नवाजुद्दीन AK Vs Ak वर खूश, अनिल कपूरने घेतली शाळा, म्हणतो, ‘तू पण या चित्रपटामध्ये आहेस विसरु नको!’

अलीकडेच नेटफ्लिक्सने  (Netflix) AK vs AK ही भारतातील पहिला मॉक्यूमेंट्री ड्रामा चित्रपट प्रदर्शित केला आहे.

नवाजुद्दीन AK Vs Ak वर खूश, अनिल कपूरने घेतली शाळा, म्हणतो, 'तू पण या चित्रपटामध्ये आहेस विसरु नको!'

मुंबई : अलीकडेच नेटफ्लिक्सने  (Netflix) AK vs AK भारतातील पहिला मॉक्यूमेंट्री ड्रामा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अनिल कपूर (Anil Kapoor) आणि अनुराग कश्यप (Anurag Kashyap) मुख्य भूमिकेत दिसले आहेत. हा चित्रपट प्रेक्षकांना ही खूप आवडला आहे. या चित्रपटात एका छोट्या भूमिकेत दिसलेला अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीनेही या चित्रपटाचे कौतुक केले आहे. या चित्रपटात नवाज केवळ एका फोन कॉलवर दिसतो. (Nawazuddin Siddiqui praised AK vs AK movie)

हा चित्रपट पाहिल्यानंतर नवाजुद्दीन सिद्दीकीने आपल्या ट्विटरवर चित्रपटाचे कौतुक केले. ज्यानंतर अनिल कपूरने त्याचे आभार मानले हा चित्रपट पाहिल्यानंतर नवाजुद्दीन सिद्दीकीने ट्वीट करून लिहिले की, “नुकताच मी AK vs AK @ Anuragkashyap72 आणि @AnilKapoor पाहिले तुम्ही खूप चांगला अभिनय केला आहे. हा चित्रपट @VikramMotwaneयांचा एक अनोखा आणि मनोरंजक प्रयोग आहे जो पूर्णपणे यशस्वी झाला आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या या ट्विटला उत्तर देताना अनिल कपूरने लिहिले की, “नवाझुद्दीन खूप खूप आभार, मला खात्री आहे की, तु पण या चित्रपटातील तुझा अभिनय पाहिला असशील असे म्हणत अनिल कपूर यांनी हसणारा आणि हार्ट इमोजी टाकला आहे.

हा चित्रपट अगोदर वादात सापडला होता. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर ट्रेलरमध्ये अनिल कपूरने भारतीय वायुसेनेचा गणवेश परिधान केलेला दिसत होता. यामध्ये मारामारी, शिव्या आणि डान्स भारतीय वायुसेनेचा गणवेश परिधान करून करण्यात आल्याचे दिसत होते. यामुळे भारतीय वायुसेनेने याबाबत दिग्दर्शक अनुराग कश्यपला पत्र लिहिले होते.

या पत्रात भारतीय हवाई वायुसेनेने म्हटले होते की, ट्रेलरच्या व्हिडिओमध्ये भारतीय वायुसेनेचा गणवेश चुकीचा पध्दतीने परिधान केलेला दिसत आहे. तसेच, गणवेश घालून वापरलेली भाषा अयोग्य आहे. हे भारताच्या सशस्त्र दलातील वर्तणुकीला सुसंगत नाही. संबंधित देखावे मागे घेणे आवश्यक आहे.

संबंधित बातम्या : 

Tandav Trailer Out : सत्ता, राजकारण आणि षडयंत्र, सैफच्या ‘तांडव’चे ट्रेलर लॉन्च!

New Entry | नव्या वर्षात धमाका करायला ‘दीपिका पादुकोण’ तयार, या चित्रपटातून येऊ शकते प्रेक्षकांच्या भेटीला!

(Nawazuddin Siddiqui praised AK vs AK movie)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI