Khoya Khoya Chand | शेखर सुमनचा लेक अध्ययन सुमन नाही दाखवू शकला बॉलिवूडमध्ये जादू, वैयक्तिक आयुष्यामुळे राहिला चर्चेत!

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी आपल्या काळात इंडस्ट्रीत बरेच नाव कमावले. परंतु त्यांची मुले आपले वडील किंवा आईसारखे सुपरहिट स्टार बनू शकले नाहीत. चित्रपटांतून विशेष ओळख न मिळाल्यामुळे त्यांनी इंडस्ट्रीचा निरोप घेतला.

Khoya Khoya Chand | शेखर सुमनचा लेक अध्ययन सुमन नाही दाखवू शकला बॉलिवूडमध्ये जादू, वैयक्तिक आयुष्यामुळे राहिला चर्चेत!
अध्ययन सुमन
Follow us
| Updated on: Jul 23, 2021 | 10:30 AM

मुंबई : बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी आपल्या काळात इंडस्ट्रीत बरेच नाव कमावले. परंतु त्यांची मुले आपले वडील किंवा आईसारखे सुपरहिट स्टार बनू शकले नाहीत. चित्रपटांतून विशेष ओळख न मिळाल्यामुळे त्यांनी इंडस्ट्रीचा निरोप घेतला. आज, आम्ही तुम्हाला अशाच एका सुपरस्टारच्या मुलाबद्दल सांगणार आहोत. आज आपण खोया खोया चांदमध्ये आपण शेखर सुमनचा मुलगा अध्ययन सुमनबद्दल (Adhyayan) जाणून घेणार आहोत.

अभिनेता अध्ययन सुमन यांनी आपल्या कारकीर्दीची सुरूवात ‘ए-दिल’ या चित्रपटाद्वारे केली. यानंतर, तो कंगनासमवेत ‘राज-द मिस्ट्री कंटिन्यूज’ या चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट सुपर हिट ठरला होता आणि बॉक्स ऑफिसवरही चांगला व्यवसाय केला. पण त्यानंतर अध्ययनचा कोणताही चित्रपट अधिक जादू दाखवू शकला नाही.

‘राज’नंतर अध्ययन सुमनने ‘जश्न’, ‘देहरादून’, ‘हिम्मतवाला’, ‘हार्टलेस’, ‘लखनौवी इश्क’ यासारख्या बर्‍याच चित्रपटात काम केले, पण आपली जादू प्रेक्षकांवर पसरवण्यात त्याला यश मिळू शकले नाही. अध्यायनने ज्या प्रकारे बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले, असे म्हटले जात होते की, त्याचा चॉकलेट बॉय लूक प्रेक्षकांची मने जिंकेल, पण तसे होऊ शकले नाही.

वादांमुळे राहिला चर्चेत

अध्ययन सुमन आपल्या बॉलिवूड कारकिर्दीपेक्षा अधिक वादाच्या चर्चेचा एक भाग झाला आहे. ‘राज’ या चित्रपटाच्या दरम्यान, अध्ययन आणि कंगना यांच्यातील जवळीक वाढली होती, त्यानंतर दोघांनीही एकमेकांना डेट करण्यास सुरूवात केली. 1-2 वर्षे डेटिंग केल्यानंतर दोघे वेगळे झाले. ब्रेकअपनंतर अध्ययनने कंगनावर अनेक आरोप केले होते. त्याने म्हटले होते की, कंगना त्याला मारहाण व शिवीगाळ करीत असे. त्याने कंगनाने आपल्यावर काळी जादू केल्याचा आरोपही केला होता.

वेब सीरीजमधून कमबॅक

बॉलिवूडमध्ये नाव मिळू न शकल्यामुळे अध्ययनने ओटीटी प्लॅटफॉर्मचा आधार घेतला. तो प्रकाश झाच्या ‘आश्रम’ या वेब सीरीजमध्ये दिसला होता. या मालिकेत बॉबी देओल त्याच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसला होता. या सीरीजमध्ये अध्ययनचा अभिनय चांगलाच गाजला होता. आता चित्रपटांपासून दूर असलेला अध्ययन सुमन म्युझिक व्हिडीओंमध्ये दिसतो. नुकताच त्याचा ‘पैग दरिया’ हा म्युझिक व्हिडीओ रिलीज झाला आहे. हे गाणे रसिकांना खूप आवडले आहे.

(Khoya Khoya Chand Shekhar Suman’s Son Adhyayan Suman could not show magic in Bollywood)

हेही वाचा :

प्रेग्नन्सीच्या चर्चेला सोनम कपूरचं बेधडक उत्तर, सोशल मीडिया पोस्ट पाहून चाहतेही हैराण!

Raj Kundra Top 10 Memes : अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रावर मीम्सची बरसात, तुम्हालाही येईल हसू

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.