Kangana Ranaut: नवी नवेली दुल्हन यामी गौतमनं जिंकलं कंगनाचं मनं, कंगनानं दिल्या हटके शुभेच्छा

यामी आणि आदित्यचं लग्न हिमाचल प्रदेशमध्ये झालं. आता बॉलिवूड कलाकार पोस्ट शेअर करत यामीला लग्नासाठी शुभेच्छा देत आहेत. (Newlywed bride Yami Gautam wins Kangana's heart, best wishes from Kangana)

Kangana Ranaut: नवी नवेली दुल्हन यामी गौतमनं जिंकलं कंगनाचं मनं, कंगनानं दिल्या हटके शुभेच्छा

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमनं (Yami Gautam) नुकतंच दिग्दर्शक आदित्य धरसोबत (Aditya Dhar) लग्नगाठ बांधली. दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामीनं तिच्या लग्नाचे फोटो शेअर करत आश्चर्याचा धक्का दिला. यामी आणि आदित्यचं लग्न तिच्या मूळ गावी म्हणजेच हिमाचल प्रदेशमध्ये झालं. आता बॉलिवूड कलाकार पोस्ट शेअर करत यामीला लग्नासाठी शुभेच्छा देत आहेत. यामी पहाडी वधू झाल्याचं पाहून कंगना रनौत (Kangana Ranaut) खूप खूश झाली. तिनं यामीचा फोटो आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे.

कंगनानं केलं कौतुक

यामीच्या लग्नाचा फोटो शेअर करत कंगनानं लिहिलं – परंपरा आणि काळापेक्षा जुने. पहाडी वधू होण्यापेक्षा मोठं काहीही असू शकत नाही. फोटोमध्ये यामीनं रेड कलरची साडी परिधान केली आहे आणि ती छल्ला दाखवत हसताना दिसत आहे.

पाहा कंगनाची इन्स्टाग्राम स्टोरी

Kangana Ranaut

कंगना रनौत हिमाचल प्रदेशमध्ये मनाली येथे मोठी झाली आहे. ती सध्या आपल्या कुटुंबासोबत मनालीमध्ये राहत आहे. दुसरीकडे, यामी हिमाचल प्रदेशमधील बिलासपूरची आहे.

सोशल मीडिया चाहत्यांसाठी फोटो शेअर

लग्नझाल्यापासून यामी सोशल मीडिया चाहत्यांसाठी तिचे वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत आहे. असं म्हटलं जातं की यामी आणि आदित्यच्या लग्नात केवळ 18 जण उपस्थित होते. यामी गौतम हिमाचल प्रदेशच्या बिलासपूर जिल्ह्यातील आहे. त्याचबरोबर आदित्यनं उरीच्या माध्यमातून दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं आहे. यामी या सिनेमात एका विशेष भूमिकेत दिसली होती, मात्र चाहत्यांच्या मनात एक प्रश्न आहे की या दोघांचं नातं कधी आणि कसं सुरू झालं.

लग्नानंतरचा पहिला फोटो

आता लग्नानंतर यामीचा पहिला फोटो समोर आला आहे ज्यामध्ये ती नवीन वधूच्या रूपात दिसत आहे. हिरव्या रंगाची साडी, सिंदूर, गळ्यात मंगळसूत्र आणि हातात बांगड्या परिधान केलेली यामी खूप सुंदर दिसत आहे. यामीचा हा फोटो तिच्या लग्नासाठी आलेल्या कॅटरर्स आणि डेकोरेटर गितेश शर्मा यांनी शेअर केला आहे. यामी आणि आदित्य या दोघांसोबत त्यानं एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाहा फोटो

 

View this post on Instagram

 

A post shared by Gitesh Sharma (@royal_group3333)

संबंधित बातम्या 

Khoya Khoya Chand : ‘जुम्मा चुम्मा’ गाण्यावरअमिताभसोबत धमाल, आता कुठे आहे किमी?

Coronavirus : ‘कोरोना रोखण्यासाठी हवन करा, मी रोज करते, तुम्हीही करा…’, खासदार हेमा मालिनींचं धक्कादायक विधान

Photo : पलक तिवारीने शेअर केले ‘हे’ फोटो; चाहते म्हणाले, ‘मम्मी मारेगी…

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI