REVIEW : मणिकर्णिका… दमदार आणि लाजवाब!

‘खूब लडी मर्दानी वो तो झाँसी वाली रानी थी’ कवयित्री सुभद्रा कुमारी चौहान यांच्या या ओळी बॉलिवूडची क्वीन कंगना रानौतनं मोठ्या पड्यावरचं नाही तर खऱ्या आयुष्यातही अंमलात आणल्या आहेत. अनेक वाद झाले, अनेक अडचणी आल्यात, परंतू कंगनानं आपला स्वप्नवत प्रोजेक्ट ‘मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांसी’ अखेर पूर्ण केलाय. इतिहासाच्या पानावर राणी लक्ष्मी बाईंची शौर्यगाथा सुवर्ण […]

REVIEW : मणिकर्णिका... दमदार आणि लाजवाब!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:34 PM

‘खूब लडी मर्दानी वो तो झाँसी वाली रानी थी’ कवयित्री सुभद्रा कुमारी चौहान यांच्या या ओळी बॉलिवूडची क्वीन कंगना रानौतनं मोठ्या पड्यावरचं नाही तर खऱ्या आयुष्यातही अंमलात आणल्या आहेत. अनेक वाद झाले, अनेक अडचणी आल्यात, परंतू कंगनानं आपला स्वप्नवत प्रोजेक्ट ‘मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांसी’ अखेर पूर्ण केलाय.

इतिहासाच्या पानावर राणी लक्ष्मी बाईंची शौर्यगाथा सुवर्ण अक्षरांनी लिहिली गेलीय आणि हीच शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर आणण्याचं शिवधनुष्य कंगनानं उचलल्याबद्दल तिचं कौतुक करावं लागेल.

ऐेतिहासिक चित्रपट म्हटलं म्हणजे आशुतोष गोवारीकर आणि संजय लीला भन्साळींचं नाव डोळ्यासमोर येतं. एकापेक्षा एक भव्य आणि सरस चित्रपट या दोघांनी दिलेत. आता या दोघांसोबतचं कंगनाचं नाव या यादीत आवर्जून घ्यावं लागेल. कारण काही वाद झाल्यानंतर चित्रपटाचा दिग्दर्शक राधाक्रिष्ण जगरलामुदीनं हा चित्रपट अर्ध्यावरचं सोडला आणि कंगनानं चित्रपटाची धुरा आपल्या खांद्यावर उचलत यशस्वीरित्या हा चित्रपट पूर्ण केला.

चित्रपटाची सुरुवात महानायक अमिताभ बच्चन यांच्या दमदार आवाजानं होते. पेशवाची दत्तक मुलगी मनु जन्मजात साहसी आणि सुंदर आहे. मनुचं साहस आणि सौंदर्य बघून झांसीचा राजा गंगाधर राव नावलकर सोबत राजगुरु तिचं लग्न लाऊन देतात. आणि मनु झांसीची राणी बनते..इथूनच मनुची झांसीची राणी लक्ष्मीबाई बनण्याची ही शौर्यगाथा खऱ्या अर्थानं सुरु होते. झांसीच्या राणीला इंग्रजांसमोर नतमस्तक होणं अजिबात मान्य नसतं..गंगाधर रावांच्या निधनानंतर ति ‘मे मेरी झांसी नही दूंगी’ म्हणत बंड पुकारते..आणि यामध्ये तिला साथ देतात झलकारी बाई अर्थात अंकिता लोखंडे; तात्या टोपे अर्थात अतुल कुलकर्णी, पुरण सिंग अर्थात वैभव तत्तवादी आणि गुलाम मोहम्मद खान अर्थात डॅनी..

चित्रपटाच्या पूर्वाधात मणिकर्णिका ते राणी लक्ष्मीबाई यांच्या स्वभावाचे अनेक पैलू उलगडत जातात. पण हा सगळा प्रवास दाखवण्याच्या नादात चित्रपट रेंगाळतो..प्रत्येक पात्राची ओळख करुन देण्यात जर जास्त वेळ घालवला नसता तर चित्रपटाच्या पूर्वाधानं अचूक परिणाम साधला असता. तसेच अनावश्यक ठिकाणी गाण्यांचा भडिमार टाळणं गरजेचं होतं..त्यामुळे चित्रपटाला योग्य गती मिळाली असती..

चित्रपटाचा उत्तरार्ध पूर्वाधापेक्षा जास्त प्रभावी आहे.शेवटची चाळीस मिनिटं तर निव्वळ अप्रतिम. शेवटच्या चाळीस मिनिटांमध्ये तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही..आतापर्यंत केवळ पुस्तकात वाचलेला झांसीच्या राणीचा इंग्रजांविरुध्दचा लढा डोळ्याचं पारणं फेडणारा आहे. चित्रपटात 1857चं क्रांती आंदोलन मात्र अजून खुलवता आलं असतं असं मला प्रकर्षानं जाणवलं..

चित्रपटाची संपूर्ण मदार कंगनाच्या खांद्यावर आहे.. कंगनानं साकारलेली मणिकर्णिका लाजवाब..पूर्वाधात जरी कंगनाची संवादफेक  खटकत असली तरी उत्तरार्धात मात्र कंगनानं पूर्ण चित्रपट खाऊन टाकलाय..चित्रपट बघतांना सतत जाणवत राहतं की झांसीच्या राणीची भूमिका फक्त कंगनाचं करु शकते..या चित्रपटाद्वारे अंकिता लोखंडेने मोठ्या पडद्यावर पदार्पण केलंय..झलकारी बाईच्या भूमिकेत अंकितानं जीव ओतलायं..तिच्या भूमिकेची लांबी जरी मोठी नसली तरी अंकिता चांगलाच भाव खाऊन गेलीय..कंगना आणि अंकितानं चित्रपटात केलेली तलवारबाजी; घोडेस्वारी अप्रतिम..डॅनी; कुलभुषण खरबंदा, वैभव तत्त्ववादी, सुरेश ओबेराय, जीशूसेन गुप्ता यांनी  आपल्या भूमिका चोख बजावल्या आहेत. तात्या टोपेंच्या भूमिकेत अतुल कुलकर्णीनं अप्रतिम काम केलं असलं तरी त्याची भूमिका मोठी हवी होती असं राहुन राहुन वाटतं.

शंकर-एहसान-लॉय या तिकडीचं संगीत ठिकठाकचं म्हणावं लागेल. ‘विजयी भव’ हे गाणं मात्र चांगलंच जमून आलंय. प्रसून जोशी यांनी या चित्रपटाची गीते आणि संवाद लिहिले आहेत..चित्रपटातील साहसदृश्ये मस्त जमून आलीयेत..मात्र चित्रपटातील व्हीएफक्सवर अजून काम करण्याची गरज होती. दिग्दर्शक म्हणून कंगनाचा हा पहिलाच प्रयत्न असला तरी तिनं हा काटेरी मुकुट यशस्वीरित्या पेललाय..चित्रपटाचा कँन्व्हासही मोठा आहे..

सिनेमातील अनेक संवाद अंगावर शहारे आणतात. तसेच सिनेमागृहात टाळ्या आणि शिट्टया वाजवायला भाग पाडतात.. एकूणचं काय तर आतापर्यंत केवळ पुस्तकातून वाचलेली झाशीची राणी लक्ष्मीबाईंची शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर बघणं पर्वणी आहे. त्यामुळे कंगनासाठी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर एकदा बघायला हरकत नाही..

 ‘टीव्ही नाईन मराठी’कडून मी या चित्रपटाला देतोय तीन स्टार्स

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.