Raj Kundra : आता शिल्पा शेट्टीची वेळ, लवकरच…त्या गंभीर प्रकरणात मोठी अपडेट!
राज कुंद्र आणि शिल्प शेट्टी यांनी कथितपणे केलेल्या 60 कोटी रुपयांच्या फसवणुकीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणी नेमके काय होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Raj Kundra And Shilpa Shetty : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी हीचे पती राज कुंद्रा यांची मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पाच तास चौकशी केली. राज कुंद्रा यांच्यावर 60 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. याआधी राज कुंद्रा यांना 10 सप्टेंबर रोजी तपास अधिकाऱ्यांसमोर चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र मला चौकशीला हजर राहण्यासाठी 15 सप्टेंबरपर्यंत मुदत मिळावी, अशी मागणी केली होती. ही मागणी मुंबई पोलिसांनी मान्य केली होती. त्यानंतर आता राज कुंद्रा चौकशीसाठी हजर झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार शिल्पा शेट्टी हिलादेखील लवकरच पोलीस चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता आहे.
राज कुंद्रा यांची केली पाच तास चौकशी
मिळालेल्या माहितीनुसार मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने आज राज कुंद्रा यांचा 60 कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी जबाब नोंदवला. पुढील आठवड्यातही राज कुंद्राला पुन्हा समन्स बजावले जाण्याची शक्यता आहे. पुढच्या चौकशीत अनेक साक्षीदारांची पडताळणी केली जाणार आहे. आज राज कुंद्रा यांची साधारण पाच तास चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर शिल्पा शेट्टी हिलादेखील लवकरच बोलावले जाणार आहे. त्यामुळे आता आगामी काळा या प्रकरणात नेमके काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नेमके प्रकरण काय आहे?
शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा आणि आणखी एका व्यक्तीविरोधात ऑगस्ट 2025 मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या आरोपींनी एका व्यवसायिकाची तब्बल 60 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला होता. लोटस कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडडे संचालक दीपक कोठारी यांनी ही तक्रार दाखल केली होती. दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यानंतर पोलिसांनी चौकशी चालू केली होती.
व्यवसाय वाढवण्यासाठी पैसे घेतले होते, पण…
दाखल तक्रारीत साल 2015 ते 2023 या काळात फसवणूक झाल्याचे नमूद आहे. शिल्पा शेट्टी तसेच राज कुंद्रा यांनी त्याचा व्यवसाय वाढवण्यासाठी हे पैसे घेतले होते. याच प्रकरणी राज कुंद्रा यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. आता लवकरच शिल्पा शेट्टी हिलाही चौकशीला बोलावले जाणार असल्यामुळे आता या प्रकरणात नेमके काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
