Param Sundari : ‘परम सुंदरी’साठी सिद्धार्थ-जान्हवीला मिळालं इतकं मानधन; जाणून घ्या इतरांचीही फी
अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘परम सुंदरी’ या चित्रपटाने प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चा घडवून आणली आहे. या चित्रपटातील गाण्यांना, टीझरला आणि ट्रेलरलाही प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला आहे. एकंदरीत ‘परम सुंदरी’ने चांगलाच माहोल निर्माण केला असून हा चित्रपट थिएटरमध्ये पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत. तुषार जलोटा दिग्दर्शित हा चित्रपट येत्या 29 ऑगस्ट रोजी […]

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘परम सुंदरी’ या चित्रपटाने प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चा घडवून आणली आहे. या चित्रपटातील गाण्यांना, टीझरला आणि ट्रेलरलाही प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला आहे. एकंदरीत ‘परम सुंदरी’ने चांगलाच माहोल निर्माण केला असून हा चित्रपट थिएटरमध्ये पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत. तुषार जलोटा दिग्दर्शित हा चित्रपट येत्या 29 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. यामध्ये सिद्धार्थने उत्तर भारतीय तरुणाची आणि जान्हवीने दक्षिण भारतीय तरुणीची भूमिका साकारली आहे. परम आणि सुंदरी ही दोन विरुद्ध टोकाची जोडी एकमेकांच्या प्रेमात कशी पडते आणि त्यात कोणते अडथळे येतात, याची ही कथा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सिद्धार्थने या चित्रपटासाठी 10 ते 12 कोटी रुपये मानधन स्वीकारलं आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सिद्धार्थ आणि जान्हवी ही नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडली आहे. ‘परम सुंदरी’मधल्या सुंदरीच्या भूमिकेसाठी जान्हवीला 4 ते 5 कोटी रुपये फी मिळाली आहे. चित्रपटात सिद्धार्थ आणि जान्हवीशिवाय संजय कपूरनेही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. यासाठी त्याला 50 लाख रुपये मानधन मिळालं आहे. सहाय्यक भूमिकांमध्ये अभिनेता मनजोत सिंहचाही समावेश आहे. या चित्रपटात तो अत्यंत रंजक भूमिकेत दिसणार आहे. त्यासाठी त्याला 25 लाख रुपये फी मिळाल्याचं कळतंय. तर रेन्जी पणिक्करलासुद्धा 25 ते 30 लाख रुपये मिळाले आहेत.
View this post on Instagram
या चित्रपटाची निर्मिती ‘स्त्री 2’ आणि ‘छावा’सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या ‘मॅडॉक स्टुडिओ’ने केली आहे. ‘परम सुंदरी’चा बजेट जवळपास 45 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जात आहे. ‘पिंकविला’ या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, 27 ऑगस्ट रोजी रात्री 11 पर्यंत ‘परम सुंदरी’चे 12 हजारांहून अधिक तिकिटं विकली गेली होती. एखाद्या रोमँटिक कॉमेडी चित्रपटासाठी ही चांगली सुरुवात मानली जातेय. ही बुकिंग जवळपास 40 हजार तिकिटांपर्यंत जाऊ शकते, असाही अंदाज वर्तवला जात आहे. या हिशोबाने पहिल्या दिवसाची कमाई जवळपास सात ते आठ कोटी रुपयांपर्यंत होऊ शकते. माऊथ पब्लिसिटीचा सकारात्मक परिणाम झाल्यास दुसऱ्या दिवसापासून कमाईत चांगली वाढ होऊ शकते.
