प्रसिद्ध दिग्दर्शक साजिद खान आज त्यांचा 50 वा वाढदिवस साजरा करत आहेत. (Happy Birthday Sajid Khan; know some special things)
1/5

प्रसिद्ध दिग्दर्शक साजिद खान आज त्यांचा 50 वा वाढदिवस साजरा करत आहेत.
2/5

साजिद खान हे प्रसिद्ध डान्स कोरिओग्राफर फराह खान यांचे भाऊ आहेत.
3/5

सन 2006 मध्ये 'डरना जरूरी है' या चित्रपटाचं दिग्दर्शन करत साजिद खान यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकलं होतं. मात्र त्यांच्या या पहिल्याच चित्रपटाला फारसं यश मिळालं नाही.
4/5

करियरच्या सुरुवातीपासूनच ते वादाच्या भोवऱ्यात अडकलेले आहेत.2018मध्ये कलर्स टीव्हीवरील 'एंटरटेनमेंट की रात' या कार्यक्रमात त्यांनी जेलमध्ये जाण्याचासुद्धा किस्सा सांगितला होता. वयाच्या 15 व्या वर्षी रेल्वे रुळावरुन चालल्यानं त्यांना रात्रभर पोलीस चौकीत थांबावं लागलं होतं.
5/5

या व्यतिरिक्त त्यांच्यावर अनेक महिलांनी विनयभंगाचे आरोपसुद्धा लावले आहेत. यामध्ये अभिनेत्री अहाना कुमरा, सलोनी चोप्रा, डिंपल पॉल आणि पत्रकार करिश्मा उपाध्याय या महिलांचा समावेश होता. या आरोपांमुळे त्यांना 'हाऊसफुल 4'चं दिग्दर्शन सोडावं लागलं होतं