OMG 2 OTT release | ‘ओह माय गॉड 2’ आता ओटीटीवर; जाणून घ्या कधी अन् कुठे पाहू शकता चित्रपट?

‘ओह माय गॉड 2’ हा चित्रपट पाहिल्यानंतर त्याविषयी पडलेल्या सर्व प्रश्नांचा विसर पडतो. पहिल्या भागात दिखाऊपणावर जितका धारदार प्रहार होता, तितकाच आता या सीक्वेलमध्येही पहायला मिळतो. दुसऱ्या भागत लैंगिक शिक्षण या विषयावरील संकुचित विचारसरणीचा मुद्दा मांडण्यात आला आहे.

OMG 2 OTT release | 'ओह माय गॉड 2' आता ओटीटीवर; जाणून घ्या कधी अन् कुठे पाहू शकता चित्रपट?
Pankaj Tripathi in OMG 2Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 03, 2023 | 5:32 PM

मुंबई | 3 ऑक्टोबर 2023 : अभिनेता अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी यांचा ‘ओह माय गॉड 2’ हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. याच दिवशी सनि देओल आणि अमिषा पटेल यांचा बहुचर्चित ‘गदर 2’ हा चित्रपटसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. बॉक्स ऑफिसवर ‘गदर 2’ला प्रचंड यश मिळत असतानाही ‘ओह माय गॉड 2’ने देशभरात शंभर कोटी रुपयांपेक्षा अधिक गल्ला जमवला. अमित राय दिग्दर्शित या चित्रपटाचं प्रेक्षक आणि समीक्षकांकडून विशेष कौतुक झालं. आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे.

ओटीटीवर प्रदर्शनाची तारीख

‘ओह माय गॉड 2’ या चित्रपटातून अत्यंत महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील विषयावर प्रकाश टाकण्यात आला आहे. सेक्स एज्युकेशनचं महत्व आणि त्याबद्दल असणाऱ्या गैरसमजुतींवरून पडदा उचलणाऱ्या या चित्रपटाला सुरुवातीला बऱ्याच आव्हानांना सामोरं जावं लागलं होतं. उज्जैनमधल्या महाकालेश्वर मंदिराच्या पुजाऱ्यांनी चित्रपटावर बंदीची मागणी केली होती. इतकंच नव्हे तर सेंन्सॉर बोर्डाने चित्रपटाला ‘अ’ प्रमाणपत्र दिलं. त्यामुळे त्याचा प्रेक्षकवर्ग मर्यादित होता. आता जवळपास दोन महिन्यानंतर हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. येत्या 8 ऑक्टोबरपासून नेटफ्लिक्सवर तुम्ही हा चित्रपट पाहू शकता. मंगळवारी सकाळी नेटफ्लिक्सने याबद्दलची माहिती सोशल मीडियाद्वारे दिली.

अक्षय कुमारची प्रतिक्रिया

चित्रपटाच्या ओटीटी रिलीजबद्दल बोलताना अक्षय कुमार म्हणाला, “‘ओह माय गॉड 2’ला थिएटरमध्ये मिळालेला उत्तम प्रतिसाद पाहून आम्ही थक्क झालो होतो. ही कथा आणखी बऱ्याच प्रेक्षकांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि नेटफ्लिक्स या प्लॅटफॉर्मद्वारे ते शक्य होऊ शकतं. हा चित्रपट मोठ्या प्रेक्षक वर्गापर्यंत पोहोचू शकतो.” या चित्रपटात अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी यांच्याशिवाय यामी गौतम धर, पवन मल्होत्रा, गोविंद नामदेव, विजेंद्र काला आणि आरुष वर्मा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

हे सुद्धा वाचा

या चित्रपटाला सुरुवातीला बऱ्याच विरोधाला सामोरं जावं लागलं होतं. कारण सेक्स एज्युकेशनसारखा मुद्दा यातून मांडण्यात आला आहे. सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटात वीसहून अधिक बदल सुचवले होते आणि त्याला ‘अ’ प्रमाणपत्र दिलं. सेक्स एज्युकेशनचा मुद्दा किशोरवयीन मुलांसाठी अत्यंत महत्त्वाचा असूनही त्याच वर्गाला चित्रपट पाहण्यापासून वंचित ठेवलं, यावरून काही कलाकारांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती.

Non Stop LIVE Update
मानेंच्या बॅनरवर विकासकामांची माहिती देणारं QR कोड, पण स्कॅन केलं अन..
मानेंच्या बॅनरवर विकासकामांची माहिती देणारं QR कोड, पण स्कॅन केलं अन...
'तू बदनाम कर, तेरी औकात...', कुठे झळकले भावना गवळी यांचे बॅनर्स?
'तू बदनाम कर, तेरी औकात...', कुठे झळकले भावना गवळी यांचे बॅनर्स?.
... अन् बिबट्यानं ठोकली धूम, वनविभागाकडून शोधमोहीम सुरू
... अन् बिबट्यानं ठोकली धूम, वनविभागाकडून शोधमोहीम सुरू.
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, राज्यभरात आजपासून...
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, राज्यभरात आजपासून....
पवार काका-पुतणे भविष्यात एकत्र येणार? अजितदादा स्पष्टच म्हणाले, आमचं..
पवार काका-पुतणे भविष्यात एकत्र येणार? अजितदादा स्पष्टच म्हणाले, आमचं...
कोल्हे Vs दादा; पवारांच्या टीकेवर लाव रे तो व्हिडीओनं कोल्हेंचं उत्तर
कोल्हे Vs दादा; पवारांच्या टीकेवर लाव रे तो व्हिडीओनं कोल्हेंचं उत्तर.
महायुतीच्या जागेचा फॉर्म्युला, शाहांच्या उपस्थितीत शिक्कामोर्तब होणार
महायुतीच्या जागेचा फॉर्म्युला, शाहांच्या उपस्थितीत शिक्कामोर्तब होणार.
वेळीच गुंडांना आवर घाला... हर्षवर्धन पाटलांचं गृहमंत्र्यांकडे गाऱ्हाणं
वेळीच गुंडांना आवर घाला... हर्षवर्धन पाटलांचं गृहमंत्र्यांकडे गाऱ्हाणं.
सेलिब्रिटी उमेदवार देणं ही चूक, अजित पवारांच्या आरोपावर कोल्हेंचा वार
सेलिब्रिटी उमेदवार देणं ही चूक, अजित पवारांच्या आरोपावर कोल्हेंचा वार.
भाजपाशी मनसेची युती होणार? काय म्हणाले बाळा नांदगावकर
भाजपाशी मनसेची युती होणार? काय म्हणाले बाळा नांदगावकर.