AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मला मूल नको होतं..; प्रसिद्ध अभिनेत्रीकडून घटस्फोटामागच्या कारणाचा खुलासा, लग्नाच्या 11 वर्षांनंतर पतीपासून विभक्त

अभिनेत्री पूजा भट्ट नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या घटस्फोटाविषयी आणि घटस्फोटाच्या कारणांविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. लग्नाच्या अकरा वर्षांनंतर तिने पतीपासून घटस्फोट घेतला होता.

मला मूल नको होतं..; प्रसिद्ध अभिनेत्रीकडून घटस्फोटामागच्या कारणाचा खुलासा, लग्नाच्या 11 वर्षांनंतर पतीपासून विभक्त
Pooja BhattImage Credit source: Instagram
| Updated on: May 31, 2026 | 10:26 AM
Share

प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट यांची मोठी मुलगी पूजा भट्ट एकेकाळी बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक होती. 1990 च्या दशकात तिने प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. मात्र नंतर तिने स्वत:ला लाइमलाइट आणि कॅमेऱ्यापासून दूर केलं. पूजाने दिग्दर्शन क्षेत्रात प्रवेश केला. त्याचवेळी तिची भेट मनिष मखिजाशी झाली होती. 2003 मध्ये या दोघांनी खासगी समारंभात लग्न केलं. मात्र लग्नाच्या अकरा वर्षांनंतर 2014 मध्ये ते विभक्त झाले. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पूजा भट्ट तिच्या घटस्फोटाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. पूजाने लग्नाच्या अकरा वर्षांनंतर मनिषला घटस्फोट देण्यामागचं कारण सांगितलं.

विकी लालवानीच्या पॉडकास्ट मुलाखतीत पूजा भट्टने सांगितलं, “मला माझ्याच वैवाहिक आयुष्यात एकटेपणा जाणवू लागला होता. माझ्या अनेक मित्रमैत्रिणींनी मला विचारलं की, तुझं लग्न 11 वर्षे टिकलं, मग अचानक तू का नातं संपवलंस? तुझ्या आयुष्यात कोणी दुसरं होतं का? तर त्याचं उत्तर होतं की नाही. माझ्या आयुष्या दुसरं कोणीच नव्हतं. मी दुसऱ्या कोणाचा विचारसुद्धा करत नव्हते. पण मला माझ्याच नात्यात एकटेपणा जाणवत होता. जेव्हा तुम्ही एखाद्यासोबत असूनही एकटेपणा अनुभवत असाल, तेव्हा हे समजून घ्या की ते नातं पूर्वीसारखं राहिलेलं नाही. एकाच घरात राहूनही तुम्ही हळूहळू एकमेकांपासून दूर जाता आणि मग ते नातं फिकं पडू लागतं. त्यातील ओलावा हरपून जातो.”

“मी त्याला स्पष्ट सांगितलं की आपलं नातं मैत्री आणि विश्वासाच्या आधारावर सुरू झालं होतं. तू जे काही सांगायचास ते मी कधीच तपासून पाहिलं नाही आणि भविष्यातही कधी तपासणार नाही. पण मला जाणवू लागलं होतं की हे नातं आता संपलं आहे. आम्ही एकमेकांपासून दुरावलो होतो आणि या प्रवासात कुठेतरी एक स्त्री म्हणून मी स्वत:ला हरवून बसले होते. मला माझी ओळख आणि स्वत:चं अस्तित्व पुन्हा मिळवायचं होतं. त्यामुळे हे लग्न पुढे चालू ठेवणं खोटेपणाचं ठरलं असतं. मी आयुष्य खोट्यावर जगू शकत नाही. मला माझ्या आनंदासाठी कोणावरही अवलंबून राहायचं नाही. पण माझ्या दु:खासाठी मी कोणालाही दोष देणार नाही”, असं पूजाने स्पष्ट केलं.

पूजाने या मुलाखतीत असंही सांगितलं की ती अशा जोडीदाराच्या शोधात आहे, ज्याच्यासोबत ती तिचं आयुष्य आनंदाने घालवू शकेल. पण जरी असा कोणी भेटला नाही, तरी ती दु:खी नाही. पूजाने तिच्या वैवाहिक आयुष्यातील आणखी एका समस्येचाही खुलासा केला. “आमचा संसार सुखाचा होत नव्हता आणि त्यामागील एक कारण म्हणजे मला मूल नको होतं. मला लहान मुलं आवडतात, पण मला आई व्हायची इच्छा कधीच झाली नाही. माझ्या तिशीत मी सतत काम करत होते आणि माझ्या आयुष्यात अनेक ध्येये, कामं होती जी मला पूर्ण करायची होती. पण आई होण्याची भावना किंवा इच्छा माझ्या मनात कधीच आली नाही. म्हणून मी माझ्या मनाचं आणि भावनांचं ऐकलं”, असं ती पुढे म्हणाली.

Follow Us
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर'
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर' महारक्तदान शिबीराचे आयोजन
पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! पहा Video
Manoj Jarange Patil | पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! फुलांचा वर्षाव अन्... पहा व्हिडीओ
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील नेत्याचा एकाच विमानाने प्रवास
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील बड्या नेत्याचा एकाच विमानाने प्रवास, फोटो आले समोर
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही घेऊ शकतो- जरांगे
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही... भर मंचावरून मनोज जरांगे कडाडले; आता...
Big Breaking| बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर
Big Breaking | बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर; नेमकं काय घडलं? पहा व्हिडीओ
मी नितीन गडकरी यांना फोन केला अन् म्हणालो... तिसऱ्या मुंबईवरून राज ठाक
मी नितीन गडकरी यांना फोन केला अन् म्हणालो... तिसऱ्या मुंबईवरून राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
NCP शरद पवार गटातील 8 खासदारांची मोदींसोबत बैठक; रोहित पवार म्हणाले...
NCP शरद पवार गटातील 8 खासदारांची मोदींसोबत बैठक; रोहित पवार म्हणाले, 17 तारखेला...
ठाण्याच्या टिकोजीरावांना निवडणूक आयोगाने परस्परच... संजय राऊतांची टीका
ठाण्याच्या टिकोजीरावांना निवडणूक आयोगाने परस्परच... बोलता बोलता संजय राऊत असं काही म्हणाले की.. विधानाची तुफान चर्चा
समृद्धी महामार्गावर चक्काजाम आंदोलन, सत्यजित तांबे आणि पोलिसात झटापट,
समृद्धी महामार्गावर चक्काजाम आंदोलन, सत्यजित तांबे आणि पोलिसात झटापट, आंदोलक आक्रमक