Toofaan : फरहान अख्तरच्या ‘तुफान’च्या ग्लोबल प्रीमिअरचा मुहूर्त ठरला, 16 जुलैला अ‍ॅमेझॉन प्राइमवर होणार रिलीज

भारत आणि जगभरातील 240 हून अधिक देश आणि प्रांतांमधील चाहत्यांना हा अत्यंत रंजक चित्रपट 16 जुलैपासून अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर पाहता येईल. (The global premiere of Farhan Akhtar's 'Toofaan' has arrived, it will be released on Amazon Prime on July 16)

Toofaan : फरहान अख्तरच्या 'तुफान'च्या ग्लोबल प्रीमिअरचा मुहूर्त ठरला, 16 जुलैला अ‍ॅमेझॉन प्राइमवर होणार रिलीज

मुंबई : अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओनं आज तुफान (Toofaan) या बहुचर्चित, प्रेरणादायी स्पोर्ट्स ड्रामा चित्रपटाच्या प्रीमिअरची तारीख जाहीर केली. फरहान अख्तर या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहेत. राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित आणि एक्सेल एंटरटेनमेंट आणि आरओएमपी पिक्चर्स यांची निर्मिती असलेला तुफान हा या वर्षातील सर्वात भव्य स्पोर्ट्स ड्रामा ठरणार आहे.

240 हून अधिक देश आणि प्रांतातील प्रेक्षकांसाठी चित्रपट

भारत आणि जगभरातील 240 हून अधिक देश आणि प्रांतांमधील चाहत्यांना हा अत्यंत रंजक चित्रपट 16 जुलैपासून अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर पाहता येईल. तुफानमध्ये फरहान अख्तर प्रमुख भूमिकेत आहे. त्याचप्रमाणे मृणाल ठाकुर, परेश रावल, सुप्रिया पाठक कपूर, हुसैन दलाल, डॉ. मोहन आगाशे, दर्शन कुमार आणि विजय राज यांच्याही या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.

मुंबईतील डोंगरी भागात मोठा होऊन स्थानिक गुंड झालेल्या अज्जूची कहाणी

भाग मिल्खा भाग या चित्रपटातील यशस्वी भागीदारीनंतर फरहान अख्तर आणि राकेश ओमप्रकाश मेहरा ही दमदार जोडी तुफान या चित्रपटामधून एक दमदार पंच पुन्हा एकदा घेऊन आली आहे. ही प्रेरणादायी कथा आहे मुंबईतील डोंगरी भागात मोठा होऊन स्थानिक गुंड झालेल्या अज्जू या अनाथ मुलाची. अनन्या या हुशार, प्रेमळ मुलीला भेटल्यानंतर त्याचं आयुष्य बदलून जातं. तिचा त्याच्यावर विश्वास आहे आणि त्यामुळेच त्याला स्वत:ची वेगळी ओळख शोधण्याची जिद्द लाभते. या जिद्दीतूनच अजीज अली हा बॉक्सिंग चॅम्पियन तयार होण्याचा प्रवास यात चितारला आहे.

कथा आहे जिद्दीची आणि तगून राहण्याच्या इच्छेची…

तुफानमध्ये बॉक्सिंग एक खेळ म्हणून जीवंत होतोच. शिवाय, आपल्या स्वप्नांचा वेध घेताना आयुष्यात येणाऱ्या चढ-उतारांतून मार्ग काढत पुढे जाणाऱ्या एका सामान्य माणसाचा जीवनप्रवासही यात रेखाटला आहे. ही कथा आहे जिद्दीची, तगून राहण्याच्या इच्छेची, चिकाटीची आणि यश मिळवण्याची महत्त्वाकांक्षा यांची ही कथा आहे.

‘तुफान’सह एका अद्वितीय आणि प्रेरणादायी प्रवासासाठी सज्ज व्हा 16 जुलै रोजी अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर.

संबंधित बातम्या

Photo : कधी सारा तर कधी जान्हवीसोबत स्पॉट होणारा ‘मिस्ट्री मॅन’ आहे तरी कोण?

Janvhi Kapoor | श्रीदेवीची लेक पुन्हा एकदा दिसली ‘मिस्ट्री बॉय’सोबत, जान्हवीच्या बिकिनी फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष!

Photo: पलकची सोशल मीडियावर झलक, अवघ्या काही तासात लाइक्सचा पाऊस, फोटो पाहून तुम्हीही क्लिन बोल्ड व्हाल

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI