मुंबई- नेहा कक्कर (Neha Kakkar) आणि फाल्गुनी पाठक (Falguni Pathak) ही गायनक्षेत्रातील दोन लोकप्रिय नावं गेल्या काही दिवसांपासून वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहेत. ‘मैंने पायल है छनकाई’ या फाल्गुनीच्या गाण्याचा रिमेक नुकताच नेहाने बनवला. मात्र हा रिमेक फारसा कोणाला आवडला नसल्याचं दिसून येतंय. यावरून नेहाला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं जातंय. इतकंच नव्हे तर फाल्गुनीनेही तिची नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली. हा वाद झाल्यानंतर आता इंडियन आयडॉल 13 च्या (Indian Idol 13) मंचावर फाल्गुनी आणि नेहाला एकत्र पाहिलं गेलंय. यामुळे चाहते चांगलेच पेचात पडले आहेत.