AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

News9 Global Summit 2025 : हाउसफुल 3 आणि हाउसफुल 5 मध्ये कोणता चित्रपट उत्तम? नरगिस फाखरी म्हणाली…

नरगिस फाखरीने टीव्ही9 च्या ग्लोबल समिटमध्ये तिच्या बॉलिवूड प्रवासाबद्दल बोलताना "हाउसफुल 3" आणि "हाउसफुल 5" या चित्रपटांतील तिच्या अनुभवांची तुलना केली. तिने सिनेसृष्टीत नसती तर होलिस्टिक हीलर बनली असती असेही सांगितले.

News9 Global Summit 2025 : हाउसफुल 3 आणि हाउसफुल 5 मध्ये कोणता चित्रपट उत्तम? नरगिस फाखरी म्हणाली...
nargis fakhri (1)
| Updated on: Jun 20, 2025 | 1:13 PM
Share

बॉलिवूड अभिनेत्री नरगिस फाखरी टीव्ही 9 नेटवर्कच्या दुबईमध्ये ‘न्यूज 9 ग्लोबल समिट’मध्ये हजेरी लावली. यावेळी तिने तिच्या बॉलिवूडमधील तिच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल मनमोकळेपणाने सांगितले. नरगिस फाखरीने परदेशातून येऊन बॉलिवूडमध्ये नाव कमावणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत स्थान मिळवले आहे. तिने आतापर्यंत अनेक उत्कृष्ट चित्रपटात काम केले आहे. पण जर ती चित्रपटसृष्टीत आली नसती, तर तिने काय केले असते, याबद्दल नरगिसने भाष्य केले आहे. यावेळी तिने तिच्या आयुष्याच्या विविध पैलूंबद्दल चर्चा केली.

‘हाऊसफुल 3’ आणि ‘हाऊसफुल 5’ कोणता चित्रपट सर्वात चांगला होता?

नरगिस फाखरीला ‘डायरी ऑफ अ रॉकस्टार’मध्ये मुलाखतीदरम्यान ‘हाऊसफुल 3’ आणि ‘हाऊसफुल 5’ या दोन चित्रपटांमधील कोणता चित्रपट सर्वात चांगला होता? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तिने भाष्य केले. हा काय प्रश्न आहे? मी दोघांपैकी एका चित्रपटाची निवड कशी करु? हाऊसफुल 3 आणि हाऊसफुल 5 या दोन्ही चित्रपटात काम करताना मला फारच मस्त वाटले. या दोन्ही चित्रपटात फक्त एकच फरक होता तो म्हणजे माझा वेळ. मी हाऊसफुल 3 पेक्षा हाऊसफुल 5 या चित्रपटात जास्त वेळ काम केले.

कारण मी त्या चित्रपटाच्या शूटींगवेळी जास्त लोकांशी बोलले. सर्वांसोबत मिसळले आणि सहकलाकरांना चांगल्या प्रकारे समजून घेतले. मी या काळात खूप ऑथेंटिक होते. मी स्वत: तो काळ आनंदाने घालवला, असे नरगिसने म्हटले.

सिनेसृष्टीत नसतीस तर काय काम करत असतीस?

यानंतर नरगिस फाखरीला जर तू या सिनेसृष्टीत नसतीस तर काय काम करत असतीस, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तिने सविस्तरपणे उत्तर दिले. जर मी चित्रपटसृष्टीत नसती तर हॉलेस्टिक हीलर असते. मी त्याबद्दल खूप अभ्यास केला आहे. तसेच याबद्दल मी चांगले संशोधनही केले आहे. त्यामुळे मी त्याबद्दलच काहीतरी काम केले असते, असे नरगिस फाखरीने म्हटले.

दरम्यान नरगिस फाखरी अलीकडेच अक्षय कुमारच्या ‘हाउसफुल 5’ या मल्टीस्टारर चित्रपटात झळकली. त्या ‘हाउसफुल 4’चा भाग नव्हत्या, परंतु २०१६ मध्ये आलेल्या ‘हाउसफुल 3’ मध्ये त्या झळकल्या होत्या. सध्या, नरगिस पवन कल्याणच्या ‘हरी हरा वीरा मल्लू’ या चित्रपटात मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहेत.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.