AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रियांका चोप्राच्या कुटुंबावर शोककळा; बहीण मन्नाराच्या वडिलांचं निधन

बिग बॉस फेम अभिनेत्री मन्नारा चोप्राच्या वडिलांचं निधन झालं आहे. मन्नारा ही अभिनेत्री प्रियांका आणि परिणिती चोप्रा यांची चुलत बहीण आहे. मन्नाराचे वडील गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी अंत्यसंस्कार पार पडणार आहेत.

प्रियांका चोप्राच्या कुटुंबावर शोककळा; बहीण मन्नाराच्या वडिलांचं निधन
मन्नारा चोप्राच्या वडिलांचं निधनImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 17, 2025 | 9:09 AM
Share

अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि परिणिती चोप्रा यांची चुलत बहीण मन्नारा चोप्राच्या वडिलांचं निधन झालं आहे. 16 जून रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 72 वर्षांचे होते. मन्नारा चोप्राचे वडील रमन राय हांडा हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. ते दिल्ली उच्च न्यायालयात वकील होते. मन्नाराने सोशल मीडियावर पोस्ट लिहित वडिलांच्या निधनानंतर भावना व्यक्त केल्या आहेत. रमन हांडा हे प्रियांका आणि परिणिती चोप्रा यांचे काका होते. मन्नाराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट लिहित वडिलांच्या पार्थिवावरील अंत्यसंस्काराची माहिती दिली आहे.

मन्नाराची पोस्ट-

‘अत्यंत दु:खाने आणि वेदनेने आम्ही आमच्या प्रिय वडिलांच्या निधनाची माहिती देत आहोत. ते 16 जून 2025 रोजी आम्हाला सोडून गेलेय. ते आमच्या कुटुंबासाठी शक्तीचा आधारस्तंभ होते’, अशा शब्दांत मन्नाराने दु:ख व्यक्त केलं. रमन हांडा यांच्या पार्थिवावर 18 जून रोजी दुपारी 1 वाजता मुंबईतील अंधेरी पश्चिम इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतील, अशीही माहिती तिने दिली. रमन राय हांडा यांच्या पश्चात त्यांची पत्नी कामिनी चोप्रा हांडा आणि मुली मन्नारा, मिताली असा परिवार आहे.

रमन हांडा यांचं लग्न प्रियांका आणि परिणिती चोप्राची मावशी कामिनी चोप्रा यांच्याशी झालं होतं. त्यामुळे रमन हांडा हे प्रियांका आणि परिणितीचे काका होते. मन्नारा ही दोन्ही अभिनेत्रींच्या मावशीची मुलगी आहे. या नात्याने ती त्यांची चुलत बहीण आहे.

मन्नारा चोप्राने ‘जिद’ या चित्रपटातून बॉलिवूडमधल्या तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली. परंतु हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला नव्हता. त्यानंतर ती दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीकडे वळली. मन्नाराने तिथे ‘थिका’, ‘दुश्त’ आणि ‘सीता’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. परंतु तिथेही विशेष ओळख न मिळाल्यामुळे अखेर मन्नाराने सलमान खानच्या ‘बिग बॉस 17’ या शोची ऑफर स्वीकारली. या शोमुळे तिला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. ती हा शो जिंकू शकली नव्हती, परंतु या शोमुळे ती बरीच लोकप्रिय झाली. नंतर तिने ‘लाफ्टर शेफ्स- अनलिमिटेड एंटरटेन्मेंट सिझन 2’मध्येही भाग घेतला. मन्नारा शेवटची 2024 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘थिरगबदरा सामी’ या तेलुगू चित्रपटात दिसली होती. यामध्ये तिने राज तरुण आणि मालवी मल्होत्रा यांच्यासोबत काम केलं होतं. याशिवाय मन्नारा काही पंजाबी चित्रपटांमध्येही झळकली.

Follow Us
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
रुपाली चाकणकर यांच्या विधानामुळे संताप, नेमकं काय म्हणाल्या?
Video : सावित्रीबाई फुलेंनीही 200 वर्षांपूर्वी…. रुपाली चाकणकर यांच्या विधानामुळे संताप, नेमकं काय म्हणाल्या?
सिल्लोडमध्ये गणेशोत्सवातून देशप्रेमाचा संदेश
Video: सिल्लोडमध्ये गणेशोत्सवातून देशप्रेमाचा संदेश, कुलकर्णी कुटुंबाचा 150 वर्षांच्या गौरवशाली इतिहासाचा देखावा
विनायक राऊत संतापले, दिशा सालियनच्या वडिलांवर गंभीर आरोप!
'मेलेल्याच्या टाळूवर लोणी चाटणारी औलाद म्हणजे...., विनायक राऊत संतापले, दिशा सालियनच्या वडिलांवर गंभीर आरोप!
शेती जळाली, उत्पन्न बंद…आता शाळेची फी तरी कशी भरायची?
Vidarbha Drought : शेती जळाली, उत्पन्न बंद…आता शाळेची फी तरी कशी भरायची?; दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचा सरकारला आर्त सवाल
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे वसंत डावखरे प्रकरणी निर्दोष, वकील म्हणाले...
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे वसंत डावखरे प्रकरणी निर्दोष, वकील काय म्हणाले?