AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

REVIEW : कसा आहे Section 375 ?

बलात्काराच्या संदर्भातीलच एक कायदा म्हणजे सेक्शन 375 (Section 375 Movie Review). दिग्दर्शक अजय बहलने (Ajay Bahl) या सिनेमातून सेक्शन 375 चे विविध पैलू मांडण्याचा प्रयत्न केला आहे.  

REVIEW : कसा आहे Section 375 ?
| Updated on: Sep 13, 2019 | 11:07 PM
Share

Section 375 Movie Review : रोज पेपर उघडल्यावर तसेच न्यूज चॅनलवर बलात्कार, लैंगिक शोषण, लैंगिक अत्याचाराच्या बातम्या दिसतात. महिलांवर होणाऱ्या या अत्याचाराविरोधात Me Too मोहिमही चांगलीच चर्चेत राहिली. 2012 साली झालेल्या निर्भया बलात्कार प्रकरणानंतर कायद्यात दुरुस्ती करण्यात आली. बलात्कार, लैंगिक अत्याचार या विषयांवर आतापर्यंत अनेक चित्रपट (Section 375 Movie Review) आलेत. बऱ्याच चित्रपटांमध्ये कोर्टरुम ड्रामाही तुम्ही बघितला असेल. या सगळ्या गोष्टी तुम्हाला नवीन नसल्या तरी दिग्दर्शक अजय बहलनं ज्या पध्दतीनं त्या या सिनेमात मांडल्या आहेत ते लाजवाब आहे. बॉलिवूडमध्ये गेल्या काही दिवसांपासून समाजाला आरसा दाखवणारे चित्रपट प्रदर्शित होतायेत. ‘आर्टिकल 15’ या सिनेमात जातीपातीच्या भेदभावावर भाष्य करण्यात आलं होतं, तर मनोज वाजपेयीच्या ‘अलीगढ’ या सिनेमात समलैंगिकता सारख्या प्रकरणांसाठी बनवलेल्या सेक्शन 377 वर प्रकाश टाकण्यात आला आहे. बलात्काराच्या संदर्भातीलच एक कायदा म्हणजे सेक्शन 375 (Section 375 Movie Review). दिग्दर्शक अजय बहलने (Ajay Bahl) या सिनेमातून सेक्शन 375 चे विविध पैलू मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

हा चित्रपट एक कोर्टरुम ड्रामा आहे. चित्रपट दिग्दर्शक रोहन खुराणा (राहुल भट)वर त्याची असिस्टंट कॉश्चुयम डिझाईनर अंजली डांगळे (मीरा चोप्रा) बलात्काराचा आरोप करते. त्यानंतर कोर्टातील नाट्य सुरु होते. यामध्ये दोषी सिध्द झालेल्या रोहनला 10 वर्षांची शिक्षा सुनावली जाते.

त्यानंतर रोहन हायकोर्टात अपील करतो. यावेळी रोहनच्या बाजूनं तरुण सलूजा (अक्षय खन्ना) (Akshay Khanna) ही केस लढवतो. तर पीडिता अंजलीच्या बाजूनं हिरल मेहता(रिचा चढ्ढा) ही सरकारी वकील केस लढवते. हायकोर्टात सुनावणीच्या वेळी ही केस पब्लिक आणि मीडियासमोर येते. त्यानंतर मग सुरु होतो आरोप-प्रत्यारोप, सत्य-असत्याचा खेळ. आता नेमकं सत्य काय? हे प्रकरण नेमकं काय असतं? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला ‘सेक्शन 375’ बघावा लागेल.

या चित्रपटाची कथा दिग्दर्शकानं दोन वेगळे दृष्टीकोन नजरेसमोर ठेऊन मांडण्याचा प्रयत्न केला आहे. एकाच साच्यात हा सिनेमा अडकलेला नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये हा सिनेमा उजवा ठरतो. तसेच कायदेशीर कारवाई किती किचकट आणि खडतर असते हे देखील दाखवण्याचा दिग्दर्शकानं प्रयत्न केला आहे.

खरतर इतर सिनेमांमध्ये बघितलेला तोच तो पणा या सिनेमात येण्याचा धोका होता. पण दिग्दर्शकानं मोठ्या खुबीनं हे टाळलं आहे. सिनेमात हा कोर्टरुम ड्रामा रसिकांना शेवटपर्यंत खुर्चीला खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरतो. अजयनं बलात्कारासारखा गंभीर मुद्दा खुपच संवेदनशीलपणे हाताळला आहे. ज्याप्रमाणे नाण्याच्या दोन बाजू असतात तसेच त्याचप्रमाणे कायद्याचा वापर करण्याचे पण दोन मार्ग असतात हे या सिनेमात अधोरेखित करण्यात आलं आहे. मध्यंतरानंतर आता काय होईल याचा अंदाज तुम्ही लावाल खरा, पण नेमकं त्याचा उलट होतं.

चित्रपटाचा धक्कादायक शेवट तुम्हाला विचार करायला भाग पाडतो. चित्रपटात कोर्टरुम ड्रामा दरम्यान बरेच प्रसंग ताणलेले वाटतात. जर हे टाळलं असतं तर चित्रपटाची गती कायम राखता आली असती. ‘कानून न्याय नही है, ये सिर्फ उसे पाने का हथियार है’ अक्षय खन्नाच्या तोंडी असलेले असे अनेक जबरदस्त संवाद टाळ्या वसूल करतात.

अक्षय खन्नानं पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे. तरुण सलूजाच्या भूमिकेत त्याने चांगलाच प्रभाव पाडला आहे. प्रत्येक फ्रेममध्ये अक्षयनं चांगलाच भाव खालला आहे. सरकारी वकील हिरलच्या भूमिकेत मात्र रिचा फिट दिसत नाही. रिचानं आपल्या भूमिकेला न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण तिच्यासमोर अक्षय खन्ना सारखा मुरलेला कलाकार असल्यामुळे ती फिकी पडली आहे. कदाचित रिचाची इमेज या भूमिकेच्या विरुध्द असल्यामुळे ती या भूमिकेत खटकते. कदाचित तिच्या जागी अजून दुसरी कोणी अभिनेत्री असती तर अक्षयसोबत तिची जुगलबंदी चांगलीच रंगली असती. राहुल भट आणि मीरा चोप्रानंही आपल्या भूमिका चोख निभावल्या आहेत.

एकूणच काय तर गंभीर विषय या सिनेमातून संवेदनशीलपणे हाताळण्यात आला आहे. जर सिनेमात काही चुका टाळून अजून छोट्या छोट्या गोष्टीवर भर दिला असता, तर हा सिनेमा अजून चांगला झाला असता. अक्षय खन्नाचा जबरदस्त अभिनय, उत्तम वन लाईन पंचेस यामुळे हा सिनेमा तुम्हाला निराश करणार नाही.

‘टीव्ही 9 मराठी’ कडून या सिनेमाला तीन स्टार्स.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.