‘त्याला पाहिलं की नेहमीच प्रेमात वाटतं…’ प्राजक्ता माळीचं पहिलं प्रेम माहितीये कोण आहे? स्वत:च केला खुलासा
प्राजक्ता माळी तिच्या लव्हलाईफच्या वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असते. तिच्या चाहत्यांनाही याबाबत उत्सुकता असते. पण हे बऱ्याच जणांना माहित नसेल की तिचा पहिला क्रश कोण आहे ते? ज्याच्याबद्दलच्या तिच्या मनातील भावना कधीही बदलणार नाही.

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही कोणत्याना कोणत्या कारणाने चर्चेत असते. कधी तिच्या चित्रपटामुळे किंवा कधी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे. तिच्या मुलाखतींमध्येही देखील तिने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलचे अनेक किस्से सांगत असते. त्यामुळे त्या गोष्टींची चर्चा होतेच होते. पण सर्वात जास्त चर्चा होते ती तिच्या लव्ह लाईफची. ती कधी लग्न करणार इथपासून ते तिचं पहिलं प्रेम किंवा क्रश कोण आहे इथपर्यंत. तिच्या चाहत्यांना देखील तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असते. फुलवंतीनंतर तर जास्तच तिची फॅनफॉलोईंग वाढली आहे. प्राजक्ताने तिच्या पहिल्या प्रेमाबद्दल किंवा तिच्या क्रशबद्दल एका मुलाखतीत सांगितलं होतं. तिला कोण आवडतं याबाबत तिने खुलासा केला होता.
प्राजक्ताचं पहिलं ‘क्रश’
एका विशेष मुलाखतीमध्ये प्राजक्ताने आपल्या मनातील भावना स्पष्ट करत सांगितलं की तिचा क्रश कोण आहे ते आणि तिचा पहिला क्रशच तिचं पहिलं प्रेमही असल्याचं तिने म्हटलं. त्याच्याबद्दलच्या तिच्या मनातील भावना कधीच बदलणार नाही असंही तिने म्हटलं. सोबतच तिने अजून एक गोष्ट स्पष्ट केली की खरंतर तिचा एक नाही तर दोन जणांवरी क्रश आहे.
तिचं पहिलं क्रश किंवा तिचं प्रेम म्हणजे बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता रणबीर कपूर. ती म्हणाली, “रणबीरकडे पाहिलं की मला नेहमीच प्रेमात असल्यासारखं वाटतं.” रणबीर कपूरबद्दलची तिची भावना अधिक खास असल्याचं तिने सांगितलं. ती पुढे म्हणाली “मी कायमच त्याच्या प्रेमात असते’,
त्याच्यात काय विशेष वाटतं?
रणबीर कपूरबद्दल तिच्या विशेष भावना स्पष्ट करताना प्राजक्ताने सांगितलं कि तिला रणबीरमधील कोणती गोष्ट प्राजक्ताला सर्वात जास्त आवडते. ती म्हणाली की, “रणबीर मला खूप आवडतो. तो सोशल मीडियावर फार अॅक्टीव देखील नाही. तो त्याचं वैयक्तिक आयुष्य सोशल मिडियावरती शेअर करत नाही. त्याच्या आसपासच्या लोकांकडून त्याचं सोशल आयुष्य आपल्याला दिसतं. त्याने एका मुलाखतीत खूप चांगला मुद्दा मांडला होता की, जर मी माझं आयुष्य सोशल मीडियावर टाकलं तर त्याचा परिणाम मी सिनेमात ज्या भूमिका साकारतोय त्यावर होईल. मी कसा आहे हे लोकांना कळलंच नाही पाहिजे, म्हणजे सिनेमात मी जे दिसतो ते लोकांना स्वीकारायला सोपं जाईल. मला ते खूप आवडलं. माणूस म्हणून तुम्ही कसे आहात ते कळणं किंवा सतत दिसत राहणं या गोष्टी मारक ठरतात”, असं म्हणत तिने त्याचं तोंडभरून कौतुकही केलं होतं.
दुसरा क्रश कोण? ज्याच्यासोबत लग्न करण्याची इच्छा केली होती व्यक्त
रणबीरनंतर तिच्या मनात असणारा दुसरा क्रश म्हणजे मराठमोळा अभिनेता आणि तिचा चांगला मित्र म्हणजे वैभव तत्त्ववादी. प्राजक्ता माळीने अनेक मुलाखतींमध्ये वैभव तत्त्ववादीवर आपला क्रश असल्याच कबूल केलं होतं. तिने ‘कॉफी आणि बरंच काही’ हा चित्रपट पाहिल्यानंतर वैभव तिला आवडायला लागला, असही तिने सांगितलं. तिने त्याच्यासोबत लग्न करण्याची इच्छाही व्यक्त केली होती. प्राजक्ता माळीने मुलाखतीत म्हटलं होतं की, ‘कॉफी आणि बरंच काही’ हा चित्रपट पाहिल्यानंतर मला वैभव आवडायला लागला. मी आईला देखील वैभवला जावई म्हणून स्वीकारायला सांगितलं होतं.’ पण सोबतच तिने हेही सांगितलं की वैभव आणि ती खूप चांगले मित्र आहेत. आणि त्यांच्यात एक निखळ मैत्री आहे.
