‘नॅशनल क्रश’ रश्मिका मंदानाने नाकारली शाहिद कपूरच्या चित्रपटाची ऑफर, जाणून घ्या यामागचे कारण…

दक्षिणात्य मनोरंजन विश्वात आपल्या अभिनयाने धुमाकूळ घातल्यानंतर आभिनेतत्री रश्मिका मंदना (Rashmika Mandanna) आता बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्यास सज्ज झाली आहे.

‘नॅशनल क्रश’ रश्मिका मंदानाने नाकारली शाहिद कपूरच्या चित्रपटाची ऑफर, जाणून घ्या यामागचे कारण...
रश्मिका मंदना आणि शाहिद कपूर

मुंबई : दक्षिणात्य मनोरंजन विश्वात आपल्या अभिनयाने धुमाकूळ घातल्यानंतर आभिनेतत्री रश्मिका मंदना (Rashmika Mandanna) आता बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्यास सज्ज झाली आहे. तिच्या हातात बॉलिवूडचे 2 मोठे चित्रपट आहेत. ‘मिशन मजनू’ या चित्रपटाद्वारे रश्मिका बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या सिनेमात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​रश्मिका सोबत दिसणार आहे. अलीकडेच रश्मिकाने देखील सिद्धार्थबरोबर ‘मिशन मजनू’च्या सेटवरील एक फोटो शेअर केला होता. पण तुम्हाला माहिती आहे का की, रश्मिकाला तेलुगू जर्सीच्या (Jersey) हिंदी रिमेकसाठीही संपर्क साधण्यात आला होता, परंतु तिने हा चित्रपट करण्यास चक्क नकार दिला (National Crush Rashmika Mandanna rejects shahid kapoor starrer film Jersey).

रिपोर्ट्सनुसार रश्मिकानेही चित्रपटाला होकार दिला होता. पण, नंतर तिने तिला नकार दिला. वृत्तानुसार, रश्मिकाला वाटले की ती श्रद्धा श्रीनाथची भूमिका साकारू शकत नाही, म्हणूनच तिने हा प्रकल्प करण्यास नकार दिला आहे.

रश्मिकाने एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे की, ज्या चित्रपटात तिला असे वाटते की आपण आपले सर्वोत्तम देऊ शकणार नाही, तेव्हा ती सरळ नकार देते. तिच्या मते, जर्सीचा रिमेक खूप मोठा चित्रपट असणार आहे. कोणीही हा चित्रपट करू शकते. परंतु, तिला सेटवर उपस्थित राहण्याची इच्छा नाही, असे होऊ नये आणि तिला दिवसभर थकवा जाणवू नये, म्हणून तिने नाकारला आहे.

(National Crush Rashmika Mandanna rejects shahid kapoor starrer film Jersey)

मृणाल ठाकूर दिसणार शाहिदसोबत जर्सीमध्ये!

‘जर्सी’च्या हिंदी रिमेकमध्ये अभिनेता शाहिद कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री मृणाल ठाकूर आणि अभिनेते पंकज कपूर शाहिदसोबत महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसतील. या चित्रपटाचे दिग्दर्शन गौतम तिनोरी करत आहेत. गौतमनेच या चित्रपटाची तेलुगु आवृत्ती दिग्दर्शित केली होती. वयाच्या 30व्या वर्षी क्रिकेट संघात सामील होण्याची इच्छा असणाऱ्या एका व्यक्तीची ही कहाणी ‘जर्सी’मध्ये दाखवण्यात येणार आहे.

अमिताभ बच्चनसोबत ‘गुडबाय’मध्ये दिसणार रश्मिका

रश्मिका मंदानाने अमिताभ बच्चन यांच्यासह ‘गुडबाय’ या तिच्या दुसऱ्या बॉलिवूड चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण चंदीगड येथे केले जात आहे. गुडबायची कहाणी वडील आणि मुलीच्या नात्याभोवती फिरणारी आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत अद्याप कोणताही अहवाल मिळालेला नाही. या चित्रपटातून टीव्ही अभिनेता शिविनही बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. शिविनने बर्‍याच टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे.

(National Crush Rashmika Mandanna rejects shahid kapoor starrer film Jersey)

हेही वाचा :

Video | जॅकी श्रॉफसोबत पूलमध्ये धमाल करताना दिसली लेक कृष्णा, पाहा व्हिडीओ

Deepika Padukone | MAMIच्या अध्यक्षपदाचा राजीनामा, दीपिका पदुकोणने दिले मोठे कारण…

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI