जिया खानच्या बहिणीनंतर, ‘या’ अभिनेत्रीचे साजिद खानवर गंभीर आरोप!

बॉलिवूड दिग्दर्शक साजिद खानच्या (Sajid Khan) अडचणीत आणखीन वाढ होताना दिसत आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 14:45 PM, 20 Jan 2021
जिया खानच्या बहिणीनंतर, ‘या’ अभिनेत्रीचे साजिद खानवर गंभीर आरोप!

मुंबई : बॉलिवूड दिग्दर्शक साजिद खानच्या (Sajid Khan) अडचणीत आणखीन वाढ होताना दिसत आहे. अलीकडेच जिया खानच्या (Jiah Khan) बहिणीनं साजिद खानवर लैंगिक छळा केला असा गंभीर आरोप केला होता. तर आता अभिनेत्री शर्लिन चोप्रानंही (Sherlyn Chopra) साजिद खानवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. आता या प्रकरणानंतर अनेक अभिनेत्री पुढे आल्या आहेत. यामध्ये मॉडल पॉला, सलोनी चोप्रा, रेचल व्हाइट यासारख्या बऱ्याच अभिनेत्रीनी साजिद खानवर लैंगिक छळाचा गंभीर आरोप केला आहे. (Actress Sherlyn Chopra has also accused Sajid Khan of sexual harassment)

यामुळे दिग्दर्शक साजिद खानच्या अडचणीत वाढ हो्याची शक्यता आहे. मात्र, सर्व प्रकरणावर अद्याप साजिद खानने कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही आणि त्याच्यावर आरोप करणाऱ्यांची संख्याही वाढतच चालेली आहे. शर्लिननं ट्वीट करत ही माहिती दिली आहे की, जेव्हा माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी एप्रिल 2005 मध्ये मी साजिद खानला भेटले तेव्हा त्यानं त्याच्या पॅन्टमधून त्याचा खाजगी भाग काढून मला तो पकडायला सांगितला. मला आठवतंय की मी त्याला सांगितलं होतं की, खाजगी भाग कसा असतो हे मला माहित आहे आणि मी त्याला भेटायचा उद्देश आहे त्याचा खासगी भाग पकडण्याचा नाही.

अभिनेत्री जिया खानच्या जीवनावरील ‘डेथ इन बॉलिवूड’ ही डॉक्यूमेंट्री नुकतीच यूकेमध्ये प्रसिद्ध झाली आहे. बीबीसी 2 वर या माहितीपटाच्या दुसर्‍या पर्वामध्ये जियाची बहीण करिश्मा यांनी दिग्दर्शक साजिद खानवर अभिनेत्रीशी लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप केला आहे. करिश्माच्या म्हणण्यानुसार, तिच्याशी झालेल्या या गैरवर्तनानंतर जिया रडत घरी आली. अभिनेत्रीच्या बहिणीनं असंही सांगितलं की साजिदनं तिचा फायदा घेण्यासाठी खूप प्रयत्न केले.

संबंधित बातम्या : 

हे पोस्टर नाही ‘जाळ’ आहे, दिव्या दत्ताचा ‘अवतार’ खरंच धाकड आहे !

Gulabo sitabo च्या ओटीटी रिलीजनंतर आयुष्यमान खुराणाचा चित्रपट आता थिएटरमध्ये प्रदर्शित होणार!

(Actress Sherlyn Chopra has also accused Sajid Khan of sexual harassment)