AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2025: पंजाब किंग्जच्या पराभवानंतर प्रिती झिंटाच्या डोळ्यात अश्रू; चाहतेही झाले भावूक

आयपीएलच्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्जचा पराभव झाल्यानंतर टीमची सहमालकीण प्रिती झिंटाचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. यामध्ये तिच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट पहायला मिळतेय.

IPL 2025: पंजाब किंग्जच्या पराभवानंतर प्रिती झिंटाच्या डोळ्यात अश्रू; चाहतेही झाले भावूक
Preity Zinta Image Credit source: Twitter
| Updated on: Jun 04, 2025 | 10:09 AM
Share

आयपीएलचं जेतेपद पटकावण्याचं स्वप्न अखेर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने (RCB) मंगळवारी पूर्ण केलं. तब्बल 18 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आरसीबीला आयपीएलची ट्रॉफी उचलण्याची संधी मिळाली. एकीकडे RCB ने ऐतिहासिक विजय मिळवला, तर दुसरीकडे अभिनेत्री प्रिती झिंटा सहमालकीण असलेल्या पंजाब किंग्जला (PBKS) पराभव सहन करावा लागला. या पराभवानंतर प्रितीच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट पहायला मिळत होती. संपूर्ण सिझनमध्ये पंजाब किंग्जची कामगिरी दमदार होती. त्यामुळे त्यांच्या विजयाची शक्यताही अधिक होती. आयपीएलच्या इतिहासात पंजाबच्या टीमनेही आतापर्यंत ट्रॉफी पटकावली नव्हती.

मंगळवारी पार पडलेल्या अंतिम सामन्यात झालेल्या पराभवानंतर प्रिती तिच्या चेहऱ्यावरील दु:ख लपवू शकत नव्हती. आपल्या टीमसाठी वाटणारं वाईट आणि हताशपणा तिच्या चेहऱ्यावर जाणवत होता. मैदानावरील प्रितीचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मॅच संपल्यानंतर ती मैदानात अत्यंत निराश होऊन चालताना दिसत आहे. अंतिम सामन्यात ती पांढऱ्या रंगाचा कुर्ता, सलवार आणि लाल दुपट्टा अशा पारंपरिक पोशाखात दिसली होती. कर्णधार श्रेयस अय्यरसह इतर स्पर्धकांचं सांत्वन करतानाही ती दिसली.

प्रितीच्या या फोटो, व्हिडीओंवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘भावा, हीसुद्धा 18 वर्षांपासून प्रतीक्षा करत होती. तिच्या डोळ्यातील अश्रू स्पष्ट दिसत आहेत. पुन्हा तिचा अपेक्षाभंग झाला. 2014 मध्येही हेच दृश्य पहायला मिळालं होतं’, असं एकाने लिहिलं. तर ‘प्रिती झिंटा दरवर्षी तिच्या टीमला पाठिंबा देण्यासाठी इतक्या मैलाचा प्रवास करून यायची. ती तिच्या टीमच्या चांगल्या-वाईट क्षणी सोबत होती. तिने कधीच कोणाला ट्रोल केलं नाही. आज तिच्याविषयीचा आदर आणखी वाढला आहे’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘तू खंबीर राहा प्रिती, आपण एकेदिवशी नक्कीच जिंकू’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी तिला आधार देण्याचा प्रयत्न केला आहे.

‘जेव्हा कोणी कोहलीच्या निष्ठेबद्दल बोलतं, तेव्हा आम्ही प्रिती झिंटाच्या ताकदीची आणि इच्छाशक्तीची प्रशंसा केली. अर्थात पैसा ही चांगली गोष्ट आहे. पण खेळावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला माहीत आहे की पराभव किती वेदनादायी असतो. भावना प्रत्येकाच्या सारख्याच असतात आणि ती 18 वर्षे एकाच ठिकाणी उभी राहिली. मला आशा आहे की एकेदिवशी ती जिंकेल’, अशाही प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.