SSR Death Case : सीबीआयच्या चौकशीत रिया-शौविक ड्रग्ज सेवन करत असल्याचा दावा, श्रुती मोदीला एनसीबीच्या समन्सची शक्यता

सुशांत सिंहची मॅनेजर राहिलेल्या श्रुती मोदीला एनसीबीचं समन्स निघण्याची शक्यता आहे (NCB may summons Shruti Modi in drugs connection).

SSR Death Case : सीबीआयच्या चौकशीत रिया-शौविक ड्रग्ज सेवन करत असल्याचा दावा, श्रुती मोदीला एनसीबीच्या समन्सची शक्यता
Follow us
| Updated on: Sep 05, 2020 | 2:54 PM

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात केंद्रीय स्तरावरील अनेक यंत्रणा खोलवर तपास करत आहेत. याच्याशी संबंधित प्रत्येक धागा बारकाईने तपासला जात आहे. त्याचाच भाग म्हणून आता सुशांत सिंहची मॅनेजर राहिलेल्या श्रुती मोदीला एनसीबीचं समन्स निघण्याची शक्यता आहे (NCB may summons Shruti Modi in drugs connection). श्रुती मोदीने सीबीआय चौकशी रिया-शौविक ड्रग्ज घेत असल्याचा दावा केला होता. हाच धागा पकडून एनसीबीने आपला मोर्चा श्रुती मोदीकडे वळवला आहे.

सुशांत सिंह मृत्यू प्रकरणातील ड्रग्ज अँगलची सखोल चौकशी करण्यासाठी एनसीबी श्रुती मोदीची चौकशी करण्याची शक्यता आहे. श्रुतीकडून याबाबत काही महत्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळेच एनसीबी आज सुशांतची मॅनेजर राहिलेल्या श्रुती मोदीला देखील समन्स पाठवू शकते. सुशांत प्रकरणातील ड्रग्ज अँगलचा तपास करणाऱ्या एनसीबीने आतापर्यंत 7 जणांना ताब्यात घेतलंय. त्यापैकी 2 जणांना जामीन मिळाला आहे. इतरही बॉलिवूडच्या अनेक कलाकारांना एनसीबी समन्स पाठवण्याची शक्यता आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या निकटवर्तीय स्मिता पारेख यांना देखील सीबीआयने समन्स पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रियाचं जुलै महिन्यात स्मितासोबत बोलणं झालं होतं. त्यावेळी रिया स्मिता पारेख यांना मी गेली तर सगळ्यांची नावं सांगेन, असं म्हणाली होती. सुशांतने स्मिताला सांगितलं होतं की जुनं घर सुरक्षेच्या दृष्टीने छान होतं, पण नव्या घरात माऊंट ब्लॅंक इथे सुरक्षा ठिक नव्हती, असं सुशांत म्हणाल्याचा दावा स्मिताने केला आहे. त्यामुळे सीबीआय स्मिताचंही स्टेटमेंट रेकॉर्ड करणार आहे.

दरम्यान, सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात एनसीबीने रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडाला अटक केली आहे. सुशांत सिंह प्रकणात ड्रग्जचे धागेदोरे असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर एनसीबीने मोठी कारवाई करत रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडाला अटक केली.

आज (5  सप्टेंबर) एनसीबी शोविक आणि मिरांडाला न्यायालयापुढे हजर करणार आहे. भावाच्या अटकेनंतर आता रियाच्या अडचणीही वाढणार आहेत. एनसीबी रियालाही समन्स बजावण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या :

 सुशांत सिंह प्रकरणात एनसीबीची मोठी कारवाई, अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविकला अटक

SSR Case | ‘शोविकच्या सांगण्यावरुन गांजा विकत घेऊन मिरांडाला द्यायचो’, एनसीबीच्या चौकशीत अबीदचा खुलासा

भल्या पहाटे धाड टाकून सॅम्युएल मिरांडाला उचललं, रियाच्या घरी पोहोचलेला NCB चा अधिकारी मराठी अभिनेत्रीचा पती

संबंधित व्हिडीओ :

NCB may summons Shruti Modi in drugs connection

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.