Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एखादा अभिनेता शिवाजी पार्कात बिड्या मारताना दिसला तर… प्राजक्त माळीने रणबीरचं नाव घेत काय म्हंटलं?

अभिनेत्री प्राजक्ता माळी आजकाल अनेक कारणांमुळे चर्चेत असते. आताही प्राजक्ताचं एक वक्तव्य स्ध्या बरंच चर्चेत आहे. रणबीर कपूरचं उदाहरण देत प्राजक्ताने असं काही उदाहरण दिलं आहे की सध्या तिच्या वक्तव्याची बरीच चर्चा होताना दिसत आहे. असं ती काय म्हणाली?

एखादा अभिनेता शिवाजी पार्कात बिड्या मारताना दिसला तर... प्राजक्त माळीने रणबीरचं नाव घेत काय म्हंटलं?
Follow us
| Updated on: Feb 06, 2025 | 2:31 PM

अभिनेत्री प्राजक्ता माळी आजकाल अनेक कारणांमुळे चर्चेत असते. कधी तिच्या चित्रपटांमुळे  तर कधी तिच्या स्पष्ट वक्तव्यांमुळे तर कधी तिच्या आध्यात्मिक प्रवासामुळे. पण प्राजक्ताची सर्वात जास्त चर्चा झाली ती तिच्या ‘फुलवंती’ या चित्रपटामुळे. या चित्रपटाच्या माध्यमातून तिने निर्मिती क्षेत्रातही पाऊल ठेवलं. प्राजक्ताच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं.

पण सध्या प्राजक्ताच्या एका वक्तव्याची चर्चा होतेय. फुलवंती चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तिने अनेक मुलाखती दिल्या. अशाच एका मुलाखतीमध्ये तिला एक प्रश्न विचारण्यात आला होता त्याचं उत्तर प्राजक्ताने अगदी स्पष्ट पण योग्य दिल आहे.

प्राजक्ताच्या वक्तव्याची चर्चा 

तिला एका मुलाखती दरम्यान विचारण्यात आलं की, पडद्यावर सतत दिसत राहणं चांगलं की मोजके प्रोजेक्ट्स करणं चांगलं विचारण्यात आला होता. त्यावर प्राजक्ता म्हणाली की, ” पडद्यावरील दिसत राहणं याबद्दल दोन्ही बाजूने विचार करायला हवा, कधी कधी ते अतिशय चांगलं आहे. आर्थिक स्थैर्य असेल तर तुम्ही इनसिक्योर होत नाही. तुम्ही मोजकं राहू शकता. बऱ्याचदा कलाकारांना पैशांसाठी काम करण्याची वेळ येते किंवा काहींना दिसत राहण्याची एवढी ओढ असते. पण तुम्ही सातत्याने दिसत राहणं हेही कलाकारासाठी मारकच ठरु शकतं. त्यामुळे तेही बरं नव्हे.”

“अभिनेता दादरला शिवाजी पार्कमध्ये बिड्या मारताना दिसला तर….”

प्राजक्त पुढे म्हणाली, “एक मोठे नेते म्हणाले होते मला जर एखादा अभिनेता दादरला शिवाजी पार्कमध्ये बिड्या मारताना दिसला तर त्याला बघायला मी थिएटरमध्ये का जाऊ? तो मला एक्सक्लुझिव्ह दिसला पाहिजे. आता रणबीर कपूरचंच उदाहरण आहे. तो मला इतका आवडतो. तो सोशल मीडियावर नाहीए. तो त्याचं वैयक्तिक आयुष्य शेअर करत नाही. त्याच्या आसपासच्या लोकांकडून त्याचं सोशल आयुष्य आपल्याला दिसतं. त्याने एका मुलाखतीत खूप चांगला मुद्दा मांडला होता की जर मी माझं आयुष्य सोशल मीडियावर टाकलं तर त्याचा परिणाम मी सिनेमात ज्या भूमिका साकारतोय त्यावर होईल. मी कसा आहे हे लोकांना कळलंच नाही पाहिजे म्हणजे सिनेमात मी जे दिसतो ते लोकांना स्वीकारायला सोपं जाईल. मला ते खूप आवडलं. माणूस म्हणून तुम्ही कसे आहात ते कळणं किंवा सतत दिसत राहणं या गोष्टी मारक ठरतात.”

प्राजक्ताने रणबीरचे उदाहरण देत कलाकार म्हणून कस असाव किंवा काय महत्वाचं असू शकतं याबद्दल सांगितलं. त्यावरून ती तिच्या भूमिकांचा किती बारकाईने अभ्यास करते हे दिसून येतं.

जळगावात दोन गटात तूफान राडा
जळगावात दोन गटात तूफान राडा.
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख.
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला.
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया.
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय...
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय....
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?.
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली...
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली....
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी.
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'.
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन.