अभिनेता विवेक ओबेरॉय यांची फसवणूक, निर्माता अटकेत, काय आहे प्रकरण?

अभिनेता विवेक ओबेरॉय यांची फसवणूक करण्यात आलीय. चित्रपट निर्मिती करण्यासाठी आधी त्याच्यासोबत भागीदारी करण्यात आली. पैशांचा अपहार करण्यात आला. त्यानंतर नवीन भागीदारी कंपनीच्या माध्यमातून फसविण्यात आले असा आरोप विवेक ओबेरॉय यांनी केलाय.

अभिनेता विवेक ओबेरॉय यांची फसवणूक, निर्माता अटकेत, काय आहे प्रकरण?
Vivek OberoiImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Oct 02, 2023 | 11:20 PM

मुंबई : 2 ऑक्टोबर 2023 | अभिनेता विवेक ओबेरॉयसह आनंदिता एंटरटेनमेंट एलएलपी या मनोरंजन कंपनीच्या अंतर्गत आणखी तिघेजण ‘गुंसे’ नावाच्या चित्रपटाची निर्मिती करणार होते. यासाठी 31 जानेवारी 2017 रोजी त्यांच्यात करार झाला होता. त्यासाठी पूर्ण तयारी करण्यात आली होती. चित्रपटात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी काम करणार होता. त्यासाठी मानधन म्हणून 51 लाख रुपयांची आगाऊ रक्कम दिली गेली. चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होणार होते. तसेच एका एंटरप्रायझेस लिमिटेड कंपनीसोबत भागीदारीसाठी बोलणी झाली होती.

‘गुंसे’ चित्रपटाचे नाव बदलून नंतर ते ‘हड्डी’ असे ठेवण्यात आले. नोव्हेंबर २०२१ ते मार्च २०२२ या दरम्यान विवेक ओबेरॉय आणि त्याचे तीन भागीदार संजय शाह, नंदिता शाह आणि राधिका नंदा यांच्यात वाद झाला. हा वाद कंपनीच्या पैशाचा वैयक्तिक वापर करण्यावरून वाद झाला होता.

नवीन कंपनी स्थापन केली

विवेक ओबेरॉयच्या तिन्ही भागीदारांनी त्याला न कळवता चित्रपट शूट केला. गुंसे चित्रपटात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या व्यक्तिरेखेचे नाव हड्डी होते. त्यामुळे हे नाव बदलून हड्डी नाव ठेवण्यात आले. त्यासाठी आणखी एक नवीन कंपनी स्थापन करण्यात आली. आनंदिता एंटरटेनमेंट स्टुडिओ बॅनरखाली 7 सप्टेंबर रोजी ‘हड्डी’ चित्रपट ओटीपीवर प्रदर्शित झाला.

एमआयडीसी पोलीस ठाण्यात एफआयआर

विवेक ओबेरॉय यांनी 19 जुलै रोजी कंपनी आनंदिता एंटरटेनमेंट एलएलपीचे भागीदार संजय शाह, नंदिता शाह आणि राधिका नंदा यांच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला. चित्रपट निर्मितीबाबत आपली फसवणूक केल्याचे त्यांनी या तक्रारीत म्हटले.

याच प्रकरणावरून एमआयडीसी पोलिसांनी ‘हड्डी’ चित्रपटाचा कथित निर्माता संजय शाह याला अटक केली आहे. या प्रकरणात आणखी तीन जणांना अटक होण्याची शक्यता आहे. चित्रपट निर्माता संजय शहा याला पोलिसांनी कोर्टातून रिमांडवर घेऊन चौकशी सुरु केली आहे. परिमंडळ 10 चे पोलिस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी या निर्मात्याच्या अटकेची माहिती दिली. वांद्रे हॉलिडे कोर्टाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, अश्लील भाषेत धमकीचं पत्र अन्...
नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, अश्लील भाषेत धमकीचं पत्र अन्....
‘लाडकी बहीण योजने’साठी सरकारकडून पुन्हा संधी,'या' तारखेपर्यंत करा अर्ज
‘लाडकी बहीण योजने’साठी सरकारकडून पुन्हा संधी,'या' तारखेपर्यंत करा अर्ज.
मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी का निघाले? दादांनी स्पष्टच म्हटलं....
मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी का निघाले? दादांनी स्पष्टच म्हटलं.....
'काम करणारा भाऊ पाहिजे की चुXXX बनवणारी...', भरत गोगावलेंची जीभ घसरली
'काम करणारा भाऊ पाहिजे की चुXXX बनवणारी...', भरत गोगावलेंची जीभ घसरली.
विधानसभा तोंडावर असताना संघानं टोचले भाजपचे कान, RSS च्या सूचना काय?
विधानसभा तोंडावर असताना संघानं टोचले भाजपचे कान, RSS च्या सूचना काय?.
टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी कोणाची निवड? टाटांनंतर कोण उत्तराधिकारी?
टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी कोणाची निवड? टाटांनंतर कोण उत्तराधिकारी?.
नवनीत राणा विधानसभा निवडणूक लढणार की नाही?, रवी राणा नेमक काय म्हणाले?
नवनीत राणा विधानसभा निवडणूक लढणार की नाही?, रवी राणा नेमक काय म्हणाले?.
'लाडक्या बहिणीं'चा डंका थेट दिल्लीत, प्रत्येक बस स्टॉपवर झळकले बॅनर्स
'लाडक्या बहिणीं'चा डंका थेट दिल्लीत, प्रत्येक बस स्टॉपवर झळकले बॅनर्स.
पुण्यात चाललंय काय? पिस्तुल-कोयत्यानं मारहाण अन् वाहनांची तोडफोड
पुण्यात चाललंय काय? पिस्तुल-कोयत्यानं मारहाण अन् वाहनांची तोडफोड.
नवी मुंबई विमानतळावर सी-295 विमानाचं यशस्वी लँडिग होताच वॉटर सल्यूट
नवी मुंबई विमानतळावर सी-295 विमानाचं यशस्वी लँडिग होताच वॉटर सल्यूट.