‘मी सोडणार नाही’, स्मृती मानधनाचा मित्राच्या तक्रारीनंतर पलाश मुच्छल आक्रमक, दिला गंभीर इशारा
Palash Mucchal : स्मृती मानधनाचा बालमित्र विज्ञान माने या तरुणाने पलाश मुच्छलच्या विरोधात आर्थिक फसवणुकीची तक्रार सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली आहे. यावर आता पलाश मुच्छलने उत्तर दिले आहे.

प्रसिद्ध महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचे लग्न भर मांडवात मोडले होते. स्मृतीच्या वडिलांची प्रकृती खालावली असल्याने लग्न रद्द झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर काही दिवसांनी स्मृतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून लग्न मोडल्याची माहिती दिली. त्यानंतर आता पलाश मुच्छलच्या अडचणीत वाढ झाली आहे. स्मृती मानधनाचा बालमित्र विज्ञान माने या तरुणाने पलाश मुच्छलच्या विरोधात आर्थिक फसवणुकीची तक्रार सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली आहे. विज्ञान मानेने पलाशने 40 लाख रुपयाची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. या आरोपावर आता पलाश मुच्छलने उत्तर दिले आहे.
पलाशवर 40 लाखांच्या फसवणुकीचा आरोप
स्मृती मानधनाचा बालमित्र विज्ञान मानेने पलाशवर 40 लाखांच्या फसवणुकीचा आरोप केला आहे. या वृत्तांनंतर, पलाश यांनी या प्रकरणावर आपले मौन सोडले आहे आणि पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. पलाशने हे आरोप फेटाळले आहेत आणि कायदेशीर कारवाईची धमकी दिली आहे. विज्ञान माने याने पलाश मुच्छल यांच्यावर चित्रपटासाठी पैसे स्वीकारण्याचा, फसवणूक करण्याचा आणि आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप केला आहे. विज्ञान माने याने पलाश आणि त्यांच्या आईवर अनेक आरोप केले आहेत. यावर पलाशने स्पष्टीकरण दिले आहे.
पलाश मुच्छल काय म्हणाला?
संगीतकार पलाश मुच्छलने इंस्टाग्रामवर विज्ञान मानेच्या आरोपांबाबत एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये, पलाशने विज्ञान मानेचे आरोप फेटाळले आहेत, तसेच कायदेशीर कारवाईचा इशाराही दिला आहे. पलाशने स्टोरीमध्ये लिहिले आहे की, “सांगलीच्या विज्ञान माने याने केलेले आरोप पूर्णपणे निराधार आणि तथ्यहीन आहेत. हे केवळ माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न आहे, त्यामुळे त्याला मी आव्हान न देता सोडणार नाही. माझे वकील, श्रेयांश मितारे हे प्रकरण हाताळत आहेत आणि आम्ही सर्व कायदेशीर पर्यायांचा वापर करून योग्य उत्तर देऊ.”
अॅक्टिंगचे काम देण्याचे आश्वासन दिल्याचा आरोप
विज्ञान मानेने आपल्या आरोपात म्हटले आहे की, ‘तो चित्रपटामध्ये अॅक्टिंगचे काम देखील देणार होता. पलाशने विश्वासात घेऊन माझ्याकडून वेळोवेळी एकूण 40 लाख रुपये घेऊन माझा विश्वासघात करत आर्थिक फसवणूक केली आहे. याबद्दल पोलीस अधीक्षकांची संपर्क साधला असता त्यांनी फक्त तक्रार दिली आहे गुन्हा दाखल नाही असेही सांगितला आहे.
