AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आईच्या अंत्यविधीवरून प्रकाश राज ट्रोल; नेटकऱ्याला सुनावलं ‘मी नास्तिक असलो तरी..’

ख्रिश्चन पद्धतीनुसार आईच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केल्यामुळे प्रकाश राज यांना ट्रोल करण्यात आलं. सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्यांनी संबंधित ट्रोलरला सडेतोड उत्तर दिलं आहे. ते काय म्हणाले, सविस्तर वाचा..

आईच्या अंत्यविधीवरून प्रकाश राज ट्रोल; नेटकऱ्याला सुनावलं 'मी नास्तिक असलो तरी..'
Prakash RajImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 02, 2026 | 2:21 PM
Share

दाक्षिणात्य आणि बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांची आई स्वर्णलता यांचं निधन झालं. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही काळापासून त्या आरोग्याशी संबंधित विविध समस्यांचा सामना करत होत्या. आईच्या निधनाने प्रकाश राज आणि त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि अभिनेते पवन कल्याण यांच्यासह अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित शोक व्यक्त केला आहे. अशातच आईच्या अंत्यविधीच्या व्हिडीओमुळे एका नेटकऱ्याने प्रकाश राज यांना ट्रोल केलं. जी व्यक्ती स्वत:ला नास्तिक मानते आणि देवावर विश्वास ठेवत नाही, त्या व्यक्तीने ख्रिश्चन पद्धतीनुसार आईच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले, अशा आशयाची पोस्ट एका युजरने एक्स (ट्विटर) अकाऊंटवर लिहिली. त्यावर आता प्रकाश राज यांनी उत्तर दिलं आहे.

संबंधित युजरने प्रकाश राज यांच्या एका मुलाखतीची क्लिप पोस्ट केली आहे. या क्लिपमध्ये ते नास्तिक असल्याचं सांगत आहेत. “माझा देवावर विश्वास नाही. माझ्याकडे वेळ नाही. एका व्यक्तीने जेव्हा मला विचारलं, तेव्हा मी हेच उत्तर दिलं की, माझ्याकडे वेळ नाही. कारण विश्वास ठेवायला देव आहे म्हटल्यावर तो केवळ विश्वासच पुरेसा आहे. नाही म्हणण्यासाठी मला खूप ज्ञानाची गरज लागेल. माझ्याकडे तेवढा वेळ नाही. मी या जगात माणसांसाठी जगतो”, असं स्पष्ट मत ते मांडताना दिसत आहेत. हा क्लिप शेअर करत ट्रोलरने लिहिलं, ‘प्रकाश राज स्वत:ला नास्तिक आणि देवावर विश्वास नसल्याचं म्हणतात. तरी त्यांनी त्यांच्या आईच्या पार्थिवावर ख्रिश्चन पद्धतीनुसार अंत्यसंस्कार केले.’

प्रकाश राज यांनी ही पोस्ट शेअर करत ट्रोलरला उत्तर दिलं. ‘होय, माझा देवावर विश्वास नाही. पण माझ्या आईचा देवावर विश्वास होता. तिच्या श्रद्धेनुसार दफनविधी करण्याचा तिचा अधिकार नाकारणारा मी कोण आहे? आपण एकमेकांना देत असलेला हा मूलभूत आदर आहे. ही गोष्ट द्वेष पसरवणारे तुम्ही राक्षस कधी समजून घ्याल का’, असा तिखट सवाल त्यांनी संबंधित युजरला केला आहे.

प्रकाश राज यांच्या आई लहानपणी एका अनाथाश्रमात राहिल्या होत्या. तिथे त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता आणि त्यानंतर त्या परिचारिका बनल्या होत्या. आयुष्यभर संघर्ष करत त्यांनी एकटीनेच कुटुंबाचा सांभाळ केला होता. काहींनी त्यांच्या अंत्यविधीवरून प्रश्न उपस्थित केले असले तरी अनेकांनी प्रकाश राज यांच्या निर्णयाचं कौतुक केलं आहे. स्वत:ची मतं, विश्वास वेगळा असला तरी आईच्या इच्छेचा आदर करणं हीच खरी माणुसकी आहे, असं काहींनी म्हटलं आहे.

Follow Us
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला...
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला....
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण...
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण....
सोलापुरात महापुरुषांच्या पुतळ्यावरून वाद; पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव
सोलापुरात महापुरुषांच्या पुतळ्यावरून वाद; पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव.
राज्यभरात हनुमान जयंतीचा उत्साह, अंजनेरी मंदिरात भाविकांची गर्दी
राज्यभरात हनुमान जयंतीचा उत्साह, अंजनेरी मंदिरात भाविकांची गर्दी.
हा आयोग चोर आहे... राऊतांची निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर टीका
हा आयोग चोर आहे... राऊतांची निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर टीका.
अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार?
अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार?.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांचा यू-टर्न
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांचा यू-टर्न.
अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध
अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध.
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.