AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

National Award Prize Money : शाहरुख, राणी, विक्रांतला राष्ट्रीय पुरस्कारासोबत मिळणार फक्त इतकेच रुपये

71st National Film Awards 2025 Prize Money in Rupees : जवळपास 33 वर्षांच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच अभिनेता शाहरुख खानला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. शुक्रवारी या पुरस्कारांची घोषणा झाली. ‘जवान’ या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. विक्रांत मेस्सीलाही हाच पुरस्कार विभागून जाहीर करण्यात आला आहे.

National Award Prize Money : शाहरुख, राणी, विक्रांतला राष्ट्रीय पुरस्कारासोबत मिळणार फक्त इतकेच रुपये
शाहरुख खान, राणी मुखर्जी आणि विक्रांत मेस्सीImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 04, 2025 | 3:28 PM
Share

71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा नुकतीच झाली. यंदा विजेत्यांच्या यादीतील अनेक आश्चर्यकारक नावं समोर आली. बॉलिवूडचा किंग अर्थात अभिनेता शाहरुख खानला जेव्हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला, तेव्हा त्याच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला. ‘जवान’ या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. परंतु हा पुरस्कार त्याला विभागून देण्यात आला आहे. ‘बारवी फेल’ या चित्रपटातील मुख्य अभिनेता विक्रांत मेस्सीसोबत त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार विभागून जाहीर करण्यात आला आहे. शाहरुखचं नाव जाहीर होताच जगभरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला. राष्ट्रीय पुरस्कार जिंकलेल्या शाहरुखला बक्षीस म्हणून किती रक्कम मिळणार, हा प्रश्न अनेकांना पडला आहे.

यंदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा किताब राणी मुखर्जीने पटकावला आहे. ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर सर्वोत्कृष्ट फिचर फिल्मचा पुरस्कार ‘बारवी फेल’, सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक सुदिप्तो सेन (द केरळ स्टोरी) आणि सर्वोत्कृष्ट स्क्रीनप्ले ‘बेबी’साठी (तेलुगू चित्रपट) साई राजेश नीलम यांना जाहीर झाला आहे.

बक्षिसाची रक्कम

राष्ट्रीय पुरस्कार जिंकणं हा कोणत्याही बक्षिसाच्या रकमेपेक्षा सर्वांत मोठा मान मानला जातो. तरीसुद्धा भारत सरकारकडून हा पुरस्कार जिंकणाऱ्या कलाकारांना ठराविक रक्कम बक्षिस म्हणून देण्यात येतं. सर्वांत मोठी रक्कम दादासाहेब फाळे पुरस्कार विजेत्यांना दिली जाते. त्यांना मेडल, प्रमाणपत्र आणि त्यासोबत 15 लाख रुपये मिळतात. त्यानंतर सुवर्ण कमळ जिंकलेल्यांना 3 लाख रुपये दिले जातात. तिसऱ्या क्रमांकावर रजत कमळ विजेत्यांना 2 लाख रुपये मिळतात.

View this post on Instagram

A post shared by Gauri Khan (@gaurikhan)

शाहरुख-राणीला किती पैसे मिळणार?

शाहरुख खान, विक्रांत मेस्सी आणि राणी मुखर्जी यांसारख्या कलाकारांना रजत कमळ पुरस्कार दिला जाईल. म्हणजेच त्यांना मेडल, प्रमाणपत्र आणि त्यासोबत दोन लाख रुपये बक्षिस म्हणून मिळणार आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका यांना रजत कमळ दिलं जातं. या सर्वांना दोन लाख रुपये बक्षिस मिळतं.

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म, सर्वोत्कृष्ट लोकप्रिय फिल्म यांसारख्या विभागातील विजेत्यांना सुवर्णकमळ दिलं जातं. त्याचसोबत त्यांना तीन लाख रुपये मिळतात.

राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.