Hungama 2 | ‘जो तकलीफ देनी थी आपने दे दी’, ‘हंगामा 2’च्या ट्रेलर रिलीजनंतर सोशल मीडियावर मीम्सचा पूर!

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jul 02, 2021 | 1:44 PM

‘हंगामा’ (Hungama) या बॉलिवूड चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारने नुकताच चित्रपटाचा ट्रेलरही जारी केला आहे. ट्रेलर रिलीज होताच ‘हंगामा’च्या चाहत्यांनी सोशल मीडियावरही मीम्सचा पाऊस पडला आहे.

Hungama 2 | ‘जो तकलीफ देनी थी आपने दे दी’, ‘हंगामा 2’च्या ट्रेलर रिलीजनंतर सोशल मीडियावर मीम्सचा पूर!
हंगामा 2 मीम्स
Follow us

मुंबई : ‘हंगामा’ (Hungama) या बॉलिवूड चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारने नुकताच चित्रपटाचा ट्रेलरही जारी केला आहे. ट्रेलर रिलीज होताच ‘हंगामा’च्या चाहत्यांनी सोशल मीडियावरही मीम्सचा पाऊस पडला आहे. 2003मध्ये आलेल्या या चित्रपटाने देशातील कोट्यावधी लोकांना हसवले आणि या चित्रपटाच्या अनेक सीन्सवर भरपूर मीम्स आणि विनोदही केले गेले. ‘हंगामा 2’चा (Hungama 2) ट्रेलर रिलीज झाल्यानंतरही असेच काहीसे घडत आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहून, नेटकरीही आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत आणि त्यांनी मीम्सचा वर्षाव केला आहे (Funny Memes goest viral after Hungama 2 trailer launch).

या ट्रेलरवर बहुतेक चाहते नाखूष आहेत, कारण 2003 मध्ये आलेल्या या चित्रपटाची अनेक पात्रं गायब आहेत. यामुळे लोक मीम्स बनवून आपला रागही काढत आहेत. चित्रपटाचा सिक्वेल पहिल्या भागापेक्षा पूर्णपणे वेगळा दिसत आहे. परेश रावल यांना चित्रपटात पाहून लोकांना आनंद झाला आहे, तर ट्रेलरमध्ये राजपाल यादव यांच्या केवळ काही सेकंदाच्या उपस्थितीवर जनता संतप्त आहे. ‘हंगामा 2’मध्ये शिल्पा शेट्टी देखील मुख्य भूमिकेत दिसली आहे आणि ती परेश रावल यांच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. शिल्पाचे हिट गाणे ‘चुरा के दिल मेरा’ देखील या चित्रपटात समाविष्ट करण्यात आले आहे, पण हे गाणे चाहत्यांना खुश करण्यातही यशस्वी झालेली दिसत नाही.

एकंदरीत, काही चाहत्यांनी ‘हंगामा 2’च्या ट्रेलर आल्याच्या आनंदात मीम्स बनवले आहेत, तर बर्‍याचजणांनी ट्रेलरवर नाखूश होऊन मीम्स बनवले आहेत. हंगामाचा सिक्वेल 23 जुलैला डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. ‘हंगामा 2’च्या ट्रेलरबद्दल नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया पाहा…

पाहा भन्नाट मीम्स :

(Funny Memes goest viral after Hungama 2 trailer launch)

हेही वाचा :

Madhuri Dixit | ‘धकधक गर्ल’ची नवी इनिंग, माधुरी दीक्षित करणार OTTवर धमाकेदार पदार्पण!

एक दिवस आधीच ढासळली होती राज कौशल यांची तब्येत, पत्नी मंदिराला म्हणाले ‘मला हार्टअटॅक येतोय’

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI