‘विवेक ओबेरॉय’चं वाटतो. हुबेहुब मोदी वाटण्यासाठी विवेकच्या गेटअपवर प्रचंड मेहनत घेण्यात आली आहे. सिनेमात एडिटिंगमध्येही अनेक त्रुटी जाणवतात. कदाचित निर्मात्यांना हा सिनेमा प्रदर्शित करण्याची घाई झाल्यामुळे हा घोळ झाला असावा. लालकृष्ण अडवाणी आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्यासोबतचे मोदींचे संबंध दिग्दर्शकानं उत्तमरीत्या अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे.

मोदींच्या आयुष्यावर आधारित सिनेमासाठी दमदार कथानक आणि दिग्दर्शनाची आवश्यकता होती, असं मला राहुन राहुन वाटतंय. निर्मात्यांनी सिनेमा रिलीजची घाई न करता वेळ घेतला असता तर उत्तम कलाकृती तयार झाली असती, असं मला वाटतं. मोदींचं आयुष्यात एखाद्या पडद्यावरच्या हिरोप्रमाणे इतका मसाला आहे, की वेगळ्या कथानकाची गरजच पडली नसती. पण दिग्दर्शकाला हे सगळं अचूक हेरता आलेलं नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिनेमात कोणता कलाकार कोणतं पात्र करतोय हे सगळ्यांनाच माहिती आहे. तरी बऱ्याच पात्रांची नावं उच्चारतांना त्यांचा आवाज का म्युट ठेवण्यात आला, हे कल्पने पलिकडचं आहे.

चित्रपटात गाणीही उगाच घुसवल्यासारखी वाटतात. चित्रपटातील एकही गाणं लक्षात राहण्यासारखं नाही. सिनेमाची सिनेमॅटोग्राफी उत्तम आहे. विशेषत: हिमालयातील दृश्य उत्तम रंगले आहेत. वेल.. एकूणच काय मोदींचा हा प्रेरणादायी प्रवास मोठ्या पडद्यावर बघणं त्यांच्या चाहत्यांसाठी ट्रीट आहे. पण जर सिनेमावर अजून मेहनत घेतली असती, तर नक्कीच हा सिनेमा अधिक चांगला होऊ शकला असता, असं मला वाटतं.

‘टीव्ही नाईन मराठी’कडून मी या सिनेमाला देतोय अडीच स्टार…

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.