AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Global Instagram Influencers | पंतप्रधान मोदींपेक्षाही विराट पुढे, अनुष्का कुठल्या क्रमांकावर तुम्हीच पहा…

मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि तिचा नवरा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या ऐकमेंकाबरोबर वेळ घालत आहेत. विराट आणि अनुष्का दोघेही आपल्या चाहत्यांसाठी इन्स्टाग्रामवर वेगवेगळे फोटो शेअर करत असतात. दरम्यान, जगभरातील इन्स्टाग्रामवरील प्रसिध्द व्यक्तींची यादी जाहिर झाली आहे. या यादीत अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने पहिल्या 25 मध्ये स्थान मिळवले […]

Global Instagram Influencers | पंतप्रधान मोदींपेक्षाही विराट पुढे, अनुष्का कुठल्या क्रमांकावर तुम्हीच पहा...
| Updated on: Dec 13, 2020 | 11:37 AM
Share

मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि तिचा नवरा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या ऐकमेंकाबरोबर वेळ घालत आहेत. विराट आणि अनुष्का दोघेही आपल्या चाहत्यांसाठी इन्स्टाग्रामवर वेगवेगळे फोटो शेअर करत असतात. दरम्यान, जगभरातील इन्स्टाग्रामवरील प्रसिध्द व्यक्तींची यादी जाहिर झाली आहे. या यादीत अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने पहिल्या 25 मध्ये स्थान मिळवले आहे. (Global Instagram Influencers Anushka Sharma and Virat Kohli in the top 25)

त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॅटरिना कैप आणि दीपिका पादुकोण यांची नावेही टॉप 50 च्या यादीत आहेत. प्रसिद्ध फुटबॉल खेळाडू क्रिस्टियानो रोनाल्डोला यादीत प्रथम स्थान मिळाले आहे. या यादीत 25 मध्ये स्थान मिळविणारा विराट कोहली हा पहिला भारतीय ठरला आहे. विराट कोहली 11 व्या क्रमांकावर आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या यादीमध्ये 17 वा क्रमांकावर आहेत. बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये अनुष्का शर्मा सर्वात पुढे आहे. अनुष्काला या यादीत 24 वा क्रमांक मिळाला आहे. अनुष्का शर्माच्या प्रत्येक पोस्टवर 2.6 मिलियन ऑथेंटिकेट इंगेजमेंट होते. कतरिना आणि दीपिका पादुकोणचे नाव या यादीत पहिल्या 50 मध्ये शेवटचे आहे. तर कतरिना 43 व्या स्थानावर आहे, तर दीपिकाने 49 वा क्रमांक मिळवला आहे. अलीकडेच अनुष्का आणि विराटने त्यांच्या लग्नाचा तिसरा वाढदिवस साजरा केला आहे. यावेळी सोशल मिडिसावर अनुष्काने एक फोटो शेअर केला होता, त्यामध्ये अनुष्का विराटला मागून मिठी मारताना दिसत होती. तो फोटो शेअर करताना अनुष्काने लिहले होते की, आपल्या लग्नाला तीन वर्ष पूर्ण झाली आहेत, आणि आता आपण तीन होणार आहोत.

प्रेग्नेंसी होम टेस्ट किट बनविणारी आघाडीची कंपनी प्रेगा न्यूजने आज बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा हिची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवड केली आहे. पूर्वी त्याची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर करिना कपूर खान होती. यावेळी कंपनीने करिना ऐवजी अनुष्काची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवडले आहे. करिना ऐवजी अनुष्काला कंपनीने ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनवल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे.

या बदलाचे एक कारण असेही असु शकते की अनुष्का पहिल्यांदाच आई होणार असल्यामुळे तिच्या प्रेग्नन्सीबद्दल मीडियामध्ये जास्त चर्चा आहे. ‘प्रेगा न्यूज’ होम प्रेग्नन्सी टेस्ट किटमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. अनुष्का जानेवारी 2021मध्ये बाळाला जन्म देणार आहे.

संबंधित बातम्या :

गरोदरपणावर अनुष्का शर्मा म्हणते…

Virat Anushka | विराटही विचारतो ‘जेवलीस का?’, मैदानातून अनुष्काला खाणाखुणा

(Global Instagram Influencers Anushka Sharma and Virat Kohli in the top 25)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.