Parineeti Chopra | परिणीती चोप्रा-राघव चड्ढादरम्यान लग्नापूर्वी होणार क्रिकेट मॅच; जाणून घ्या संपूर्ण प्लॅन

मुंबई | 18 सप्टेंबर 2023 : अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचा नेता राघव चड्ढा लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. येत्या 24 सप्टेंबर रोजी राजस्थानमधल्या उदयपूरमध्ये हा शाही विवाहसोहळा पार पडणार असल्याचं कळतंय. या लग्नाबद्दलचे काही अपडेट्स समोर येत आहेत. 23 सप्टेंबरपासून लग्नापूर्वीच्या विविध कार्यक्रमांना सुरुवात होणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्याचसोबत लग्नापूर्वी दोन्ही कुटुंबीयांसाठी […]

Parineeti Chopra | परिणीती चोप्रा-राघव चड्ढादरम्यान लग्नापूर्वी होणार क्रिकेट मॅच; जाणून घ्या संपूर्ण प्लॅन
Follow us
| Updated on: Sep 18, 2023 | 5:42 PM

मुंबई | 18 सप्टेंबर 2023 : अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचा नेता राघव चड्ढा लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. येत्या 24 सप्टेंबर रोजी राजस्थानमधल्या उदयपूरमध्ये हा शाही विवाहसोहळा पार पडणार असल्याचं कळतंय. या लग्नाबद्दलचे काही अपडेट्स समोर येत आहेत. 23 सप्टेंबरपासून लग्नापूर्वीच्या विविध कार्यक्रमांना सुरुवात होणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्याचसोबत लग्नापूर्वी दोन्ही कुटुंबीयांसाठी काही खास गोष्टी प्लॅन करण्यात आल्या आहेत. चोप्रा आणि चड्ढा या कुटुंबीयांमध्ये लग्नापूर्वी एक क्रिकेट मॅच होणार असल्याचं समजतंय. लग्नसोहळा हा वर आणि वधूसोबतच दोन्ही कुटुंबीयांसाठी खूप खास असतो. अशा वेळी या सोहळ्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेता यावा, यासाठी प्रत्येक गोष्ट अत्यंत बारकाईने आयोजित करण्यात आली आहे.

चोप्रा व्हर्सेस चड्ढा कुटुंबीयांची ही मॅच दिल्लीत होईल, असं कळतंय. या मॅचनंतर दोन्ही कुटुंबीय उदयपूरला लग्नासाठी रवाना होतील. क्रिकेटशिवाय इतरही काही मजेशीर गेम्सचा प्लॅन करण्यात आला आहे. इतर बॉलिवूड सेलिब्रिटींपेक्षा परिणीतीचं लग्न हे सर्वांत हटके असणार यात काही शंका नाही. लग्नातील कार्यक्रमांसोबतच दोन्ही कुटुंबीयांना सोबत चांगला वेळ घालवता यावा, या दृष्टीने क्रिकेट आणि इतर गेम्सचा प्लॅन करण्यात आला आहे. आता या मॅचमध्ये कोण बाजी मारणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by @parineetichopra

परिणीती आणि राघव हे शीख धर्माच्या विवाहपद्धतींनुसार लग्नबंधनात अडकणार आहेत. या लग्नातील सर्व विधी शीख धर्मानुसार पार पडणार आहेत. अरदास आणि कीर्तन दिल्लीत केले जातील. त्यानंतर परिणीती आणि राघव हे त्यांच्या मित्रपरिवारासोबत गेट-टुगेदर पार्टीसुद्धा करणार आहेत. नुकतंच परिणीतीला दिल्ली विमानतळावर पाहिलं गेलं. यावेळी तिने घातलेल्या कॅपवर ‘आर’ हे इंग्रजीतील अक्षर लिहिलेलं होतं. त्याचवेळी राघवसुद्धा दिल्ली विमानतळावर तिला घेण्यासाठी पोहोचला होता.

23 सप्टेंबरपासून परिणीती आणि राघव यांच्या लग्नापूर्वीचे कार्यक्रम उदयपूरमधील द लीला पॅलेसमध्ये सुरू होणार आहेत. या लग्नाची थीम पर्ल व्हाइट आणि पेस्टल आहे. लग्नानंतर एका रिसेप्शनचंही आयोजन करण्यात येईल. उदयपूरच्या लीला पॅलेसमध्ये या लग्नाची सर्व तयारी करण्यात आली आहे. या लग्नाला बॉलिवूड आणि राजकीय क्षेत्रातील बरेच नामवंत पाहुणे उपस्थित राहणार आहेत.

Non Stop LIVE Update
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.
मुंबईकरांनो मोठी बातमी, मेट्रोने प्रवास करताय? तर ही बातमी वाचाच!
मुंबईकरांनो मोठी बातमी, मेट्रोने प्रवास करताय? तर ही बातमी वाचाच!.
माझ्यावर जसा गुन्हा दाखल केला तसा भाजप...,रवींद्र धंगेकरांची मागणी काय
माझ्यावर जसा गुन्हा दाखल केला तसा भाजप...,रवींद्र धंगेकरांची मागणी काय.
शिवतीर्थावर मोदी-राज एकाच मंचावर, युद्धपातळीवर तयारी; कधी धडाडणार तोफ?
शिवतीर्थावर मोदी-राज एकाच मंचावर, युद्धपातळीवर तयारी; कधी धडाडणार तोफ?.
यामिनी जाधवांना त्रास दिला, त्या रडल्या त्यांनी... शिंदेंचा गौप्यस्फोट
यामिनी जाधवांना त्रास दिला, त्या रडल्या त्यांनी... शिंदेंचा गौप्यस्फोट.
मोदींना जिरेटोप अन् विरोधकांची टीका, प्रफुल्ल पटेलांचं प्रत्युत्तर काय
मोदींना जिरेटोप अन् विरोधकांची टीका, प्रफुल्ल पटेलांचं प्रत्युत्तर काय.
ठाकरे व्होट जिहादचे आका, शिवसेनाभवनात बोलावून हिरवी चादर...कुणाची टीका
ठाकरे व्होट जिहादचे आका, शिवसेनाभवनात बोलावून हिरवी चादर...कुणाची टीका.