मुलगा चित्रपटांमध्ये खलनायक तर सून संस्कारी टिव्ही बहू; ‘कर्ण’ पंकज धीर यांच्या कुटुंबाद्दल माहितीये का?
महाभारतातील कर्णाच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध अभिनेते पंकज धीर यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने सर्वांनीच हळहळ व्यक्त केली आहे. पण हे फार कमी जणांना माहित असेल की त्यांचा मुलगा,सून देखील प्रसिद्ध सेलिब्रिटी आहेत. तसेच त्यांच्या पत्नीचा देखील बॉलिवूडशी संबंध आहे.

लोकप्रिय चित्रपट तथा महाभारतातील कर्णाची भूमिका अजरामर करणारे अभिनेते पंकज धीर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी कॅन्सरने निधन झाले. ते बऱ्याच काळापासून कॅन्सरशी झुंजत होते. अखेर 15 ऑक्टोबरला त्यांनी अखेररचा श्वास घेतला. पंकज हे महाभारतातील कर्णाच्या भूमिकेसाठी खूप प्रसिद्ध होते. आजही त्यांची ही कर्णाची भूमिका प्रेक्षकांच्या मनात आहे. प्रेक्षकांनी या भूमिकेला भरभरून प्रेम दिलं. त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. सर्वजण त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त करत आहेत.
पण हे फार कमी जणांना माहित असेल की पंकज यांचा मुलगा आणि सून देखील अभिनय क्षेत्रातच आहेत. तसेच त्यांची पत्नी देखील चित्रपटसृष्टीशी संबंध आहे. पंकज धीर यांच्या मुलाचे नाव निकितिन धीर आहे. निकितिनने त्याच्या वडिलांप्रमाणेच अभिनय क्षेत्रात प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तुम्हाला माहिती आहे का की निकितिन धीरने बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध चित्रपटात काम केलं आहे. एवढंच नाही तर त्याने पडद्यावर रावणाची भूमिका केली आहे? 2024 च्या टीव्ही मालिकेत श्रीमद् रामायणमध्ये निकितिन धीरने रावणाची भूमिका केली होती. प्रेक्षकांना त्याचे पात्र खूप आवडले.
View this post on Instagram
पंकज धीर यांचा मुलगाही आहे प्रसिद्ध अभिनेता
निकितिन धीर याने तेलुगू चित्रपटांमध्येही काम केले आहे. निकितिनने 2008 मध्ये हृतिक रोशन आणि ऐश्वर्या राय यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘जोधा अकबर’ या चित्रपटातून पदार्पण केले होते. या चित्रपटात त्याने अकबरचा मेहुणा शरीफुद्दीन हुसेनची भूमिका साकारली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन आशुतोष गोवारीकर यांनी केले होते. त्याने रेडी , चेन्नई एक्सप्रेस, कांचे, शेरशाह, सूर्यवंशी आणि वेब सिरीज ‘इंडियन पोलिस फोर्स’ मध्येही काम केले आहे. या वर्षी प्रदर्शित झालेल्या अक्षय कुमारच्या मल्टीस्टारर चित्रपट ‘हाऊसफुल 5’ मध्येही तो दिसला. निकितिनने चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्येही काम केले आहे. तो द्वारकाधीश भगवान श्री कृष्ण, फियर फाइल्स, नागार्जुन एक योद्धा, इश्कबाज, नागिन 3 आणि श्रीमद् रामायण यासारख्या चित्रपटांमध्ये दिसला आहे.
पंकज धीर यांची सूनही आहे लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री
पंकज धीर यांचा मूलगाच नाही तर त्यांची सून देखील एक लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे. तिने अनेक हिट मालिकांमध्ये काम केले आहे. कृतिकाने आपल्या करिअरची सुरुवात लोकप्रिय टीव्ही शो ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’मधून केली. ती “कसौटी जिंदगी की,” “किस देश में है मेरा दिल,” “आहट,” “कुबूल है,” “एक वीर का अरदास,” “देवों के देव महादेव,” “कसम तेरे प्यार की,” आणि “छोटी सरदारनी” सारख्या शोमध्ये दिसली आहे.
निकितिन आणि कृतिकाची प्रेमकहाणी त्यांचे वडील पंकज धीर यांच्यापासून सुरू झाली
दरम्यान हे फार कमी लोकांना माहिती असेल की निकितिन आणि कृतिकाची प्रेमकहाणी त्यांचे वडील पंकज धीर यांच्यापासून सुरू झाली. 2014 मध्ये, निकितिन त्यांचे वडील पंकज धीर दिग्दर्शित चित्रपटात काम करत होते, तेव्हा कृतिका ऑडिशनसाठी आली. पंकज यांनी कृतिकाला चित्रपटात मुख्य भूमिका तर दिलीच पण त्यांना ती इतकी आवडली की त्यांनी त्यांच्या मुलासाठी तिचा बायको म्हणून तिची निवड केली. त्यानंतर निकितिन कृतिकाच्या पालकांना भेटला. याच काळात निकितिन आणि कृतिका सेंगर पहिल्यांदा भेटले. त्यांचे नाते पुढे वाढले आणि ते एकमेकांना आवडू लागले. लग्नापूर्वी त्यांनी एकमेकांना डेट केले. या जोडप्याने नंतर लग्न केले.
पंकज धीर यांच्या पत्नी देखील बॉलिवूडशी संबंधीत
पंकज धीर यांच्या पत्नी अनिता धीर या देखील इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कॉस्च्युम डिझायनर आहेत. अनिता आणि पंकज धीर यांचा विवाह 19 ऑक्टोबर 1976 रोजी झाला होता. तिने इक्के पे इक्का (1994) आणि बॉक्सर (1984) सह अनेक चित्रपटांसाठी कॉस्ट्यूम डिझाइन केले आहेत.
