माझे संपूर्ण आयुष्य बदलले; कॅन्सर सर्जरीनंतर दीपिकाला अश्रू अनावर
लिव्हर कर्करोगाशी झुंज देणाऱ्या टीव्ही विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री दीपिका कक्कडने नुकतेच आपल्या आयुष्यातील बदलांबद्दल मन मोकळेपण गप्पा मारल्या. ती गेल्या बराच काळापासून कर्करोगावर उपचार घेत आहे. अलीकडे एका पॉडकास्टमध्ये तिने खुलासा केला की शस्त्रक्रियेनंतर तिचे संपूर्ण आयुष्य कसे बदलले आहे.

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असलेली दीपिका कक्कड गेल्या काही दिवसांपासून गंभीर आजाराशी झुंज देत आहे. कर्करोगाचे निदान झाल्यानंतर दीपिकाने पहिल्यांदाच मनमोकळेपणाने गप्पा मारल्या आहेत. त्याच्या आयुष्यात झालेल्या बदलांविषयची बोलताना दीपिकाला अश्रू अनावर झाले आहेत. आता दीपिका नेमकं काय म्हणाली चला जाणून घेऊया…
दीपिका कक्कड इब्राहिम सध्या आरोग्यामुळे सतत चर्चेत आहे. ती स्टेज-2 लिव्हर कर्करोगावर उपचार घेत आहे. नुकतेच तिची शस्त्रक्रिया झाली असून आता ती औषधे आणि पुढील उपचार घेत आहे. गेले काही दिवस तिच्यासाठी खूप कठीण होते. कर्करोगाचे निदान झाल्यापासून ती आणि तिचा पती शोएब इब्राहिम कठीण काळातून जात आहेत. त्यांना अनेक अडचणी येत आहेत. पण दोघेही एकत्र सर्वाला समोरे जात आहेत.
पॉडकास्टमध्ये व्यक्त केल्या भावना
दीपिका नुकताच भारती सिंगच्या पॉडकास्टमध्ये दिसली. तेथे तिने तिच्या आयुष्याच्या प्रवासाबद्दल बोलताना सांगितले की कर्करोगाची लक्षणे दिसल्यानंतर डॉक्टरांकडे गेल्यानंतर तिचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले. तो काळ खूप कठीण होता. नंतर तिने चांगल्या डॉक्टरांचे आणि हेल्थकेअर टीमचे आभार मानले, ज्यांनी त्या काळात शक्य ती सर्व मदत केली.
काय म्हणाली दीपिका?
दीपिका म्हणाली, “शस्त्रक्रिया झाल्यानंतर मला कळले की माझे तर संपूर्ण जग बदलले आहे. मी स्वतःला खूप नशीबवान समजते की माझ्या आसपास असे लोक आहेत ज्यांनी मला इतके साथ दिली, इतकी माझी काळजी घेतली. माझ्याकडे सुखी कुटुंब आहे, मला चांगले अन्न मिळते. पण कितीतरी लोक असे आहेत ज्यांना उपचारही मिळत नाहीत. मला मिळालेले प्रेम मी शब्दांतही व्यक्त करू शकत नाही.”
सध्या दीपिका हळूहळू बरी होत आहे. तिने नुकताच मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात शस्त्रक्रिया केली आहे. तिची हिंमत आणि सकारात्मकता चाहत्यांसाठी मोठी प्रेरणा ठरत आहे.
