विक्रम भट्टच्या ‘अनामिका’ वेब सीरिजच्या सेटवर गुंडांचा जोरदार हंगामा, सनी लिओनीला सुरक्षित स्थळी हलवले !

विक्रम भट्टच्या (Vikram Bhatt) आगामी वेब सीरिज 'अनामिका' (Anamika) च्या सेटवर जोरदार हंगामा बघायला मिळाला.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 11:11 AM, 12 Feb 2021
विक्रम भट्टच्या 'अनामिका' वेब सीरिजच्या सेटवर गुंडांचा जोरदार हंगामा, सनी लिओनीला सुरक्षित स्थळी हलवले !

मुंबई : विक्रम भट्टच्या (Vikram Bhatt) आगामी वेब सीरिज ‘अनामिका’ (Anamika) च्या सेटवर जोरदार हंगामा बघायला मिळाला. अनामिकाच्या सेटवर काही गुंडांनी धिंगाना केल्याची बातमी आहे. ज्यावेळी सेटवर हे गुंडे घुसले होते त्यावेळी सनी लिओनी सेटवर शूट करत होती. या सर्व प्रकरणामध्ये विक्रम भट्टने सनी लिओनीला सुरक्षित स्थळी पोहचवले. (Hooligan entry on the set of Vikram Bhatt’s Anamika web series)

अनामिका वेब सीरिजमध्ये सनी लिओनी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. रिपोर्ट्सनुसार शूटिंग दरम्यान काही गुंडांनी सेटवर पोहोचून 38 लाखांची मागणी केली. या सर्व प्रकरणानंतर विक्रम भट्ट यांना शूटिंगचे लोकेशनही बदलावे लागले आहे. हे प्रकरण अ‍ॅक्शन डायरेक्टर अब्बास अली मोघुल यांच्याशी झालेल्या व्यवहाराबद्दल असल्याचे सांगण्यात येत आहे.

सनी लिओनीने काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया अकाउंटवर तिच्या चाहत्यांसह ही बातमी शेअर केली होती. सनीने तिच्या चाहत्यांना सांगितले आहे की, तिने तिच्या ‘अनामिका’ या नवीन वेब सीरिजचे शुटिंग सुरू केले आहे. विक्रम भट्ट या वेब सिरिजचे दिग्दर्शन करताना दिसणार आहेत.

या वेब सीरिजचे ते लेखकही आहेत असे सांगितले होते.  सनी पहिल्यांदा अनामिकामध्ये अ‍ॅक्शन सीन्स करताना दिसणार आहे. यासंदर्भात माहिती देताना विक्रम भट्ट म्हणाले होते की, ‘लॉकडाऊनमुळे शूटिंग काही काळ थांबले होते पण काम करणे थांबवत नाही, म्हणून आम्ही परत काम करत आहोत.

आम्ही नुकताच सनीसोबत शूटिंग सुरू केली आहे. हा एक चांगला प्रकल्प आहे. सनी मार्शल आर्ट करतांना दिसणार आहे. ही अ‍ॅक्शन पॅक वेब सीरिज आहे. सनी लिओनीची अनामिका ही 10 एपिसोडची सीरीज असेल. या वेब सीरीजचे संपूर्ण शूटिंग मुंबईत होणार आहे. ही वेब सीरिज एमएक्स प्लेयरवर रिलीज होणार आहे.

संबंधित बातम्या : 

शस्त्र परवाना प्रकरणात सलमानला दिलासा, काळवीट प्रकरण झटका देणार?

तुझ्या चित्रपटाचे शूटिंग थांबवू, काँग्रेसची धमकी; कंगनाचं काँग्रेसला सॉलिड उत्तर….

योगी भेटीचा अक्षयकुमारला फटका? ठाकरे सरकारची वक्रदृष्टी?; ‘सूर्यवंशी’चं काय होणार?

(Hooligan entry on the set of Vikram Bhatt’s Anamika web series)