Samantar 2 trailer out | एकाचे कर्म दुसऱ्याचे भविष्य, नियती होणार का नियंत्रित? पाहा ‘समांतर 2’चा जबरदस्त ट्रेलर

टीझरमुळे प्रेक्षकांच्या मनात 'समांतर'  सीझन 2 विषयी आधीच खूप उत्सुकता निर्माण झाली आहे. तर आता 'समांतर 2'चा ट्रेलरही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. कुमार महाजनच्या बाबतीत काय चूक झाली असेल, याचा प्रेक्षकांना अंदाज बांधण्यास सांगून, एखाद्या माणसाचे कर्म दुसऱ्याचे भविष्य कसे असेल, हे यात अधोरेखित केले आहे.

Samantar 2 trailer out | एकाचे कर्म दुसऱ्याचे भविष्य, नियती होणार का नियंत्रित? पाहा ‘समांतर 2’चा जबरदस्त ट्रेलर
समांतर 2

मुंबई : असं म्हणतात नशिबात जे लिखित आहे, ते होतचं… मग कितीही नशीब नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला तरीह…. मात्र तुमच्या भविष्यात काय लिहून ठेवलंय, हे जर तुम्हाला आधीच कळलं, तर तुम्ही ते भविष्य पुन्हा लिहू इच्छिता? तुम्हाला असं वाटतं का, तुम्ही ते बदलू शकता? नियतीच्या विचित्र मार्गावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अपेक्षित अशी एमएक्स ओरिजनल सीरीज ‘समांतर’ आपला सीझन 2 (Samantar 2) घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस सज्ज झाली आहे. यात पुन्हाएकदा हरहुन्नरी अभिनेता स्वप्नील जोशी (Swwapnil Joshi) ‘कुमार महाजन’च्या भूमिकेत दिसणार असून नितीश भारद्वाज (Niteesh Bhardwaj), सई ताम्हणकर (Saie Tamhankar) आणि तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) यांच्याही प्रमुख भूमिका आहेत (Swwapnil Joshi Starrer MX Player web series Samantar 2 trailer out).

टीझरमुळे प्रेक्षकांच्या मनात ‘समांतर’  सीझन 2 विषयी आधीच खूप उत्सुकता निर्माण झाली आहे. तर आता ‘समांतर 2’चा ट्रेलरही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. कुमार महाजनच्या बाबतीत काय चूक झाली असेल, याचा प्रेक्षकांना अंदाज बांधण्यास सांगून, एखाद्या माणसाचे कर्म दुसऱ्याचे भविष्य कसे असेल, हे यात अधोरेखित केले आहे.

काय आहे कथा?

सीझन 1 चे कुतूहलजनक कथानक म्हणजे कुमार महाजनने सुदर्शन चक्रपाणीचा शोध घेतला, जो आधीच कुमारचे जीवन जगला होता आणि येणाऱ्या काळात काय घडणार आहे, हे तो सांगू शकत होता. सीझन 2 मध्ये चक्रपाणीने कुमारला डायरी दिली आहे, ज्यात त्यांच्या आयुष्याचा तपशील आहे. यात एक नवीन स्त्री कुमारच्या आयुष्यात येणार असल्याचे भाकीत केले आहे. त्यानंतर कुमारचा नशिबाचा शोध सुरु होतो. या डायरीचा अंदाज चुकवण्यासाठी कुमारचा सर्वतोपरी प्रयत्न सुरु असतानाही, या गूढ स्त्रीचा कुमारच्या आयुष्यात प्रवेश होतो. ही गूढ स्त्री कोण आहे आणि चक्रपाणीने आपल्या डायरीत नमूद केल्याप्रमाणे कुमारला नाशिबाचा सामना करावा लागणार का, याचा शोध या 10 भागांच्या थ्रिलर सीरीजमध्ये घेतला जाणार आहे.

पाहा ट्रेलर :

 

View this post on Instagram

 

A post shared by Swapnil Joshi (@swwapnil_joshi)

कुमारचा प्रवास अनपेक्षित वळणावर!

‘समांतर 2’बद्दल बोलताना स्वप्नील जोशी म्हणतो, ”प्रेक्षकांच्या सर्व अपेक्षांपलीकडे जाऊन ‘समांतर’ने प्रादेशिक वेब शो अशी ओळख प्राप्त केली आहे. भाषेचा अडथळा मोडकळीत काढत, सर्व भाषिक प्रेक्षकांना या वेब शोने आपलंस केलंय. ‘समांतर’चा पहिला सीझन येऊन आता वर्ष उलटले असून, मला माहित आहे की, प्रेक्षक आता सीझन 2ची आतुरतेने वाट पाहात आहेत. सीझन 2 मध्ये कुमारचा प्रवास एका अनपेक्षित वळणावर येणार असून यात हा प्रश्न उपस्थित होणार आहे, की जर तुम्हाला तुमचं भविष्य माहित असेल, तर ते बदलणे शक्य आहे का?”

लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

सुदर्शन चक्रपाणीची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते नितीश भारद्वाज सांगतात, “एक अभिनेता म्हणून माझ्या नव्या रुपाला सीझन 1 मध्ये खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. प्रेक्षक सुद्धा नवनवीन संकल्पना स्वीकारत आहेत, हे पाहून खूपच छान वाटतंय. एक अभिनेता म्हणून या अनोख्या कथानकाचा भाग होण्यासाठी मी उत्सुक आहे. चक्रपाणीचे आयुष्य कुमारच्या जीवनाचे प्रतिबिंब होईल, की काही मनोरंजक वळणे घेत कुमारच्या उत्तरांच्या शोधाचे अनुसरण करत राहील? हे सीझन 2 पाहिल्यावरच कळेल.”  ‘समांतर’ या थ्रिलर वेब शोचा हा सीझन मराठीसह हिंदी, तामिळ आणि तेलगू भाषेत प्रेक्षकांना 1 जुलैपासून एमएक्स प्लेअरवर विनामूल्य पाहता येणार आहे.

(Swwapnil Joshi Starrer MX Player web series Samantar 2 trailer out)

हेही वाचा :

Samantar 2 | दोन काळ, दोन व्यक्ती, आणि एक रहस्य! काय घडणार कुमारच्या आयुष्यात? पाहा ‘समांतर 2’चा जबरदस्त टीझर

Toofaan : फरहान अख्तरच्या ‘तुफान’च्या ग्लोबल प्रीमिअरचा मुहूर्त ठरला, 16 जुलैला अ‍ॅमेझॉन प्राइमवर होणार रिलीज