AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तांडव’ वेब सीरीजचा वाद कधी थांबणार? वाचा आतापर्यंत काय घडलं…

‘तांडव’ (Tandav) या वेब सीरिजमधून हिंदूंच्या भावना दुखावल्यामुळे होत असलेल्या चौफेक टीकेनंतर ‘तांडव’चे निर्माते अली अब्बास जफर (Ali Abbas Zafar) यांनी माफी मागितली आहे.

‘तांडव’ वेब सीरीजचा वाद कधी थांबणार? वाचा आतापर्यंत काय घडलं...
| Updated on: Jan 20, 2021 | 3:43 PM
Share

मुंबई : ‘तांडव’ (Tandav) या वेब सीरिजमधून हिंदूंच्या भावना दुखावल्यामुळे होत असलेल्या चौफेक टीकेनंतर ‘तांडव’चे निर्माते अली अब्बास जफर (Ali Abbas Zafar) यांनी माफी मागितली होती. मात्र, अली अब्बास जफरने माफी मागूनही काही विशेष फरक पडलेला दिसत नाही. कारण अली अब्बास जफरच्या माफीनंतरही उत्तरप्रदेश, मध्यप्रदेशमध्ये तांडव बेव सीरीजच्या निर्मात्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचदरम्यान भाजप आमदार राम कदम यांनी केवळ माफी मागून चालणार नाही. आम्ही अॅमेझॉनसहीत सर्वांना तुरुंगात पाठवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा दिला आहे. (When will the controversy over ‘Tandav’ web series stop?)

राम कदम यांनी तसं ट्विटही केलं आहे. जोपर्यंत मुंबई पोलीस एफआयआर दाखल करत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवू असा इशाराही त्यांनी दिला होता. बहुजन समाज पार्टी (बसपा) च्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांनीही ‘तांडव’ या वेब सीरीजमधील आक्षेपार्ह देखावे आणि संवाद काढावा असे आवाहन निर्मात्यांना केले आहे. बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी सोमवारी ट्वीट केले होते.

तांडव विरोधात विविध शहरांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले. दिल्ली, मुंबई आणि लखनऊमध्ये तांडवच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी लखनऊ पोलिसांच्या चार अधिकाऱ्यांची एक टीम मुंबईलाही रवाना झाली. उत्तर प्रदेशातील योगी सरकारने हे प्रकरण अतिशय गंभीरपणे घेतलं असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

निर्मात्याने काय म्हटलं ही वेब सीरिज पूर्णपणे फिक्शन आहे. या सीरिजमधील घटनेचा कोणत्याही जिवीत व्यक्ती वा एखाद्या घटनेशी संबंध नाही. असलास तर तो योगायोग समजावा. कोणत्याही व्यक्ती, जाती, समुदाय आणि धार्मिक भावनांना ठेच पोहोचवण्याचा आमचा हेतू नाही. आम्ही सर्व तक्रारी समजून घेतल्या असून कुणाच्या भावना दुखावल्या असल्यास आम्ही सर्वांची विना अट माफी मागत आहोत, असं जफर यांनी म्हटलं आहे.

अॅमेझॉनच्या उत्तराची प्रतिक्षा जफर यांनी माफी मागितली असली तरी अजूनही अॅमेझॉनवर ही सीरिज दाखवली जात आहे. या सीरिजचे सर्व हक्क अॅमेझॉनकडे आहेत. त्यामुळे सरकार आणि आक्षेप घेणाऱ्यांना उत्तर देण्याची जबाबदारी अॅमेझॉनवर असून अॅमेझॉन काय उत्तर देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

संबंधित बातम्या : 

जिया खानच्या बहिणीनंतर, ‘या’ अभिनेत्रीचे साजिद खानवर गंभीर आरोप!

हे पोस्टर नाही ‘जाळ’ आहे, दिव्या दत्ताचा ‘अवतार’ खरंच धाकड आहे !

(When will the controversy over ‘Tandav’ web series stop?)

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक