जेठालाल उर्फ ​​दिलीप जोशीला नवीन ऑफर्स, ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मालिका सोडणार?

जेठालाल उर्फ ​​दिलीप जोशीला नवीन ऑफर्स, 'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिका सोडणार?

मुंबई : सोनी सब टिव्हीवरच्या ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मालिकेची देशभर आणि जगभरात चांगलीच फॅन फॉलोव्हिंग आहे. आज शोच्या प्रत्येक कलाकाराने लोकांच्या घरांमध्ये तसेच अभिनयाने त्यांच्या मनामध्ये एक स्थान निर्माण केले आहे. आता चर्चा सुरू आहे की, मालिकेमधील जेठालालचे पात्र साकारणारे दिलीप जोशीला नवीन ऑफर्स येत आहेत. दिलीप जोशी यांनी स्वत: एका युट्यूब वाहिनीवर याचा खुलासा केला आहे. (New offers to Dilip Joshi,Tarak Mehta Ka Ulta Chashma)

दिलीप जोशी म्हणणे की, त्यांना बर्‍याच नवनवीन ऑफर येत आहेत, परंतु त्यांनी त्यास नकार दिला आहे. त्याचे म्हणणे आहे की, तारक मेहता का उलटा चष्मा मालिका ते सोडणार नाहीत. कारण त्या मालिकेने त्यांचे आयुष्य बदलले आहे. दिलीप जोशीचे वेळापत्रक खूप व्यस्त असते. कारण ते दररोज ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ चे शूटिंग करतात.

दिलीप जोशी पुढे म्हणाले की, या मालिकेच्या माध्यमातून, माझे सर्व स्वप्न पूर्ण झाले आहेत. म्हणूनच नवीन ऑफर नाकारून या मालिकेमध्ये राहण्याचे निवडले आहे. या मालिकेने मला एवढी ओळख दिली आहे की, लोक मला दिलीप जोशी या नावापेक्षाही जास्त जेठालाल या नावाने ओळखतात. तारख मेहता का उलटा चष्मा या मालिकेने मला ओळख दिली आहे.

दिलीप जोशीने बर्‍याच टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. सलमान खान, अर्जुन रामपाल यासारख्या अनेक प्रसिद्ध कलाकारांसोबत त्याने काम केले आहे. पण ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ ने त्याला दिलेली ओळख, तो कधीही विसरू शकत नाही. त्याने अभिनय क्षेत्रात जवळजवळ एक दशक व्यतीत केले आहे. पूर्वी तो बॅक आर्टिस्ट म्हणून काम करायचा आणि आज तो प्रत्येक घरात ओळखला जातो.

संबंधित बातम्या :

अभिनेत्री आर्या बॅनर्जी मृत्यू प्रकरणी मोठा खुलासा, पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये ‘हे’ आले समोर!

Bigg Boss 14 | गायक राहुल वैद्यचा इमोशनल ड्रामा; सलमान म्हणाला, पळपुटा!

Global Instagram Influencers | पंतप्रधान मोदींपेक्षाही विराट पुढे, अनुष्का कुठल्या क्रमांकावर तुम्हीच पहा…

(New offers to Dilip Joshi,Tarak Mehta Ka Ulta Chashma)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI