AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Dutt : तुरुंगात असताना संजूबाबाने राक्षबंधनला बहिणींना दिलेली ती भेट, ढसाढसा रडू लागले तिघे

'मिस्टर एंड मिसेज दत्त – मेमोरीज ऑफ आर पॅरेंट्स', या पुस्तकात अभिनेता संजय दत्त याची बहीण प्रिया हिने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. पुस्तकात तो क्षण देखील आहे, जेव्हा अभिनेत्याच्या बहिणी राखी बांधण्यासाठी तुरुंगात पोहोचलेल्या. पण तेव्हा असं काही झालं, ज्यामुळे तिघे देखील ढसाढसा रडू लागले...

Sanjay Dutt : तुरुंगात असताना संजूबाबाने राक्षबंधनला बहिणींना दिलेली ती भेट, ढसाढसा रडू लागले तिघे
Sanjay Dutt
| Updated on: Aug 02, 2026 | 2:40 PM
Share

अभिनेता संजय दत्त आता तिसरी पत्नी मान्यता दत्त आणि जुळ्या मुलांसोबत आनंदाने जगत आहे. पण अभिनेत्याने आयुष्यात असे काही खडतर दिवस अनुभवले आहेत, जे विसरणं खरंच कठीण आहे. अभिनेत्याचं आयुष्य कोणत्या सिनेमाच्या कथेपेक्षा कमी नाही. एकीकडे संजूबाबा दमदार सिनेमे देत होता, तर दुसरीकडे अभिनेता वाईट दिवसांचा देखील सामना करत होता. 1993 मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बब्लास्ट प्रकरणात अभिनेत्याचं समोर आलेलं… तेव्हाच अभिनेत्याच्या वाईट काळाची सुरुवात झाली. अभिनेता जेव्हा तुरुंगात होता, तेव्हा रक्षाबंधनच्या दिवशी बहिणी राखी बांधण्यासाठी तुरुंगात पोहोचलेल्या. तेव्हा संजूबाबाने दिलेली भेट पाहून तिघे देखील प्रचंड रडले…

सांगायचं झालं तर, ‘मिस्टर एंड मिसेज दत्त – मेमोरीज ऑफ आर पॅरेंट्स‘, या पुस्तकात अभिनेता संजय दत्त याची बहीण प्रिया हिने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. संजूबाबा तुरुंगात होता तेव्हा, त्यांच्या बहिणी प्रियंका आणि नम्रता राखी बांधण्यासाठी तुरुंगात गेलेल्या. तेव्हा भावाची अवस्था पाहिल्यानंतर दोघींना प्रचंड दुःख झालेलं.

संजूबाबा निराश होता. पण बहिणींना काहीही कळू नये म्हणून अभिनेत्याने स्वतःचं दुःख लपवलं. तेव्हा तुरुंगात प्रिया आणि नम्रता यांनी संजयला राखी बांधली… बहिणींनी राखी बांधल्यानंतर अभिनेत्याने दोन्ही बहिणींना जवळ घेतलं आणि भावूक झाला. अशात अभिनेत्याने भेट म्हणून बहिणींच्या हातात 2 रुपयांचं कुपन दिलं होतं. जे त्याने जेलमध्ये मजदुरी करुन कमावलेले.

2 रुपयांचं कुपन अभिनेत्याने बहिणींना दिलं आणि म्हणालेला, ‘मझ्या सध्या हिच एक गोष्ट आहे… जी तुम्हाला देऊ शकतो…’, रक्षाबंधनच्या दिवशी भावाने दिलेली भेट पाहून दोन्ही बहिणींना प्रचंड दुःख झालं.  आयुष्यातील हा दिवस संजय दत्त आणि त्याच्या बहिणी कधीच विसरू शकत नाहीत.

संजय दत्त याला मिळायचा पगार…

संजय दत्त तुरुंगात स्वतःचा रेडिओ शो चालवायचा. याशिवाय, अभिनेत्याने एक नाटक कंपनी देखील स्थापन केली आहे. याशिवाय, संजयने तुरुंगात खुर्च्या आणि कागदी पिशव्या बनवून पैसेही कमवले. विनोदवीर कपील शर्मा याच्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ मध्ये अभिनेत्याने तुरुंगातील दिवसांबद्दल सांगितलं. 1993 मध्ये झालेल्या मुंबई बॉम्बस्फॉट प्रकरणात संजय दत्त याचं नाव समोर आलं होतं. शस्त्रास्त्र कायद्याशी संबंधित एका प्रकरणात अभिनेत्याला अनेक वेळा तुरुंगात जावं लागलं. तो पाच वर्षे तुरुंगात होता.

Follow Us
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का? NCP नेत्याचा...
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का? बड्या NCP नेत्याचा भाजपला पाठिंबा?
संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
Pune | संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा देशभराचं लक्ष वेधणार?
थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत...
Eknath Shinde | थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत खडाजंगी
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा...
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा भलामोठा फोटो पाहून राऊत संतापले
अंगावर भागलपुरी शाल, कानांवर रुमाल अन्... एका मतासाठी BMC तील नगरसेवक
अंगावर भागलपुरी शाल, कानांवर रुमाल अन्... एका मतासाठी भाजपनं BMC तील नगरसेवकाला रुग्णालयातून आणलं, Video व्हायरल
देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण?
देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण? बड्या नेत्याचं भाकित ऐकून चकित व्हाल
पुन्हा केंद्र सरकारचं टेन्शन वाढलं? मोर्चा थेट पंतप्रधानांच्या निवास..
पुन्हा केंद्र सरकारचं टेन्शन वाढलं? मोर्चा थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे... नेमकं प्रकरण काय?
एरवी सर्व विषयांवर बोलणारे शहा प्रधानांच्या विषयावर गप्प, म्हणजे...
एरवी सर्व विषयांवर बोलणारे शहा प्रधानांच्या विषयावर गप्प, म्हणजे... फडणवीसांचा उल्लेख करत बड्या नेत्याचा धक्कादायक दावा
धनंजय मुंडेंचा कमबॅक? आता चमत्कार दाखवावा लागेल, येणारा काळ आपलाच...
धनंजय मुंडेंचा कमबॅक? आता चमत्कार दाखवावा लागेल, येणारा काळ आपलाच... मुंडेंच्या भाषणाची जोरदार चर्चा