Pamela Anderson पाचव्यांदा लग्नाच्या बेडीत, बॉडीगार्डसोबत शुभमंगल

कॅनडातील वॅनकुअरमधील पामेलाच्या राहत्या घरी छोटेखानी समारंभात दोघांनी लग्न केले (Pamela Anderson marries bodyguard)

Pamela Anderson पाचव्यांदा लग्नाच्या बेडीत, बॉडीगार्डसोबत शुभमंगल
Follow us
| Updated on: Jan 28, 2021 | 1:53 PM

कॅलिफोर्निया : हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आणि ‘बेवॉच’ स्टार पामेला अँडरसन (Pamela Anderson) ही पाचव्यांदा लग्नाच्या बेडीत अडकली. नाताळच्या मुहूर्तावर पामेलाने तिचा बॉडीगार्ड डॅन हेहर्स्ट (Dan Hayhurst) सोबत लगीनगाठ बांधल्याचं समोर आलं आहे. कॅनडातील वॅनकुअरमधील पामेलाच्या राहत्या घरी छोटेखानी समारंभात पामेलाने लग्न केले. “मी अत्यंत योग्य ठिकाणी आहे, माझ्यावर निरतिशय प्रेम करणाऱ्या पुरुषाच्या कुशीत” अशा शब्दात पामेलाने विवाहानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या. (Pamela Anderson marries her bodyguard ties the knot for fifth time)

वर्षभराच्या सोबतीनंतर लगीनगाठ

54 वर्षीय पामेला अँडरसनचे हे पाचवे लग्न आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या सुरुवातीला दोघांची भेट झाली होती. त्यानंतर डिसेंबर महिन्यात पामेला-डॅन यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. कोरोनामुळे पाहुण्यांची यादी मर्यादित ठेवावी लागणार होतीच, मात्र नवदाम्पत्याने मोजक्या परिजनांच्या उपस्थितीतच बोहल्यावर चढणे पसंत केले.

“एक वर्तुळ पूर्ण”

माझ्या आजी-आजोबांनी 25 वर्षांपूर्वी जी मालमत्ता विकत घेतली होती, तिथे माझं लग्न झालं. माझे आई-वडिलही तिथेच विवाहबंधनात अडकले, आणि ते आजही एकत्र आहेत. आयुष्याचं एक वर्तुळ पूर्ण झाल्यासारखं वाटतं, अशा शब्दात पामेलाने आनंद व्यक्त केला.

जॉन पीटर्ससोबत कायदेशीर विवाह नाही!

हॉलिवूडमधील निर्माते जॉन पीटर्ससोबत (Jon Peters) लग्नाचा निर्णय घेतल्याने पामेला गेल्या वर्षीच्या सुरुवातीस चर्चेत आली होती. 22 वर्षांनी मोठ्या असलेल्या जॉन पीटर्ससोबत पामेलाचं लग्न झाल्याचंही मीडिया रिपोर्ट्समध्ये समोर आलं. मात्र आपलं कायदेशीर लग्न झालं नसल्याचा दावा तिने नंतर केला. (Pamela Anderson marries her bodyguard ties the knot for fifth time)

चार दिवसांच्या ओळखीनंतर पहिला विवाह

पामेला अँडरसन तिच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा खाजगी आयुष्यासाठी अधिक चर्चेत राहिली आहे. 1995 मध्ये पामेलाने अमेरिकन संगीतकार टॉमी लीसोबत पहिलं लग्न केलं होतं. अवघ्या चार दिवसांच्या ओळखीनंतर दोघांनी बीच वेडिंग केलं. पामेलाच्या आईलाही मासिकातून या लग्नाविषयी समजलं. दोन मुलांच्या जन्मानंतर टॉमला घरगुती हिंसाचाराच्या आरोपाखाली तुरुंगवास झाला. 1998 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.

काडीमोड घेतल्यानंतर पामेला मार्कस शेनबर्ग (Marcus Schenkenberg) सोबत रिलेशनशीपमध्ये होती. पण 2001 मध्ये त्यांचं ब्रेकअप झालं. त्यानंतर पामेला कीड रॉक (Kid Rock) सोबत विवाहबद्ध झाली. मात्र, हे नातंही फार काळ टिकू शकलं नाही. पामेलाने चित्रपट निर्माता रिक सालोमोनसोबत (Rick Salomon) तिसरं लग्न केलं. मात्र जेमतमे वर्षभरात त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर फ्रेंच फुटबॉल स्टार आदिल रामी (Adil Rami) सोबत 2017 मध्ये तिचं सूत जुळलं. तीन वर्षांत दोघं वेगळे झाले. त्यानंतर जॉन पीटर्ससोबत (Jon Peters) लग्नाचा तिचा निर्णय झाला. मात्र आपलं कायदेशीर लग्न झालं नसल्याचा दावा तिने नंतर केला.

संबंधित बातम्या :

प्रसिद्ध अभिनेत्री पामेला अँडरसन लग्नाच्या बेडीत, नवरा 22 वर्षांनी मोठा

(Pamela Anderson marries her bodyguard ties the knot for fifth time)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.