Madonna: पॉप स्टार मॅडोनावर इंस्टाग्रामवर Live जाण्यास बंदी; सतत न्यूड फोटो पोस्ट केल्याने कारवाई

Madonna: पॉप स्टार मॅडोनावर इंस्टाग्रामवर Live जाण्यास बंदी; सतत न्यूड फोटो पोस्ट केल्याने कारवाई
Madonna
Image Credit source: Instagram

मॅडोना (Madonna) या फोटो शेअरिंग ॲपवर सातत्याने तिचे न्यूड फोटो आणि व्हिडीओ शेअर करत होती. अखेर जेव्हा तिने लाइव्ह जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिला समजलं की तिला या ॲपवर बंदी घालण्यात आली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

May 22, 2022 | 10:13 AM

पॉप म्युझिक आणि पॉप गाण्यांसाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या मॅडोनाला (Madonna) इन्स्टाग्रामने दणका दिला आहे. मॅडोनाला इंस्टाग्रामवर लाइव्ह (Instagram Live) जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. इन्स्टाग्रामच्या मार्गदर्शक तत्त्वांचं उल्लंघन केल्याने मॅडोनाला लाइव्ह जाण्यास बंदी घालण्यात आली. मॅडोना या फोटो शेअरिंग ॲपवर सातत्याने तिचे न्यूड फोटो आणि व्हिडीओ शेअर करत होती. अखेर जेव्हा तिने लाइव्ह जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिला समजलं की तिला या ॲपवर बंदी घालण्यात आली आहे. यावर मॅडोनाने आश्चर्य व्यक्त केलं आहे. “इन्स्टाग्रामवर (Instagram) लाइव्ह जाण्याआधी मी पूर्ण कपडे परिधान केले होते. इतकंच काय तर माझ्या अंगावर इतके कपडे मी याआधी कधीच घातले नव्हते,” असं ती उपरोधिकपणे म्हणाली. इन्स्टाग्रामकडून मॅडोनाला मिळालेल्या नोटिफिकेशनमध्ये तिने इतरांच्या भावनांचा आदर करावा आणि नेहमी कायद्याचं पालन करावं, असं म्हटलं आहे.

इंस्टाग्रामने मॅडोनाला पाठवलेल्या नोटिफिकेशनमध्ये असं म्हटलंय की, “आम्ही इंस्टाग्रामला युजर्सच्या अभिव्यक्तीसाठी एक प्रामाणिक आणि सुरक्षित जागा ठेवू इच्छितो. फक्त तुमचे स्वतःचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करा आणि नेहमी कायद्याचं पालन करा. इंस्टाग्रामवर प्रत्येकाचा आदर करा, युजर्सना स्पॅम करू नका किंवा न्यूड फोटो, व्हिडिओ पोस्ट करू नका.’

पहा फोटो-

 

View this post on Instagram

 

A post shared by Madonna (@madonna)

याआधीही मॅडोनाने इन्स्टाग्रामवर तिचे सेमीन्यूड, टॉपलेस आणि अश्लील फोटो अनेकदा पोस्ट केले आहेत. नोव्हेंबर 2021 मध्ये देखील तिने स्वतःचे सेमीन्यूड फोटो पोस्ट केले होते. नंतर इंस्टाग्रामने हे फोटो हटवले होते. त्यानंतर मॅडोनाने लिहिलं की, ‘मी माझे फोटो पुन्हा इंस्टाग्रामवर पोस्ट करत आहे, कारण ते कोणत्याही सूचनेशिवाय माझे फोटो काढून टाकत आहेत. याचं कारण त्यांनी असं सांगितलं की माझ्या स्तनांचा काही भाग फोटोत दिसत होता. मला अजूनही आश्चर्य वाटतं की आपण अशा समाजात राहतो जिथे एखादी स्त्री तिचं संपूर्ण शरीर दाखवू शकते, पण केवळ तिचे स्तन नाही.’

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें