AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सिनेमात ज्या अभिनेत्यासोबत रोमान्स केला, 5 वर्षांनंतर झाली त्याचीच सून… कोण आहे ‘ती’ माहितीये?

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री जिने दिग्गज अभिनेत्यासोबत केले रामान्स, त्याच अभिनेत्याची पाच वर्षांनंतर झाली सून... आज जगतेय आलिशान आणि रॉयल आयुष्य... कोण आहे 'ती', सध्या सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा...

सिनेमात ज्या अभिनेत्यासोबत रोमान्स केला, 5 वर्षांनंतर झाली त्याचीच सून... कोण आहे 'ती' माहितीये?
| Updated on: Apr 15, 2026 | 1:08 PM
Share

झगमगत्या विश्वात सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याची चर्चा कायम रंगत असते. असं अनेकदा झालं आहे की, ज्यांनी रुपेरी पडद्यावर भाऊ – बहिणीची भूमिका साकारली खऱ्या आयुष्यात तेच जोडीदार झालं. एवढंच नाही तर, बॉलिवूडची अशी एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे जिने, ज्या अभिनेत्यासोबत सिनेमात रोमान्स केला, त्याच अभिनेत्याची ती पाच वर्षांनंतर सून झाली. सध्या ज्या अभिनेत्यासोबत अभिनेत्री रोमान्स केला, तो अभिनेता कपूर कुटुंबातील आहे. सांगायचं झालं तर, कपूर कुटुंबाचा एक कठोर नियम होता आणि तो म्हणजे सूना आणि मुलींनी बॉलिवूडमध्ये काम करायचं नाही. पण कपूर कुटुंबात अशा एक महिलेची एन्ट्री झाली, जिने पुरुषांच्या बरोबरीने बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान भक्कम केलं.

सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेत्री नीतू कपूर आहेत. नीतू कपूर यांनी 1980 मध्ये ऋषी कपूर यांच्यासोबत लग्न केलं. पण लग्नाच्या पाच वर्षांपूर्वी नीतू कपूर यांनी ऋषी कपूर यांचं काका शशी कपूर यांच्यासोबत मोठ्या पडद्यावर रोमान्स केलेला. सिनेमातील ते रोमाँटिक गाणं देखील फार गाजलं आणि सिनेमा देखील ब्लॉकबास्टर ठरला.

सांगायचं झालं तर, 1975 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दीवार’ सिनेमात नीतू कपूर यांनी होणाऱ्या सासऱ्यांचा भाऊ शशी कपूर यांच्यासोबत ऑन-स्क्रिन गर्लफ्रेंडची भूमिका साकारली होती. त्यांच्यातील रोमाँटिक केमिस्ट्री देखील प्रेक्षकांना प्रचंड आवडली. सिनेमा देखील सुपरहीट ठरला… सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर 5 वर्षांनी नीतू कपूर यांनी ऋषी कपूर यांच्यासोबत लग्न केलं आणि शशी कपूर हे नीतू यांचे चूलत सासरे झाले. शशी कपूर हे नीतू कपूर यांचे सासरे आणि ऋषी कपूर यांचे वडील राज कपूर यांचे धाकटे भाऊ आहेत.

नीतू कपूर आणि ऋषी कपूर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, दोघांनी एकत्र जवळपास 10 पेक्षा अधिक सिनेमांमध्ये काम केलं, सिनेमांमध्ये काम करत असताना दोघांमध्ये मैत्री झाली आणि कालांतराने मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. अखेर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. लग्नानंतर नीतू कपूर यांनी बॉलिवूडचा निरोप घेतला आणि कुटुंबाला पूर्ण वेळ दिला. नीतू आणि ऋषी कपूर यांना दोन मुलं आहे. रणबीर आणि रिद्धीमा…

Follow Us
खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन
खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन.
राहुरी पोटनिवडणुकीच्या मतदानापूर्वीच राष्ट्रवादीला मोठा धक्का
राहुरी पोटनिवडणुकीच्या मतदानापूर्वीच राष्ट्रवादीला मोठा धक्का.
राज ठाकरे महापालिका आयुक्तांच्या भेटीसाठी मुंबई महानगरपालिकेत दाखल
राज ठाकरे महापालिका आयुक्तांच्या भेटीसाठी मुंबई महानगरपालिकेत दाखल.
ठाकरेंनी नकार दिला तर या महिला नेत्याला विधान परिषदेत जाण्याची संधी
ठाकरेंनी नकार दिला तर या महिला नेत्याला विधान परिषदेत जाण्याची संधी.
भाजपचं कॅरेक्टर, चरित्र, ढोंग काय आहे हे त्या प्रकरणात दिसतंय
भाजपचं कॅरेक्टर, चरित्र, ढोंग काय आहे हे त्या प्रकरणात दिसतंय.
संसदेत शाब्दिक चकमक; संजय राऊतांचे भाजपवर तीव्र शब्दांत टीकास्त्र
संसदेत शाब्दिक चकमक; संजय राऊतांचे भाजपवर तीव्र शब्दांत टीकास्त्र.
नाशिक धर्मांतर प्रकरणातील 7 जण अटकेत,मुख्य सूत्रधार निदा खान कुठे फरार
नाशिक धर्मांतर प्रकरणातील 7 जण अटकेत,मुख्य सूत्रधार निदा खान कुठे फरार.
नारी शक्ती विधेयकावर लोकसभेत घमासान; अरविंद सावंतांचा सरकारला सवाल
नारी शक्ती विधेयकावर लोकसभेत घमासान; अरविंद सावंतांचा सरकारला सवाल.
महिला आरक्षणावरून कोल्हेंचा हल्लाबोल; सत्ताधाऱ्यांना अप्रत्यक्ष टोला
महिला आरक्षणावरून कोल्हेंचा हल्लाबोल; सत्ताधाऱ्यांना अप्रत्यक्ष टोला.
विधेयकाचं क्रेडिट तुम्ही घ्या, आम्ही ब्लँकचेक... मोदी असं का म्हणाले?
विधेयकाचं क्रेडिट तुम्ही घ्या, आम्ही ब्लँकचेक... मोदी असं का म्हणाले?.