Dhanush Jagame Thandhiram trailer | चाहत्यांच्या पसंतीस उतरतोय धनुषचा गँगस्टर लूक, पाहा ‘जगमे थंदीरम’चा जबरदस्त ट्रेलर

अभिनेता धनुषचा आगामी चित्रपट ‘जगमे थंदीरम’ लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. पण हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी निर्मात्यांनी ‘जगमे थंदीरम’चा ट्रेलर रिलीज केला आहे. सोशल मीडियावर ‘जगमे थंदीराम’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Dhanush Jagame Thandhiram trailer | चाहत्यांच्या पसंतीस उतरतोय धनुषचा गँगस्टर लूक, पाहा ‘जगमे थंदीरम’चा जबरदस्त ट्रेलर
जगमे थंदीरम

मुंबई : सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे देशभरातील सिनेमा हॉल बर्‍याच काळापासून बंद आहेत. यामुळे चित्रपट निर्मात्यांनी एकतर त्यांच्या संबंधित चित्रपटांची रिलीज तारीख पुढे ढकलली आहे किंवा ते ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट रिलीज करत आहेत. येत्या काही दिवसांत दक्षिण आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक चित्रपट ओटीटीच्या व्यासपीठावर प्रदर्शित होणार आहेत. आता या यादीमध्ये दक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीचा प्रसिद्ध सुपरस्टार अभिनेता धनुष (Dhanush) याचा चित्रपट ‘जगमे थंदीरम’ (Jagame Thandhiram) याचेही नाव समाविष्ट झाले आहे (Dhanush upcoming movie Jagame Thandhiram trailer released).

अभिनेता धनुषचा आगामी चित्रपट ‘जगमे थंदीरम’ लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. पण हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी निर्मात्यांनी ‘जगमे थंदीरम’चा ट्रेलर रिलीज केला आहे. सोशल मीडियावर ‘जगमे थंदीराम’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

कशी आहे धनुषची भूमिका?

‘जगमे थंदीरम’ या चित्रपटात अभिनेता धनुष गुंडाच्या भूमिकेत दिसणार आहे. ट्रेलरमध्ये अभिनेता धनुष याची गँगस्टर भूमिका पाहिल्यानंतर त्याचे चाहतेही चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल बोलायचे, तर यात अभिनेता धनुष लंडनच्या रस्त्यावर मोठ्या गुंडांशी हाणामारी करताना दिसतो आहे.

पाहा ट्रेलर :

चाहत्यांना देखील उत्सुकता!

ट्रेलर वरून ‘जगमे थंदीरम’मधील त्याची भूमिका बरीच रंजक असल्याचे दिसत आहे. आता धनुषचे चाहते ‘जगमे थंदीरम’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहेत. धनुषचा ‘जगमे थंदीरम’ हा चित्रपट येत्या 18 जून रोजी प्रसिद्ध ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात धनुष व्यतिरिक्त अभिनेत्री ऐश्वर्या लक्ष्मी जेम्स आणि अभिनेता जोजू जॉर्ज सारखे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचे संगीत संतोष नारायण यांनी दिले आहे (Dhanush upcoming movie Jagame Thandhiram trailer released).

‘धनुष’च्या ‘कर्णन’लाही उदंड प्रतिसाद

सुपरस्टार धनुषचा (Dhanush) ‘कर्णन’  हा चित्रपट गेल्या महिन्यात चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. परंतु, देशातील कोरोनाची बिघडलेली परिस्थिती आणि लॉकडाऊनमुळे हा चित्रपट जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकला नाही. पण गेल्या आठवड्यात हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला आणि चित्रपटाने संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं आहे.

जेव्हा कधी एखादी लढाई लढली जाते, तेव्हा ती लढाई लढणाऱ्या दोन पक्षांच्या दोन बाजू असतात. त्यातल्या एका पक्षाला स्वतःला सर्वात सामर्थ्यवान घोषित करायचं असतं, तर दुसरा स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष करत असतो. किंवा तो त्याच्या सर्व्हायव्हलसाठी लढत असतो. मारी सेल्वराज (Mari Selvaraj) या दिग्दर्शकाने ‘कर्णन’ (Karnan) या चित्रपटाद्वारे अशीच एक सर्व्हायव्हल स्टोरी आपल्यासमोर मांडली आहे. पण ही सर्व्हायव्हल स्टोरी कोणा एका व्यक्तीची नाही, तर एका संपूर्ण गावाची आहे. धनुष यात मुख्य भूमिकेत पाहायला मिळाला आहे. या चित्रपटाला देखील प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे.

(Dhanush upcoming movie Jagame Thandhiram trailer released)

हेही वाचा :

Best Feature Films : शॉर्टफिल्म पाहून बनवले गेले ‘हे’ जबरदस्त चित्रपट, पाहून आजही प्रेक्षक म्हणतात व्वा!

First Look : अल्लू सिरीशकडून प्री-लुक पोस्टर शेअर करत आगामी चित्रपटाची घोषणा!

Published On - 2:57 pm, Tue, 1 June 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI