Sushant Singh Rajput Case | CBI पथक चौकशीसाठी रियाच्या घरी जाण्याची शक्यता, चावीवाल्यापासून सुशांतच्या घरी पोहोचणाऱ्या पोलिसांची चौकशी

सीबीआयची टीम सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीच्या घरी तिची आणि तिच्या कुटुंबाची चौकशी करण्यासाठी जाणार आहे.

Sushant Singh Rajput Case | CBI पथक चौकशीसाठी रियाच्या घरी जाण्याची शक्यता, चावीवाल्यापासून सुशांतच्या घरी पोहोचणाऱ्या पोलिसांची चौकशी
Follow us
| Updated on: Aug 23, 2020 | 11:37 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास (CBI Will Investigate Rhea Chakraborty) सीबीआयकडे सोपवल्यानंतर आता सीबीआयच्या टीमने चौकशीला सुरुवात केली आहे. सीबीआयची टीम आज कुठल्याही वेळी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीच्या घरी तिची आणि तिच्या कुटुंबाची चौकशी करण्यासाठी पोहोचू शकते (CBI Will Investigate Rhea Chakraborty).

सीबीआयच्या टीमने काल (22 ऑगस्ट) सुशांत सिंह राजपूतच्या घरी आणि कूपर रुग्णालयात जाऊन चौकशी केली. कूपर रुग्णालयातच सुशांतचं शवविच्छेदन करण्यात आलं होतं. सीबीआयने आतापर्यंत सिद्धर्थ पिठाणी, नारज आणि दीपेश सावंत यांची चौकशी केली.

निरज आणि सिद्धार्थ पिठाणीची सीबीआयकडून चौकशी

निरज, सिद्धार्थ पिठाणी, दिपेश आणि केशव यांची पुन्हा होणार चौकशी होणार आहे. निरज आणि सिद्धार्थ पिठाणी डीआरडीओ गेस्ट हाऊसला पोहोचले आहेत. 13 आणि 14 जूनच्या घटनांची उजळणी त्यांच्याकडून केली जात आहे. निरजची तिसऱ्यांदा, सिद्धार्थ पिठाणी दुसऱ्यांदा चौकशी सुरु आहे. सुशांत रिया चक्रवर्तीच्या संपर्कात कसा आला, 8 जूनला रिया चक्रवर्ती घर सोडून गेली त्यादिवशी नक्की काय झालं, सिद्धार्थ पिठाणीला सीबीआयचा सवाल, सूत्रांनी माहिती दिली.

त्याशिवाय, सुशांतच्या घरी सर्वांत आधी पोहोचणाऱ्या पोलिसांची चौकशी होऊ शकते. लॉक मिस्ट्री समजून घेण्यासाठी ज्या चावीवाल्याने सुशांतच्या खोलीच्या दरवाज्याची चावी बनवली त्या रफीकची देखील चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच, रिया चक्रवर्तीला समन्स बजावून तिचा जबाब नोंदवला जावू शकतो.

गेल्या दोन दिवसांपासून रिया चक्रवर्ती घराबाहेर पडलेली नाही आणि आतापर्यंत कुठलीही टीम चौकशीसाठी आलेली नाही, अशी माहिती रिया चक्रवर्तीचा वॉचमन मनोज याने दिली.

पुतळा लटकवून सीन रिक्रिएट करणार

सुशांतच्या वजनाचा डमी पुतळा घरात फासावर लटकवून सीबीआय क्राईम सीन रिक्रिएट करणार असल्याची सुत्रांची माहिती आहे (CBI Will Investigate Rhea Chakraborty).

सीलिंग फॅन आणि बेडमध्ये नेमकं अंतर किती आहे? सहा फूट उंचीच्या सुशांतचे पाय फासावर लटकताना बेडवर होते, की खाली याची सीबीआय खातरजमा करणार आहे. सीबीआयची टीम सुशांतच्या घरी क्राईम सीन रिक्रिएट करण्यासाठी जाणार असल्याची माहिती आहे.

फॉरेंसिक टीम सीबीआयसोबत असेल. पोस्टमार्टेम, विसेरा, घरात उपस्थित असलेले चार साक्षीदार या सगळ्यांची पुन्हा चौकशी होण्याची शक्यता आहे.

सुशातंचा मित्र संदिप सिंहचीही चौकशी?

सुशांत सिंह राजपूतच्या तपासात सुशांतचा मित्र म्हणवणारा संदिप सिंह याचीही चौकशी सीबीआय करणार आहे. संदिप सिंह हा 14 जूनला पोस्टमार्टेम रुम आणि कूपर रुग्णालयात नितू लिंहसोबत वारंवार गेला होता. नितू लिंह सोबत त्याने फोटोही काढला होता. सुशांतचा तो जवळचा मित्र असल्याचं त्याने कुटुंबियांना सांगितलं होतं. त्याची दिनचर्या काय होती, तो सुशांतला कधीपासून ओळखतो, त्याच्यासोबत झालेले चॅट, त्याचे इतरांशी झालेल्या चॅट्सची, कॉल्सची चौकशी होणार आहे.  संदिप सिंह याचा सुशांत आत्महत्या प्रकरणात वापर झालाय का?, त्याने काही फाऊल प्ले केला आहे का याची चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

CBI Will Investigate Rhea Chakraborty

संबंधित बातम्या :

Sushant case | ‘मला सांगितलं लॉक तोड, पैशाची काळजी करु नको’, चावीवाल्याची माहिती

Sushant Singh Rajput case | CBI पथक कूपर रुग्णालयात, शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांची चौकशी

Sushant Singh Rajput case | सीबीआयची टीम अ‍ॅक्शन मोडमध्ये, मुंबई पोलिसांकडून डायरी, मोबाईल, लॅपटॉप सुपूर्द

Non Stop LIVE Update
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.