AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Drugs Case | ड्रग्ज प्रकरणी एनसीबी अधिकारी भारती सिंहच्या कर्मचार्‍यांचीही चौकशी करू शकतात!

ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी (Drugs Case) एनसीबी अधिकाऱ्यांनी भारती सिंग (Bharti Singh) आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया (Harsh Limachiyaa) यांना अटक केली आहे.

Drugs Case | ड्रग्ज प्रकरणी एनसीबी अधिकारी भारती सिंहच्या कर्मचार्‍यांचीही चौकशी करू शकतात!
भारतीने आपले शिक्षण अमृतसर येथून पूर्ण केले आहे. भारतीकडे इतिहास विषयाची पदवी आहे. ती केवळ एक चांगली कॉमेडियनच नाही तर, राष्ट्रीय स्तरावरील नेमबाजही आहे. नेमबाजीत तिने सुवर्णपदकही पटकावले आहे.
| Updated on: Nov 23, 2020 | 2:53 PM
Share

मुंबई : ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी (Drugs Case) एनसीबी अधिकाऱ्यांनी भारती सिंग (Bharti Singh) आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया (Harsh Limachiyaa) यांना अटक केली आहे. त्यांना कोर्टासमोर हजर केले असता दोघांनाही 4 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. याच दरम्यान आता एनसीबी भारतीच्या काही कर्मचार्‍यांचीही चौकशी करू शकते, असे म्हटले जात आहे. यासाठी लवकरच त्यांना समन्स पाठवला जाऊ शकतो. (NCB officers to probe Bharti Singh employees in drug case)

शनिवारी एनसीबीने भारती व हर्ष यांच्या घरावर आणि कार्यालयावर छापा टाकला, तेथून 86.5 ग्रॅम गांज्या सापडला. यानंतर दोघांची चौकशी करण्यात आली, चौकशी दरम्यान या दोघांनीही ड्रग्ज घेतल्याची कबुली दिली, त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. भारतीला लगेच अटक करण्यात आली होती तर हर्षची सुमारे 17 तास चौकशी केल्यानंतर त्यालाही अटक करण्यात आली. मीडिया रिपोर्टनुसार एनसीबीचे विभागीय अधिकारी समीर वानखेडे यांनी सांगितले की, भारती यांच्या काही कर्मचार्‍यांना आम्ही चौकशीसाठी बोलू शकतो. तसा समन्स पाठवला जाऊ शकतो.

ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी अटक करण्यात आलेल्या हर्ष लिंबाचिया (Harsh Limbachiyaa) आणि कॉमेडियन भारती सिंह (Bharti Singh) यांना कोर्टात हजर करण्यापूर्वी वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले होते. वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना थेट कोर्टात हजर केले गेले. शनिवारी भारतीला अटक करण्यात आली होती.

हर्ष आणि भारती यांना NCB ने आधीच समन्स बजावले होते. नंतर NCB ने भारतीच्या घरी धाड टाकून झाडाझडती केली, त्यावेळी तिच्या घरी संशयित वस्तू सापडल्यानंतर NCB च्या अधिकाऱ्यांनी दोघांना शनिवारी सकाळीच ताब्यात घेतले. मग संध्याकाळी चौकशीनंतर भारतीला अटक करण्यात आली होती. एनसीबीची धडक कारवाई एनसीबीने शनिवारी (21 नोव्हेंबर) खार दांडा येथे कारवाई केली होती. या ठिकाणाहून एका 21 वर्षीय तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडे 15 बॉटल एल. एस. डी. हे ड्रग आणि 40 ग्राम गांजासह नेट्राझेपम हे ड्रग्स स्वरूपातील औषध ही सापडले आहे. या ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या व्यक्तीच्या चौकशीत कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष यांचे नाव उघडकीस आले. यानंतर एनसीबी अधिकाऱ्यांनी भारती हिच्या घरी धाड टाकली असता, तिच्या घरी 86.5 ग्राम गांजा सापडला. भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष या दोघांनीही ते गांजा घेत असल्याची कबुली दिली आहे. यानंतर भारती सिंग आणि हर्ष लिंबाचियाला एनडीपीएस कायद्यानुसार अटक करण्यात आली. त्याच प्रमाणे इतर कारवाईत गुन्हा क्रमांक 33/20 मध्ये एनसीबीने मोठ्या प्रमाणात एमडी हे ड्रग्स जप्त केले आहे. एनसीबीने दोन फरार गुन्हेगारांना अटकही केली आहे.

संबंधित बातम्या :

Drugs Case | हर्ष-भारतीची वैद्यकीय चाचणी, ड्रग्ज प्रकरणी कोर्टात हजर करणार!

Drugs Case | गांजा घेत असल्याची कबुली, कॉमेडियन भारती सिंहला अटक

(NCB officers to probe Bharti Singh employees in drug case)

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.